मासिक संग्रह: सप्टेंबर, २००५

पत्रसंवाद

कुमुदिनी दांडेकर यांच्या महानगराची वाढ = झोपडपट्टीची वाढ ह्या लेखात त्यांनी मुंबई आणि ग्रामीण भागातील गरिबांच्या परिस्थितीची तुलना मांडली आहे. पाणी, वीज, संडास या भौतिक सोयी नगरांमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना ग्रामीण भागातील लोकांच्या तुलनेत अगोदर आणि जास्त प्रमाणात मिळतात हे त्यावरून दिसते. भारतामधील गरिबी कमी होण्याच्या वेगातही अशीच नागरी आणि ग्रामीण भागात तफावत आढळते आहे. १९८७ ते २००० या काळात भातामधील गरिबी कशा प्रमाणात कमी होत आहे ते पुढील (पान ३०१ वरील) तक्त्यावरून दिसेल. नागरीकरणाचे प्रमाण जास्त असणाऱ्या राज्यांत गरिबीचे प्रमाण कमी असलेले दिसते.

पुढे वाचा

भारतातील वीजक्षेत्र आणि स्पर्धेतील धोके

‘डिस्कशन ग्रूप’ तर्फे आयोजित डॉ. माधव गोडबोले ह्यांच्या डॉ. हरिभाऊ परांजपे स्मृती व्याख्यानाचा गोषवारा ‘वीजक्षेत्र व लोकानुनयाचे राजकारण’ ह्या शीर्षकाखाली (साधना, १२-५-०५ च्या अंकात) वाचण्यात आला. त्या गोषवाऱ्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांची अधिक चर्चा व्हावी म्हणून हे टिपण. त्या लेखातील गोडबोलेंच्या शब्दप्रणालीचाच येथे उपयोग केला आहे.
लोकानुनयाचे राजकारण करू नये व धनिकांना अर्थसाहाय्य देऊन त्याचा बोजा राज्य सरकारांच्या तिजोरीवर टाकला जाऊ नये हा त्यांचा मुद्दा योग्यच आहे. लोकांना जेवढे फुकटात मिळेल तेवढे हवेच असते. पंजाब-हरयाणाचे शेतकरी सधन असूनही तेथे निवडणुकीच्या वेळी ‘बिजली-पानी मुफ्त’चे राजकारण चालते.

पुढे वाचा

नगरांचे आधुनिकत्व आणि राष्ट्रीय वैभव टिकविण्याची शक्यता

महानगरातील म्हणजे विशेषतः मुंबईतील नागरीकरणाच्या चर्चेत पूर्वीच्या काही लेखांत झोपडपट्ट्यांचीच चर्चा झाली. त्याला कारण १९९८-९९ च्या काही पाहण्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर मुंबईतील झोपडपट्ट्यांबाबत हरत-हेची माहिती मिळाली. ती दुर्लक्षिण्यासारखी नव्हती. परंतु हे विसरून चालणार नाही की नागरीकरण हे राष्ट्राचे वैभव आहे. त्यात अनेक हव्याहव्याशा गोष्टी होत असतात. उदाहरणार्थ मुंबईचीच गोष्ट घ्या. मुंबई शहराला एके काळी ‘मोहमयी’ म्हणत. ह्या शहरातील रुंद, स्वच्छ, राजरस्ते, वैभवशाली व कल्पनारम्य इमारती, त्याचा आकार, जागोजागची मनोहारी उद्याने, वस्तुसंग्रहालये, कलादालने, हरत-हेची वाहने, रेल्वेची स्वस्त, वेगवान, व अत्यंत नियमित सोय, उड्डाणपुलांच्या सहाय्याने गर्दीला तोंड देण्याची व्यवस्था, राहण्याच्या सोयीसाठी आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंच उंच इमारती, प्लॅनेटोरियम किंवा तसले शास्त्राधारित मनोरंजनाचे विविध मार्ग, समुद्रकिनाऱ्याचे संपन्न सौंदर्य, समुद्र हटवून केलेली मनस्वी व्यवस्था, व्हिक्टोरिया गार्डनसारखी प्राणिसंग्रहालये, अशी सर्व डोळे दिपवून टाकणारी स्थळे महानगराशिवाय कोणाला परवडतील ?

पुढे वाचा

लेखनाच्या अराजकासंबंधाने (३)

माझ्या शुद्धलेखनविषयक प्रतिपादनास विरोध करणारी ३-४ पत्रे आली आहेत आणि २ लेख अन्यत्र प्रकाशित झाले आहेत. त्यांचा येथे परामर्श घेण्याचा प्रयत्न करतो. या सर्व पत्रलेखकांचा आणि माझा मतभेद मुख्यतः एकाच ठिकाणी आहे. त्यांना उच्चाराप्रमाणे लेखन पाहिजे आणि मला त्याची गरज वाटत नाही. लेखन हे कधीच उच्चाराप्रमाणे नसते. ते वाचकांना पूर्वपरिचित असलेल्या उच्चाराची आठवण करून देणारे असतें ही एक गोष्ट ; आणि लेखनापासून अर्थबोध होण्यासाठी त्याचा उच्चार मनांतदेखील करण्याची गरज नाही, तसा उच्चार करून पाहण्यांत वाचकाचा कालापव्यय होतो; आणि आपल्याला जरी तशा संवयी लागलेल्या असल्या तरी त्या संवयी प्रयत्नपूर्वक मोडायला हव्या ही दुसरी गोष्ट.

पुढे वाचा

सायकल आणि कार (उत्तरार्ध)

आजच्या घडीला सायकलचा इतिहास व महत्त्व सांगण्याचे कारण म्हणजे कारचा वाढता खप, पेट्रोल-डिझेलच्या वाढत जाणाऱ्या किमती, त्यामुळे वाढत जाणारे प्रदूषण व वाहनांच्या गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या. १९ व्या शतकातील ऊर्जा समस्येवर घोड्याच्या शक्तीऐवजी मानवी शक्तीचा वापर करणाऱ्या सायकलचा शोध लागला तसे आज खनिज तेलाच्या समस्येवर पर्यायी ऊर्जा म्हणून बायो-डिझेल व हायड्रोजन यांचा वापर करता येईल का याची चाचपणी प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. परंतु हे मोठ्या प्रमाणावर केव्हा शक्य होईल हे सांगता येत नाही. अमेरिकेतील अॅमरी लव्हिन्स हा मनुष्य गेली ३० वर्षे तेलाबद्दल व त्याच्या वापराबद्दलच्या कार्यक्षमता वाढवण्याबाबत विवेचन करीत आहे.

पुढे वाचा

देशभक्ती आणि राष्ट्रवाद

देशभक्ती (patriotism) आणि (nationalism) ह्या दोन शब्दांत फरक आहे. त्यांचा अर्थ आणि संकल्पना समजून घेतल्याशिवाय त्यांचा योग्य वापर होणार नाही.

ह्या शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण आपल्या अस्मितेचा अभ्यास केला पाहिजे. आपली अस्मिता ही आपल्या स्वप्रेमावर आधारित असते. मी, माझे देशबांधव, समाज ज्याच्याशी मी रक्ताच्या नात्याने बांधला गेलेलो आहे त्याच्यावरच्या प्रेमामुळे सर्व समाजाला ‘आम्ही’ म्हणले जाते. तर आपल्याशिवाय दुसऱ्याला ‘ते’ म्हणून संबोधले जाते. ‘आम्ही’वरचे प्रेम ही घन (positive) भावना आहे, तर ‘ते’ ह्या शत्रूरूप दुसऱ्यांच्या द्वेष करून मी माझे स्वप्रेम किंवा आम्हीवरचे प्रेम अभिव्यक्त करत असलो किंवा ते मजबत करत असलो तर तो अस्मितेचा ऋण आविष्कार होय.

पुढे वाचा

शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था

कृषिप्रधान संस्कृतीतूनच कामाची वाटणी (division of labour) सुरू झाली. हळूहळू वस्तुविनिमयही वाढला आणि नागरी समूह उदयाला आला. कारखानदारी आल्यावर तर नागरीकरणाने जोरच धरला आणि नागरी मानवीसमूह, ग्रामीण मानवीसमूह हे स्पष्टपणे विलग झाले. वस्तुविनिमय पैशाच्या माध्यमातूनच सुरू झाला. माणसांचे आमनेसामने संबंध व्यवहार बंद झाले. जे अनेक व्यवहार अपरोक्ष होत ते आता परोक्ष व्हायला लागले. दृश्य, सहज जाणवणारे नातेसंबंध व परस्परावलंबन तितके उघड राहिले नाही. आज असे जाणवायला लागले आहे की शहरी पांढरपेशा समाज, संघटित कारखानदारी समाज आणि ग्रामीण कृषीवल समाज यांच्यात काही एक किमान संवादही उरलेला नाही आणि त्यामुळे अनेक बाबतींत संघर्षाच्याच भूमिका घेण्याकडे कल दिसू लागला आहे.

पुढे वाचा

‘द नेकेड ॲण्ड द न्यूड’

[बघण्याच्या पद्धती (Ways of Seeing) हे पुस्तक जॉन बर्गर ह्यांच्या बी.बी.सी. टेलिव्हिजन सीरीजवर आधारलेले आहे. १९७२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ह्या पुस्तकाने पाश्चात्त्य कलाकृतींकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. पाच लेखकांनी मिळून हे पुस्तक ‘घडवले’ आहे. ‘बघणे बोलण्याच्या आधी येते. बोलायच्या आधी मूल बघायला आणि ओळखायला शिकते’ ह्या वाक्यापासून सुरुवात झालेले हे पुस्तक आपले बघणे हे आपल्या श्रद्धा, ज्ञान आणि परंपरा ह्यांनी कसे संस्कारित झालेले असते हे युरोपिअन तैलचित्रांच्या माध्यमातून तपासते. पुस्तकातील सात निबंधांमधून लेखक वाचकाच्या मनात प्रश्न जागे करू इच्छितात. काही निबंध शब्द आणि प्रतिमा ह्यांचा वापर करतात तर काही निबंध फक्त प्रतिमांच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडतात.

पुढे वाचा

उपभोगासाठी भीतीचे संचलन

… एका सांसदीय वादविवादात चर्चिलने आपली वास्तवावरील पकड दाखवून दिली. संरक्षणखर्च का वाढवावा, हे सांगताना तो म्हणाला, “…आपण क्षीण वारसा आणि निरागस इतिहास असलेले तरुण समाज नाही आहोत. आपण जगाची संपत्ती आणि व्यापार यांचा सर्वथा प्रमाणाबाहेर भाग स्वतःसाठी हडपला आहे. आपण हवे तेवढे भूक्षेत्र घेतले आहे. ही आपली मालमत्ता हिंसेने कमावलेली आणि प्रामुख्याने बळजोरीने राखलेली आहे. आम्हाला ही सत्ता शांतपणे भोगू द्या, हा आपला दावा आपल्याला जितका विवेकाधारित वाटतो, तेवढा इतरांना बहुतेक वेळी वाटत नाही.”
यातील शब्दप्रयोगांचे स्पष्टीकरण भारतात द्यायची गरज नाही.

पुढे वाचा