मासिक संग्रह: फेब्रुवारी, २०१२

पत्रसंवाद

ललिता लिमये, भ्रमणध्वनी 9272545654
मी, ललिता श्रीकांत लिमये, आपल्या मासिकाची आजीव सभासद आहे. आपल्या जाने. 2012 च्या अंकातील सूचनेप्रमाणे आजीव सभासदत्वाच्या नूतनीकरणाकरिता सोबत रु.3000/- चा चेक पाठवीत आहे. माझ्या आठवणीप्रमाणे फार वर्षांपूर्वी मी 500 रु. भरले होते. परंतु आता आपण उर्वरित रकम देणगी म्हणून स्वीकारावी. परत करू नये.
चेक मिळाल्याची पोच द्यावी.
ता.क. : मी, माझे यजमान व माझे वडील (श्री. आ.व्यं. तनखीवाले) आपले सर्व अंक आवर्जून वाचतो.

प्रेरणा सुभाष खरे, सुधानारायण निवास, समर्थनगर, बरैज रस्ता, सागरगंगा हौ.सो.जवळ, बदलापूर (प.), जि.ठाणे,

पुढे वाचा

सर्वांसाठी आरोग्यसेवा

डॉ. अनंत फडके यांचा आ.सु.डिसेंबर 2011 मधील सर्वांसाठी आरोग्यसेवा हा लेख वाचल्यावर त्याविषयीच्या प्रतिक्रिया मांडाव्या वाटतात.
1) उपचारपद्धती ज्याप्रमाणे ‘एव्हिडन्स बेस्ड’ हवी. म्हणजे अनभवांवर आधारित हवी, त्याप्रमाणेच आरोग्यव्यवस्थेबद्दलची धोरणेदेखील पूर्वानुभवांवर आधारित हवी. आजपर्यंतचा अनुभव असा आहे –
अ) शास्त्रीय वैद्यक महाविद्यालयांशी (अॅलोपॅथिक मेडिकल कॉलेज) संलग्न असलेली, रुम्णालये चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवू शकतात. उदा. मुंबईची के.ई.एम., नायर, जी.टी., आणि पुण्याचे ससून ही रुग्णालये. यांचे कारण पदवीनंतरचे शिक्षण घेणारे डॉक्टर तेथे प्रत्यक्ष रूग्णसेवा पुरवत असतात. त्यांचा सेवाकाळ 2 ते 6 वर्षेच साधारणपणे असल्यामुळे ते कधीच बनचुके सरकारी नोकर बनत नाहीत.

पुढे वाचा

पुस्तक परिचय – बिहारमधील पूर समजून घेताना

[भारतात पाण्याच्या समस्या बहुतकरून तुटवड्याशी संबंधित असतात. एकच क्षेत्र असे आहे, जिथे नद्यांचे पर महत्त्वाचे असतात, आणि तेही दरवर्षी. हे क्षेत्र म्हणजे हिमालयाच्या पायथ्यापासून गंगा नदीपर्यंतचे.
या क्षेत्रातील नद्यांचा प्रेमाने अभ्यास करणारा महाभाग म्हणजे डॉ. दिनेश कुमार मिश्रा. सुमारे अर्धशतकाच्या काळात या टाटानगरस्थित अभियंत्याने उत्तर बिहारमधील नद्यांचा अत्यंत तपशीलवार अभ्यास करून साठेक.पुस्तके व शोधनिबंध लिहिले आहेत. यांपैकी जागतिक दर्जाचा पूर-तज्ज्ञ ही कीर्ती मिळवून देणारी प्रकाशने इंग्रजी आहेत पण मिश्रा आवर्जून सुघड, सुलभ हिंदीतून आम आदमी साठीही लिहितात.
बाया पेड बबूल का हे पूरनियंत्रणावरील पुस्तक म्हणजे मिश्रांच्या बाढमुक्ति अभियाना चा जाहीरनामा आहे.

पुढे वाचा

साहित्यातून विवेकवाद (१) – स्टाईनबेक

[साहित्यातून विवेकवाद नावाने काही लेखांमधून काही साहित्यकारांचे लिखाण तपासणारी ही लेखमाला आहे. काही थोडे अपवाद वगळता मराठी साहित्य व्यक्तिगत व कौटुंबिक भावभावनांमध्येच गुंतलेले असते. अपवादापैकी वा.म.जोशींवर आजचा सुधारकने विशेषांक काढला होता (डिसें. 1990-जाने. 1991, अंक (1 : 9-10).
जरी लेखमाला मी सुरू करत आहे, तरी इतरांनाही या मालेतून साहित्य व साहित्यिक तपासण्यास आम्ही आवाहन करत आहोत. – नंदा खरे ]
मुंबईला शिकत असताना महिन्याकाठी एकदा तरी फोर्टात जात असे. स्वस्ताई होती. तीन रुपयांत जिवाची मंबई करता येत असे. तर त्या काळात, 65-66 साली आयुष्यात पहिल्यानेच इंपल्स बाईंग म्हणतात तसे मन की खुषी कारणाने साडेसात रुपयांचे एक पुस्तक घेतले.

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (१)

आपण कुठून आलो?

आफ्रिकेच्या दंतकथेनुसार माणसे मध्य आफ्रिकेतून आली. मानवी अस्तित्वापूर्वी येथे फक्त अंधार होता व सर्व पृथ्वी जलमय होती. बुबा नावाचा देव होता. एके दिवशी बुंबाचे पोट अचानकपणे दुखू लागले. वेदना थांबेनात. शेवटी त्याला उलट्या होऊ लागल्या. वांतीतून सूर्य बाहेर पडला. सूर्याच्या तापमानामुळे पाण्याचे वाफेत रूपांतर झाले. त्यामुळे जमिनीचा काही भाग दिसू लागला. तरीसुद्धा बुंबाची पोटदुखी थांबली नाही. पुन्हा एकदा उलटी झाली. त्यातून चंद्र, नक्षत्र, तारे बाहेर पडले. त्यानंतरच्या उलटीतून वाघ, सिंह, मगर, कासव व शेवटी माणूस असे बाहेर पडले आणि सर्व भूभागावर व जलमय प्रदेशात विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती, झाडे दिसू लागली.

पुढे वाचा

संगीतातील ‘श्रुति’प्रामाण्याचा वैज्ञानिक उलगडा

[विवेक चिंतनाच्या वाटेवर संगीताचा विचार कुठे आला असा प्रश्न काही वाचकांना पडेल, आणि ते साहजिकही आहे. सुंदरता हे बघणाऱ्या/ऐकणाऱ्या इ. च्या ज्ञानेंद्रियांच्या समजुतीचेच केवळ फलित असते की एखादी गोष्ट वा परिस्थिती आस्वादकनिरपेक्षही सुंदर असू शकते, हा प्रश्न सौंदर्यशास्त्राने निश्चितच हाताळलेला असला तरी आस्वादकासाठी त्याची जाणीव समजुतीने येतेच असे नाही. शब्दांच्या वाटेने येणाऱ्या लेखन, नाट्य यांसारख्या कलांबाबत आपल्याला अमुकतमुक का आवडले, किंवा का सुंदर वाटले नाही याबद्दलचे प्रश्न विचारता येतात आणि त्यावर उत्तर मागता, येते, पण संगीतासारख्या गोष्टीत सूर-सौंदर्याचा आस्वाद देणाऱ्यांपैकी, त्यातील शार फारसे वा न शिकलेल्या बहुतांशी श्रोत्यांना, हे सूर आपल्या कानांना सुंदर भासले में जाणवते, पण असे का झाले याचा उलगडा होत नाही.

पुढे वाचा

विकासनीतीची प्रतीकचिह्न (भाग-३)

आजच्या विकासाच्या प्रतीकचिह्नांना विकासाचे लक्षण न मानता त्यांच्यामागचे सत्य तपासून पाहणे का गरजेचे आहे हे आपण मागच्या दोन लेखांत पाहिले. प्रतीकचिह्नांच्या मागचे सत्य शोधणे म्हणजेच आजच्या विकासाच्या मानचिह्नांबद्दल मूलभूत प्रश्न उभे करणे. असे करण्यामागील एक महत्त्वाचे कारण, या विकासासाठी आवश्यक असलेली साधने आपल्याला पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणार आहेत का, त्या साधनांचा उपयोग आपल्याला प्रमाणाबाहेर करावा लागणार आहे का, अशा प्रकारचे मोठे प्रश्न आपल्या मनात उभे ठाकलेले आहेत.
नैसर्गिक साधनांच्या उपयोगावर येणाऱ्या मर्यादा
नैसर्गिक साधनांच्या उपलब्धतेला काही सीमा आहेत का, असा प्रश्न विचारात घेताना आपल्यासमोर सर्वसामान्यपणे असते ती भौतिक मर्यादा.

पुढे वाचा

जगविस्तीर्ण मन : मानवता, यंत्र आणि आंतरजाल एकत्रित करणारे

World Wide Mind : The coming integration of humanity, machines and the internet लेखक मायकेल कोरोस्ट (प्रकाशक फ्री प्रेस, 2011) हे पुस्तक हल्ली वाचले. मेंदूतील प्रक्रियांचा शोध आणि त्याचा होऊ घातलेला परिणाम या विषयावर हे पुस्तक आहे.
गेल्या वर्षी, ‘आता यंत्रे मन ओळखू शकणार’ अशी बातमी वृत्तपत्रांतून आली होती. काही वृत्तपत्रीय अग्रलेखही त्यावर आले होते. हे यंत्र मनातलेच ओळखणारे असल्याने थापा मारणे दुरापास्त होईल असे काहीसे त्यावर लिहिले होते. यंत्र पुढील काही वर्षांत तयार होईल अशी ती बातमी होती. मेंदूतून विविध विद्युतचुंबकीय लहरी निघत असतात.

पुढे वाचा

सभ्यता आणि सुधारणा

सभ्यता आणि सुधारणा
आपण सभ्यता हे नाव कोणत्या स्थितीला देण्यात येते त्याचा विचार करू. ह्या सभ्यतेची खरी ओळख अशी आहे की लोक बाह्य वस्तूंच्या शोधात आणि शरीरसुखात सार्थकता मानतात. त्याची काही ‘उदाहरणे पाहू. एखाद्या देशाची माणसे समजा पूर्वी जोडे वापरीत नव्हती आणि आता युरोपचा जामानिमा करायला शिकली, तर ती जंगली अवस्थेतून सुधारलेल्या अवस्थेत आली असे मानले जाते. पूर्वी युरोपात माणसे सामान्य नांगराने आपल्यापुरती जमीन अंगमेहनतीने कसत असत त्याऐवजी आता वाफेवर चालणाऱ्या यंत्रांच्या नांगराने एक मनुष्य पुष्कळ जमीन कसू शकतो आणि पुष्कळ पैसा साठवू शकतो.

पुढे वाचा