मराठीच्या प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना विदर्भ साहित्य संघात ‘शुद्धलेखनाचे सुलभीकरण’ ह्या विषयावर घडलेल्या चर्चासत्रात वाचलेला निबंध

( या निबंधाचे लेखन शासनमान्य नियमांनुसार केले आहे. कारण शासनाचे नियम वापरणे बंधनकारक (mandatory) आहे.) मराठीची प्रमाणभाषा, बोलण्याची नव्हे तर लिहिण्याची, कशी असावी तर तीमध्ये कोणताही विषय मांडता यावा. शास्त्र किंवा विज्ञान यांची सतत वाढ होत असते. म्हणजे त्यांचा परिघ वाढत जातो; त्याचप्रमाणे त्या विषयांची खोली देखील वाढत जाते. असे सतत वाढत जाणारे विषय आमच्या भाषेला पेलता यावे आणि तीमध्ये केलेले लेखन निःसंदिग्ध आणि अल्पाक्षर असावे अशी गरज आहे. ही गरज असताना त्याचवेळी लेखननियमांच्या सुलभीकरणाची मागणी होत आहे. सुलभीकरणाची गरज आहे असे मानून मी लेखनाच्या विषयात प्रवेश केला.

पुढे वाचा

गावची जत्रा

प्रत्येक गावाला यात्रा किंवा उरूस दरवर्षी असतो. आपल्याकडे मुसलमान राज्यकर्त्यांचा अंमल सुमारे 1000-1200 वर्षे तरी होता. तेव्हा बऱ्याच ठिकाणी राज्यकर्त्यांचा धर्म पाळण्याच्या इच्छेने तेथे देवळांच्या ऐवजी दर्गे वगैरे झाले असतील. अगदी देवळांचेच दगड वापरून दर्गे बांधले, अशा कडवेपणाने नसले तरी नवीन दर्गे झाले असतील. मुस्लिम राजवटीने त्यांना वतने दिली असतील, व मग देवाचा उरूस करणे ओघाने आलेच! नंतर जरी इतर धर्मांच्या राजवटी आल्या तरी सहिष्णुतेच्या मानसिकतेतून त्या राजांनी ती धर्मस्थळे व त्यांची वतने तशीच ठेवली असतील. नंतर ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या राजवटीत तर धर्मस्थळांचे नीट जतन करून, समाज एकसंध राहू नये या धोरणामुळे सर्व धर्मस्थळे सांभाळली गेली असतील.

पुढे वाचा

पत्रसंवाद

राजीव साने, 2, स्नेह क्लासिक्स्, 7/1 एरंडवणे, पाडळे पॅलेससमोरील रस्ता, पुणे 411004 चौसाळकरांना उमजलेला मार्क्स : काही प्रश्न आजचा सुधारकच्या नोव्हेंबर 2010 च्या अंकात सुधीर बेडेकर यांनी लिहिलेले परीक्षण (मार्क्सवाद-उत्तरमार्क्सवाद ले. प्रा. अशोक चौसाळकर) वाचले. त्यातून बऱ्याच आशा पल्लवित झाल्या. परंतु पुस्तक वाचल्यावर मात्र निराशा झाली. पहिली दोन प्रकरणे खुद्द मार्क्सवर आहेत. या दोन प्रकरणात इतक्या घसरड्या जागा निघाल्या की त्यावर प्रश्न उपस्थित करण्यातच प्रस्तुत लेख खर्ची पाडावा लागला. पुस्तकाच्या पुढील भागातही आक्षेपार्ह असे बरेच काही आहे पण ते या लेखाच्या मर्यादेत घेणे शक्य नाही.

पुढे वाचा

शोधावें लागतें

‘आपल्या पूर्वजांच्या काळाकडे पाहण्याच्या दोन दृष्टी असतात. एक अभिमानाची व दुसरी केवळ ऐतिहासिक किंवा विवेकाची. अभिमानाच्या दृष्टींत बऱ्यावाईटाचा विवेक नसतो; आणि कांहीं एका मर्यादेपर्यंत जुन्याचा अभिमान बाळगणें हें स्वाभाविकच नव्हे तर योग्यहि ठरतें. अभिमानाच्या दृष्टीला स्वकीयांच्या इतिहासरूपी पर्वतांचीं सर्वांत उंच शिखरें कर्तृत्वरूपी बर्फानें मढवलेलीं व कीर्तिरूपी उज्ज्वल सूर्यप्रकाशांत चमकणारी तेवढीच दिसतात. कारण अभिमान दुरून आणि केवळ कौतुकबुद्धीनें पाहणारा असतो. ऐतिहासिक किंवा चिकित्सक बुद्धि ही जवळ जाऊन शोधक बुद्धीनें पाहणारी असल्यामुळें तिला त्या पर्वतांच्या शरीरांचा खडबडीतपणा, त्यांतील खोल व भयंकर दऱ्याखोरीं, त्यांतील हिंस्र श्वापदें, विषारी वृक्ष, कांटेरी वेली, हें सर्व कांहीं दिसतें.

पुढे वाचा

पुस्तक-परिचय : प्रोमीथियन अग्नी

पुस्तकाचे नाव Promethean Fire : Reflections on the Origin of the Mind आहे. (लेखक – चार्ल्स जे लुम्स्डेन व इ.ओ. विल्सन, हार्वर्ड युनि. प्रेस, 1983) [ ग्रीक पुराणांमध्ये देवांकडून अग्नी चोरून आणणाऱ्या प्रोमीथियस नावाच्या योद्ध्याची कथा आहे. तिच्या आधाराने ‘देवत्व पावण्याचा हव्यास’ याचे रूपक म्हणून प्रोमीथियसचे मिथक वापरले जाते. – सं.]

जितके नाव जड, तितकेच पुस्तकही वाचायला जड आहे. बहुतांश संदर्भ जीवशास्त्र आणि जनुकशास्त्रामधले, ज्याचा आणि माझा दहावीनंतर कधीही संबंध आला नव्हता. बरे, जेवढे कळत होते तेवढेही कितपत कळलेले आहे याबद्दल शंकाच आहे!

पुढे वाचा

पुस्तक-परिचय : महागाईची जन्मकुंडली

आपल्याला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बाजारात पाय टाकल्याशिवाय पर्याय नसतो. आणि बाजारात पाय टाकला की आपण महागाईचे चटके अनुभवतो आणि मग स्वतःशीच पुटपुटतो. “काय ही महागाई’. महागाई वाढण्याचे कारण काय असेल तर बाजारात वस्तूंचा तुटवडा, असे ढोबळ उत्तर देत आपण सामान्य लोक बाजारातून काढता पाय घेतो.

आज महागाई हा शब्द आपण रोज ऐकतो. महागाई म्हणजे काय? महागाईस कोण जबाबदार? देशातल्या कोणत्या घटकाला या महागाईचा फटका बसतो? हा महागाईचा प्रश्न सुटायला हवा असे वाटत असेल तर यावरचा उपाय काय? महागाईचा शेतकऱ्यांशी काय संबंध?

पुढे वाचा

कठीण समय येता….

ज्यांची देवाच्या अस्तित्वावरच नव्हे तर देवाच्या चांगुलपणावर व दयाळूपणावरदेखील श्रद्धा आहे ते लोक सहसा प्रतिपादन करतात की संकटसमयी ही श्रद्धा अनेकांसाठी दिलासाकारक ठरते. ह्या प्रतिपादनाचा जरा खोलात जाऊन विचार करू या.

जेव्हा आयुष्यात अडचणी येतात, जेव्हा जगण्यातला आनंदच हरवला आहे असे वाटते, तेव्हा स्वतःची समजूत काढण्याचे वेगवेगळे मार्ग लोक वापरतात. एक प्रकारची माणेस स्वतःला सांगतात, “सध्याच्या दुःखभोगामागे सर्वशक्तिमान परमेश्वराची अंतिमतः माझ्या भल्यासाठीच काही योजना असेल. मला कदाचित ती समजू शकत नसेल, तेव्हा प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून दुःख आणि वेदना निमूटपणे सोसाव्यात हेच माझ्या हिताचे आहे.”

पुढे वाचा

अंधश्रद्धानिर्मूलनार्थ (भाग १)

[आमचे जुने वर्गणीदार व हितचिंतक सीताराम दातार यांनी अंधश्रद्धेबाबत विवेकवादी भूमिका श्लोकबद्ध केली आहे. मूळ संस्कृत रचना ‘अन्धश्रद्धाविनाशाय’ या नावाने असून तिचे समश्लोकी मराठी रूपांतर ‘अन्धश्रद्धा निर्मूलनार्थ’ या नावाने आहे. याशिवाय ‘For the eradication of superstitions’ नावाने इंग्रजीत गद्यरूपात प्रत्येक श्लोकाचा अर्थ विशद केला आहे. या प्रचंड परिश्रमाबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. हे काम पूर्ण होताच श्री दातारांनी आम्हाला हा मजकूर पाठवून योग्य वाटेल तसा उपयोग करण्याची परवानगीही दिली, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. येत्या काही अंकांमधून आम्ही या काव्याचा मराठी भाग प्रकाशित करत आहोत.

पुढे वाचा

बहुजनहितासाठी नवे राजकारण

[मायकेल सँडल यांचे चौथे व शेवटचे व्याख्यान ‘बहुजनहितासाठी नवे राजकारण’ ह्या विषयार होते. हे व्याख्यान अमेरिकेच्या राजधानीत, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत झाले. व्याख्यानाची पूर्वपीठिका अशी, की इंग्लंड व अमेरिका हे दोन्ही बलाढ्य देश लोकशाहीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. परंतु असे असले तरी ह्या दोन्ही देशांचे राजकारण सकृत्दर्शनी परस्परविरोधी दिसणाऱ्या टोकांमध्येच, म्हणजे प्रत्यक्षात एकाच रिंगणात अडकून पडले होते. कालांतराने आता ह्या दोन्ही देशांमधील लोकशाही व सांसदीय राजकारण यांच्या मर्यादा हळूहळू हग्गोचर होऊ लागल्या आहेत. गेल्या वर्षीपासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असलेले बराक ओबामा यांनी आता ह्या राजकीय तोचतोपणामधून उंच भरारी घेऊन एका नव्या जगाचे स्वप्न आपल्या सर्वांना दाखविले आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

राजीव जोशी, ‘तत्त्वबोध’, नेरळ माथेरान रोड, कल्याण कर्जत हायवे, नेरळ, जि. रायगड – 01. फोन 02148 238652, 9923103301 (dr..rjeevjoshi@yahoo.com)

सप्टेंबर 2010 च्या अंकातील कार्यकारी संपादकांच्या टिप्पणीबाबत : “मूळ प्रश्नांना हात घालण्याची तयारी आणि मानसिकता…. नाही” हे तुम्ही मान्य केले आहेच. आता “मूळ प्रश्न कोणते?” याबाबतचे मत प्रामाणिक आहे? (आणि त्याच्या चर्चेसाठी मन खुले आहे) किंवा ते एका मानसिकतेने केलेला जाणीवपूर्वक देखावा आहे. हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. चिदंबरन, राहुल गांधी यांनी टीका केलेल्या ‘RSS’ आणि ‘सिमी’ च्या भगव्या हिरव्या दहशतवादाच्या दडपणाखालीसुद्धा मानसिकता बदलू शकते.

पुढे वाचा