“आज शाळेत जायचं म्हणून रडतो आहेस, उद्या शाळेत जाणार नाही म्हणून यापेक्षा जास्त रडशील.”
रवींद्रनाथांच्या लहानपणी त्यांच्या घरी येऊन शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्यांना एक थप्पड मारून ही जी भविष्यवाणी उच्चारली तीच त्यांच्या शिक्षणविषयक अनुभवांतील पहिली पायरी म्हणायला काहीच हरकत नाही. रवींद्रनाथांचा भाऊ सोमेंद्रनाथ आणि भाचा सत्यप्रसाद हे त्यांच्यापेक्षा केवळ दोनच वर्षांनी मोठे. त्यामुळे ही तीनही मुले तशी एकत्रच वाढली. दोन वर्षांच्या वडिलकी-मुळे हे दोघे शाळेत जायला लागले. पण छोटा रवी मात्र अजून शाळेत जायच्या वयाचा झालेला नाही असे घरच्यांनी ठरवून टाकले होते.
व्यक्ती विरुद्ध नागरिक
आधुनिक काळात जगातील सर्व सुसंस्कृत समाजांनी शिक्षणाची आवश्यकता स्वीकारलेली आहे. अनेक मान्यवर विद्वानांना हे म्हणणे मान्य नाही. त्यांच्या मते जे उद्देश्य गाठण्याचा दावा शिक्षण करते ते गाठण्यास ते असमर्थ ठरलेले आहे. ह्या मताचा खरेखोटेपणा तपासण्याआधी शिक्षणामुळे काय साध्य व्हावे असे आपल्याला वाटते ह्याचा विचार करायला हवा. शिक्षणाच्या हेतूबद्दल एकवाक्यता नसणे स्वाभाविक आहे पण एका मुद्द्यावर मात्र विरोधकांमध्ये दोन कट्टर गट पडल्यासारखे दिसतात — शिक्षणाचा विचार व्यक्तीच्या संदर्भात करणारे आणि शिक्षणाचा विचार समाजाच्या संदर्भात करणारे.
शिक्षणामध्ये व्यक्तीला घडवण्याची क्षमता असते असे जर मानले तर असा प्रश्न उद्भवतो की शिक्षणाने माणसाला चांगली व्यक्ती म्हणून घडवावे की चांगला नागरिक म्हणून?
शिक्षणामागचे मूलभत हेतू . . . एक प्रश्न
शिकणे ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे. माणसाच्या प्रत्येक पिढीने आपली वाटचाल आधीच्या पिढीने सुपूर्द केलेली ज्ञानाची शिदोरी बरोबर घेऊन केलेली आहे. या शिदोरीतील ज्ञानाचे संचित पुढील पिढीकडे सोपवणे हा औपचारिक, अनौपचारिक, किंवा सहज शिक्षणामागचा मूळ हेतू आहे. यामुळे नव्या पिढीचे पाऊल मागच्याहून पुढे पडावे अशीही त्यामागे अपेक्षा आहे. ज्ञानाची उपलब्ध शिदोरी खूप मोठी असते. साहजिकच प्रत्येक व्यक्तीकडे ती संपूर्ण पोचवणे अशक्य आहे. दिलेल्या वेळात, त्यातले नेमके काय पोचवावेच, काय आवश्यक आहे, तर काय हवे तर बाजूला ठेवावे —- हा विचार करताना आधाराला शिक्षणामागचे मूलभूत हेतू घ्यावे लागतात.
अभ्यागत संपादकाचे मनोगत
“शिक्षण कशासाठी असते, त्यामागे कोणते हेतू असतात?’ असा प्रश्न जर मी आपल्याला विचारला, तर उत्तर देण्याआधी आपण प्रश्न विचाराल, “कोणते शिक्षण?’
लहान मूल बोलायला शिकते, शाळा-महाविद्यालयात विशिष्ट अभ्यासक्रम विद्यार्थी शिकतात, माणूस अनुभवातून शिकतो, मोटर चालवायला शिकतो, नवी भाषा शिकतो, कला महाविद्यालयात रंगमाध्यमाची काही कौशल्ये हस्तगत करतो, उत्तम कथा-कादंबऱ्यांच्या आकलनातून जीवनाचा अर्थ समजून घेऊ पाहतो, स्वतःला वा जवळच्या व्यक्तीला झालेल्या आजाराची माहिती पुस्तकांमधून जाणून तो, संगणकाकडून हवे ते काम करवून घ्यायला शिकतो, इ. इ. ही सर्व शिक्षणाचीच उदाहरणे आहेत, परंतु हेतूंचा विचार करता प्रत्येक ठिकाणी वेगळे उत्तर येऊ शकते.
विशेषांक: शिक्षणामागील हेतू
जुलै-ऑगस्ट २००२
विशेषांक: शिक्षणामागील हेतू
कुणी ठेविले भरून
कुणी ठेविले भरून
शब्दाशब्दांचे रांजणः छंद लागला बाळाला घेतो एकेक त्यांतून ।।१।।
काही सुबक रंगीत, काही पेलती मुळी न, काही जोडतो तोडतो, पाहतोही वाकवून ।।२।।
शब्द होतात खेळणीः खेळवितो ओठांवर, ध्यानी मनी जे जे त्याला देऊ पाहतो आकार ।।३।।
कधी वाटते उणीव शब्द येईना मनास, घाली पालथे रांजणः शब्दशोधाचा हव्यास ।।४।।
आणि अवचित त्याच्या ओठावरी शब्द येतोः शब्द त्याचीच घडणः बाळ आनंदे नाहतो ।।५।।
अशा त्याच्या शब्दासाठी माझी उघडी ओंजळः शब्द शब्द साठविते जसे मेघांना आभाळ ।।६।।
—- इंदिरा
पत्रसंवाद
गंगाधर गलांडे, 4 Aldridge Court, Meadway, High Wycombe, Bucks, HP11 1SE, United Kingdom
आपला मेचा अंक मिळाला. मुखपृष्ठावरचा ‘धैर्य’ या मथळ्याखालचा मजकूर वाचून मनस्वी विषाद वाटला. वर्णन केलेली घटना निंद्य तर खरीच पण संपादकांनी असा मजकूर छापून काय साधले हे मात्र समजत नाही मला.
प्रथम मी हे मान्य करतो की १९ एप्रिलचा टाइम्स ऑफ इंडियाचा अंक माझ्या वाचनात आलेला नाही. तरीही हे तर उघडच आहे— संपादकांनी त्या मूळ लेखांतल्या निवडक मजकुराचाच गोषवारा दिलेला आहे. माझी खात्री आहे की लोकांची माथी भडकवण्याच्या (mass hysteria) कृत्यातूनच त्या अबलेची हत्या झालेली असावी व, जाणून वा बुजून, निवडक/अर्धवट माहिती देऊन तुम्हीही तोच मार्ग आचरलेला आहे, नाही का?
पत्रसंवाद
निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, चेकनाक्याजवळ, नेरळ (रायगड) — ४१० १०१ (अ) एप्रिल २००२ च्या अंकात मेहेंदळे यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यातील पुढील विधाने मला खटकली.
१. ‘देव ही एक मनोवैज्ञानिक गरज आहे’. २. ‘शाप, कुंडलिनी, रेकी . . . तत्सम शक्तींचा अभ्यास होत आहे.’ ३. ‘डत्दृदत्द्म . . . ध्वनिमुद्रिका . . . विश्वास वाटतो.’ ४. . . . ऐतिहासिक उत्तुंग व्यक्तिमत्त्वे म्हणजे राम, . . . अनुकरण
अपेक्षित आहे.’ त्या विधानांमध्ये मला पुढील चुका सापडल्या.
१. “placebo’ ह्या ‘औषधा’चा एक दुर्लक्षित गुणधर्म म्हणजे ‘वापरकर्त्याला औषध मनोवैज्ञानिक मार्गाने गुण देणारे आहे ह्या सत्याची जाणीव कस्न दिल्यावर औषधाचा परिणाम बंद होतो.’
विशेष जोड अंक
आजचा सुधारकचा यापुढील अंक हा ‘शिक्षणामागील हेतू’ या विषयावरील विशेष जोड अंक असेल. सुमारे ऐंशी पानांचा हा अंक जुलै-ऑगस्टचा अंक म्हणून प्रकाशित होईल.
या अंकासाठी अभ्यागत संपादक म्हणून संजीवनी कुलकर्णी आम्हाला लाभल्या आहेत. होमिओपॅथीचे शिक्षण घेतलेल्या संजीवनींचा त्रोटक परिचय असा —-
१९८७ मध्ये त्यांनी सतर्क व सजग पालकत्वासाठी ‘पालकनीती’ हे मासिक सुरू केले आणि आजवर त्याचे संपादन त्या करत आहेत.
एन. जी. नारळकर फाऊंडेशनने सुरू केलेल्या ‘अक्षरनंदन’ या शाळेच्या व्यवस्थापनात त्या सक्रिय असून गणित, नागरिकत्वाचे शिक्षण आणि एकूण शिक्षणपद्धतीत त्यांना विशेष रस आहे.
खादी: श्री. वेले ह्यांच्या पत्राच्या निमित्ताने
श्री. दामोदर वेले ह्यांचे मे अंकातले पत्र वाचले. त्यांनी Mass Production च्या जमान्यांत खादी काळ बाह्य झाली आहे असे माझे मत म्हणून मांडले आहे. त्याबाबतीत मला त्यांचे लक्ष त्याच अंकातल्या ५०-५१ या पानवरील मजकुराकडे वेधावयाचे आहे. त्यांत मी असे म्हणतो की, आपले प्रश्न औद्योगिक क्रान्ती व तज्जन्य Mass Production मुळे निर्माण झाले नाहीत. ते आपल्याला यंत्रयुगाला सामोरे जाता आलेले नाही म्हणून निर्माण झाले आहेत.
यंत्रयुग मानवेतिहासांत फार पूर्वीच आलेले आहे. आणि लोकसंख्या मुळीच वाढली नाही तरी, मानवी बुद्धीच्या आटोक्यात नवीन उत्पादनपद्धती येऊ लागल्या तेव्हापासून हा फरक पडला आहे.
युनिकॉर्न
(उंबेर्तो इको ह्या इटालियन लेखकाच्या द नेम ऑफ द रोज ह्या पुस्तकातील हा उतारा. पुस्तक वरकरणी गुन्हा तपासाच्या कादंबरीसारखे आहे. चौदाव्या शतकात एक ‘धर्मगुरू व त्याचा एक शिष्य एका मठात पोचतात आणि तिथे घडणाऱ्या एका खुनांच्या मालिकेचे रहस्य उलगडतात. धर्मगुरू विल्यम हा रॉजर बेकनचा शिष्य, आणि बेकन हा काही लोकांच्या मते ‘पहिला’ वैज्ञानिक, आणि स्फोटक दारूचा संशोधक. युरोपच्या ‘अंधाऱ्या युगातली’ ही कथा.
युनिकॉर्न हा काल्पनिक प्राणी आहे. श्रद्धा (फेथ), आशा (होप) आणि औदार्य (चॅरिटी) ही ख्रिस्ती धर्मशास्त्रातली गुणांची त्रयी आहे.)
आड्सो : पण मग युनिकॉर्न खोटा आहे का?