‘भारतीय दंड विधाना’च्या (Indian Penal Code) कलम 295A नुसार, ‘मुद्दामहून धार्मिक भावना दुखविण्यासाठी कोणत्याही गटाच्या धर्मश्रद्धेचा अपमान करणे’ हा गुन्हा आहे. तसेच, कलम 298 नुसार, ‘मुद्दामहून कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखविण्यासाठी अभिव्यक्त होणे’ हा गुन्हा आहे. देवाचा अपमान करणार्या कृतीमुळे/वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखाविल्या जाऊ शकतात, त्यामुळे ह्या कलमांना ईशनिंदा-बंदी (anti-blasphemy laws) असेही म्हणतात. ही कलमे राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेच्या विरुद्ध कशी आहेत ते पाहू.
कोणताही (एक किंवा अधिक) धर्म स्वीकारण्याचा, आचरण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा किंवा सदसद्विवेकबुद्धीनुसार वागण्याचा मूलभूत हक्क सर्वांना भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 25 अन्वये मिळाला आहे.