चित्रकार प्रभाकर पाचपुते ह्यांच्या खालील चित्रांना आधार आहे तो माध्यमांच्या बेजबाबदार वर्तणुकीचा. प्रसार व प्रचारमाध्यमे ज्या पद्धतीने लोकांच्या मनात अवाजवी भीती पसरवत आहे, त्याचे हे बोलके चित्रण आहे.
दोन दशकांपूर्वी Y2K Bug मुळे (वर्ष २००० मुळे संगणकीय व्यवहारांत आलेला अडथळा) लोकांच्या मनात संभ्रम आणि भीती पसरवण्याचे काम तेव्हाच्या प्रसार आणि प्रचारमाध्यमांनी केले. ३१ डिसेंबर १९९९ च्या मध्यरात्रीपासून संपूर्ण विश्वातील संगणक प्रणाली ढेपाळल्याने आर्थिक जगतात काय हाहाकार माजू शकतो – जणू जगबुडी होऊ घातली आहे – हे मांडून सामान्य लोकांत असमंजस्य निर्माण करण्यात माध्यमांची असलेली भूमिका ह्या चित्रांतून स्पष्ट होते.

