वादपद्धती: उच्च, उदात्त पण वर्णग्रस्त, पक्षपाती!
कौटिल्यीय अर्थशास्त्र, चरकसंहिता, वादविद्या, चातुर्वर्ण्य
——————————————————————————–
भारतीय चर्चापद्धतीचा इतिहास सांगणाऱ्या ह्या लेखमालेच्या ह्यापूर्वीच्या भागांमध्ये आपण आन्वीक्षिकीचा परिचय करून घेतला. ह्या पद्धतीचे उपयोजन तज्ज्ञ मंडळींमध्ये मानवी आरोग्यविषयक चर्चा घडविताना प्रभावी पद्धतीने कसे केले जात होते ह्याचे दाखले चरकसंहितेत अनेक ठिकाणी मिळतात. त्यांतील वादांचे स्वरूप व परिभाषा ह्यांचा परिचय ह्या अंतिम लेखात करून दिला आहे.
——————————————————————————–
“तत्त्वज्ञानाचा निष्कर्ष म्हणून आणि सुफल परिणाम म्हणून विज्ञानाचा जन्म होतो; तात्त्विक अधिष्ठानाअभावी विज्ञान जिवंत राहू शकत नाही.