डॉ. पुरुषोत्तम विश्वनाथ खांडेकर - लेख सूची

प्रो. बा.वि. ठोसर – एक संस्मरण

आजचा सुधारकचे एक लेखक आणि या मासिकाबद्दल विशेष आस्था बाळगणारे प्रोफेसर बा.वि. ठोसर यांचे नुकतेच निधन झाले. नागपूरच्या विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर काही वर्षे त्यांनी त्याच महाविद्यालयात अध्यापन केले. नंतर ते बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे सर सी.व्ही. रामन यांचेकडे संशोधन करण्यासाठी गेले. इंग्लंडमधून पीएच.डी. मिळविल्यानंतर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च या …

विश्वाची उत्पत्ती

विश्वाच्या (ब्रह्मांडाच्या) स्वरूपाविषयी डॉ. र.वि. पंडित यांनी (आ.सु. ८.७; २०७-२०८) बरेच प्रश्न विचारले आहेत. त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी हा लेख. प्राचीन मते : विश्वाच्या पसाच्याबद्दल, त्याच्या उत्पत्तीविषयी धर्मग्रंथात आणि तत्त्वचिंतकांमध्ये विविध मते होती. मनुष्याची दृष्टी मर्यादित असल्यामुळे दृष्टीस पडलेल्या घटनांच्या आधारावर प्रतिपादन केलेली विचारसरणी संकुचित स्वरूपाची नसती तरच नवल. बायबल, कुराण यांसारख्या धर्मग्रंथांत विश्वाची आणि सर्व …

रहस्य, जीवोत्पत्तीचे

रोम येथील व्हॅटिकनच्या सिस्टीन चॅपेलच्या छतावर Creation of Adam हे चित्र रखाटले आहे. मुळामध्ये शिल्पकार असूनही चित्रकार बनलेल्या मायकेल अँजेलोची ही भव्य कलाकृती आहे. या चित्रात निवृक्ष टेकडीवर पहुडलेल्या अॅडमने आपला डावा बाहू पुढे केलेला आहे. आकाशातून परमेश्वर देवदूतांसह अवतीर्ण होत आहे; त्याने अॅडममध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आपल्या उजव्या हाताची तर्जनी अॅडमच्या पुढे केलेल्या हाताच्या तर्जनीजवळ …

अंतर्ज्ञान : एक अहवाल

काही व्यक्तींना दिव्यदृष्टी प्राप्त झालेली असते, तिच्या योगाने त्यांना अतींद्रिय मार्गाने ज्ञान मिळू शकते अशी अनेक लोकांची पक्की धारणा असते. या समजुतीत कितीतथ्य आहे याबद्दल एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. (त्याचा गोषवारा ११ डिसेंबर १९९५ च्या टाइम या नियतकालिकात आला आहे). या विषयामध्ये संशोधन करून त्याविषयी शहानिशा करण्यासाठी अमेरिकेमध्ये एक प्रकल्प राबविला. अमेरिकेजवळ द्रव्याची …

अन्तर्ज्ञानाचा पाया भक्कम नाही

टॉप क्वार्कचा शोध लागल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या ९ एप्रिल ९५च्या अंकात आणि त्याच्या आधारे प्रा. काशीकरांचा लेख आजच्या सुधारकच्या प्रस्तुत अंकात प्रसिद्ध झाला आहे. अॅनी बेझंट आणि लेडबीटर यांनी भौतिक आणि रसायनशास्त्रातील विशेषेकरून अणुसंरचनेविषयी काही संकल्पना अंतर्दृष्टीने प्राप्त करून पूर्वीच प्रतिपादन केल्या होत्या. यावरून अंतर्दृष्टीने ज्ञान मिळू शकते असे मत ध्वनित करण्यात येत आहे. परंतु …

क्वांटम भौतिकी आणि तत्त्वज्ञान

या शतकाच्या आरंभी भौतिकीमध्ये दोन क्रांतिकारी शोध लागले. आइन्स्टाइनप्रणीत सापेक्षता-सिद्धान्ताने निरपेक्ष अवकाश, काल आणि गती याविषयीच्या जुन्या कल्पनांना तिलांजली दिली. या सिद्धान्ताने न्यूटोनीय यांत्रिकीमुळे भक्कम पायावर प्रस्थापित झालेल्या कार्यकारणभावाच्या आणि नियतिवाद (causality and determinism) या तत्त्वांना मुळीच धक्का पोहोचला नाही. परंतु क्वांटम यांत्रिकीने मात्र या तत्त्वांना प्रचंड हादरा दिला. आधुनिक भौतिकीचा आधार अनिश्चितता तत्त्व आहे …

अध्यात्म की विज्ञान

आधुनिक विज्ञान हे अध्यात्माच्या जवळ चालले आहे असे मत अनेक वेळा प्रदर्शित करण्यात येते; अशा अर्थाची काही पुस्तकेही प्रसिद्ध झाली असून काही पाश्चात्त्य वैज्ञानिकांनीही या विधानाचे समर्थन केले आहे. परंतु खरोखर अशी वस्तुस्थिती आहे काय याविषयी आज विचार करणे आवश्यक झाले आहे. अध्यात्मातील काही संकल्पना :अध्यात्म म्हणजे आत्म्याचा शोध! त्याचे प्रयोजन म्हणजे आत्मा आणि परमात्मा …