सुकल्प कारंजेकर - लेख सूची

कृत्रिम बुद्धिमत्तेचा आईन्स्टाईन

आज ताऱ्यांचे आणि तारकाविश्वांचे वर्गीकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते आहे. जनुकांमधील DNA च्या घटकक्रमानुसार कुठल्या आकाराची प्रथिने बनतील हे कृत्रिम बुद्धिमत्ता शोधते आहे. जगभरातील हवामानखात्यांच्या उपकरणांकडून, उपग्रहांकडून मिळणाऱ्या प्रचंड माहितीच्या आधारे हवामानाचा अंदाज बांधण्याचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता करते आहे. ड्रोनने, उपग्रहांनी घेतलेल्या हजारो छायाचित्रांच्या आधारे स्थलांतर करणारे पक्षी, प्राणी यांच्या गणनेचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता …

गोष्ट विचारांच्या प्रवासाची

माहिती जनुके, सेल्फिश जीन , रिचर्ड डॉकिन्स, इन्टरनेट —————————————————————————– सामाजिक माध्यमांद्वारे कसलाही आधार नसलेले समाजविघातक विचार कसे वेगाने पसरविले जात आहेत, हे आपण अनुभवीत आहोत. त्यामागील शास्त्रीय कारणपरंपरा उलगडून दाखविणारा हा उद्बोधक लेख —————————————————————————– अलिकडच्या काळात लोक इंटरनेटचा वापर  प्रामुख्याने आपले राजकीय अथवा धार्मिक विचार पसरविण्यासाठी करतात असे दिसून येते आहे. अशा विचारांची बीजे memes …

डाव्या चळवळीत धर्माचे स्थान

ख्रिश्चन धर्म, डावा विचार, समाजपरिवर्तन, भांडवलशाही ————————————————————————— सध्याचे दिवस धर्माला अफूची गोळी मानून त्याच्यापासून दूर राहण्याचे नाहीत. ख्रिश्चन धर्माची मूलतत्त्वे डाव्या विचारांच्या खूप जवळची आहेत. त्याचे नाते भांडवलशाहीशी जोडणे ही धनदांडग्यांची चलाखी आहे. धर्मातील पुरोगामी प्रवाहाशी नाते जोडले तर डाव्या चळवळींना अमेरिकन राजकारणातील कोंडी फोडता येईल असे प्रतिपादन करणारा लेख. ————————————————————————— गेल्या काही दशकांत अमेरिकेत …

देवाचे मन जाणताना

विश्वनिर्मिती, ईश्वर संकल्पना, विवेकवाद विज्ञानाच्या मदतीने मानवाने अतिशय थोड्या कालावधीत विश्वनिर्मितीचा कूटप्रश्न सोडविण्याच्या दिशेने दमदार वाटचाल केली आहे.जागतिक तापमानवाढ व वाढती शस्त्रास्त्रस्पर्धा यांतून मानवजात अजून 500 वर्षे तग धरून राहिली तर ह्या प्रश्नाच्या उत्तराच्या खूप जवळ आपण पोहचू शकू. पण हे कोडे त्याला पूर्णपणे उलगडले तरी ईश्वर ह्या संकल्पनेला फारसा धक्का बसणार नाही. ती संकल्पना …

अमेरिकेचे राष्ट्रगीत

‘सूर्याच्या पहिल्या किरणांसवे, धुक्याच्या पडद्याआड ज्याचे दर्शन होत आहे तो ध्वज कालच्या काळरात्रीनंतर अजूनही दिमाखाने झळाळतो आहे. अग्निबाण आणि बारुदी गोळ्यांच्या माऱ्यात आणि लालतांबड्या आगीच्या लोळातही आमचा राष्ट्रध्वज खंबीरपणे झळाळतो आहे. जोपर्यंत युद्धभूमीवर आमच्या राष्ट्रध्वजाचे दर्शन होत राहील तोपर्यंत ह्या वीरांच्या आणि स्वातंत्र्याच्या भूमीसाठी आम्ही लढा देत राहू. (अमेरिकन राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या कडव्याचा स्वैर भावार्थ) एखाद्या …

महाभारत आणि कॉस्मॉस

माझी अगदी लहानपणाची टीव्ही पाहायची पहिलीवहिली आठवण म्हणजे महाभारतमालिका. त्याकाळात रंगीत टीव्ही खूप कमी असायचे. आमच्या घरी रंगीत टीव्ही असल्यामुळे शेजारीपण महाभारत पाहायला घरी यायचे. आमची बैठकखोली लोकांनी भरून जायची. महाभारतमालिकेच्या आधी आलेली रामायणमालिका मला फारशी आठवत नाही तेव्ही मी वयाने फार लहान होतो पण महाभारत मात्र मी आवर्जून पाहात असे. नवरससंपूर्ण पौराणिक कथा, अप्रतिम …

आयन रँडचा भांडवलवाद

जर कुणी स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत असेल तर त्याने मानवाच्या व्यक्तिगत हक्कांचाही पुरस्कार केला पाहिजे, जर कोणी मानवाच्या व्यक्तिगत हक्कांचा पुरस्कार करीत असेल तर त्याला त्याच्या स्वतःच्या आयुष्यावरील हक्काचा, त्याच्या स्वातंत्र्याचा, त्याच्या स्वतःच्या सुखलोलुपतेचाही पुरस्कार केला पाहिजे, ह्याचाच अर्थ असा की त्याने अशा हक्कांना संरक्षण व त्यांची हमी देणारी राज्यव्यवस्था म्हणजेच भांडवलवादाची राजकीय आर्थिक व्यवस्था हिचाच …