खरी स्त्रीमुक्ती कशात आहे - लेख सूची

खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग १)

साधना साप्ताहिकाच्या २८ मे १९९४ च्या अंकामध्ये श्रीमती शांता बुद्धिसागर ह्यांचा ‘खरी स्त्रीमुक्ति कोठे आहे?’ हा लेख प्रकाशित झाला आहे. त्यांनी ‘चारचौघी‘ ह्या नाटकाची सविस्तर चर्चा करून शेवटी आपले मत व्यक्त केले आहे. त्यात त्या म्हणतात की, “काही मूल्ये—विचार हे शाश्वत स्वरूपाचे असतात. सध्या आपण अशा तर्‍हेची विचारधारा तरुणांच्या पुढे ठेवीत आहोत की स्त्रीपुरुष कोणत्याही जातिधर्माचे …

चर्चा -खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग २)

आजचा सुधारक ऑगस्ट १९९४ च्या अंकात मी एका प्रक्षोभक विषयाला हात घातला होता. त्यात स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रीला मानाने वागविणे, तिच्या विवेकशक्तीचा आदर करणे, तिच्या कोणत्याही (यामध्ये योनिविषयक वर्तनही आले) वर्तनामधील औचित्यानौचित्याविषयी तिला स्वतन्त्रपणे निर्णय करता येतो असा विश्वास तिच्या स्वतःच्या व इतरांच्या ठिकाणी निर्माण करणे ह्या गोष्टींचा मी ओझरता उल्लेख केला होता. आज त्याचा थोडा …

चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ३)

मागच्या लेखांकात प्रा.म.ना. लोही ह्यांच्या सविस्तर पत्राचा मी उल्लेख केला होता. त्यांच्या लेखामधील महत्त्वाचा अंश घेऊन त्यावर मी माझे म्हणणे पुढे मांडणार आहे. मजकडे आलेले लेख किंवा पत्रे ही स्वतंत्रपणे लिहिलेली व वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेली असल्यामुळे त्यात कोठे कोठे पुनरुक्ती आहे, तसेच त्यांच्या काही भागांचा संक्षेप करता येण्याजोगा आहे असे वाटल्यावरून त्यांच्या मुद्द्यांचा तेवढा परामर्श …

चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ४)

स्त्रीपुरुषसमागमाची किंवा योनीची व पावित्र्याची जी सांगड आमच्या मनामध्ये कायमची घातली गेली आहे ती मोडून काढण्याची, त्यांची फारकत करण्याची गरज मला वाटते, कारण मी पूर्ण समतेचा चाहता आहे. माझ्या मते समता आणि पावित्र्य ह्या दोन्ही एकत्र, एका ठिकाणी नांदू शकत नाहीत. एका वस्तूला कायमची पवित्र म्हटले की दुसरी कोणतीतरी नेहमीसाठी अपवित्र ठरते. म्हणजेच एक श्रेष्ठ …

चर्चा -खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ५)

स्त्रियांची मागणी असो की नसो, त्यांची इच्छा असो की नसो, त्यांची मुक्ती झाली पाहिजे, इतकेच नव्हे तर त्या मुक्तीचा एक अविभाज्य वा अपरिहार्य अंश म्हणून म्हणा, त्याचे आवश्यक अंग म्हणून म्हणा किंवा त्याचा एक अनिवार्य पैलू म्हणून म्हणा, त्यांना लैंगिक स्वातंत्र्य दिले पाहिजे ह्या निष्कर्षावर मी येऊन ठेपलो असल्याचे मी पूर्वीच्या लेखांकांमधून सांगितलेले आहे. स्त्रियांची …

चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?

फेब्रुवारी १९९५ अंकामध्ये माझ्या लेखमालेचा पाचवा भाग प्रकाशित झाल्यानंतर मला जी पत्रे आली ती पुढे दिली आहेत. बहुतेक सार्‍या पत्रलेखकांनी सध्याच्या स्त्रीपुरुषसंबंधविषयक संकल्पनांमुळे मुख्यतः स्त्रियांवर गुलामगिरीसदृश अन्याय होतो ह्या माझ्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे, त्याबद्दल मौन बाळगले आहे. त्यांनी सद्यःपरिस्थितीमध्ये माझ्या कल्पना कश्या व्यवहार्य नाहीत, रोगापेक्षा उपचार कसा भयंकर आहे, मी कसा स्वप्नात वावरत आहे …

चर्चा : खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ६)

स्त्रियांवर अन्याय करणारी, मुख्यतः त्यांनाच दुःखात लोटणारी विवाहसंस्था व तिच्यासोबत उदय पावलेले अनेक समज- उदा. पातिव्रत्य, प्रत्यक्ष परमेश्वरानेच घालून दिलेल्या पतिपत्नींच्या गाठी, जन्मोजन्मी एकच पती असावा असा फक्त स्त्रियांवर केला जाणारा संस्कार, (जन्मोजन्मी एकच पत्नी असावी असा पुरुषाने विचार करून त्यासाठी काम्य व्रतांचे पालन केल्याचे कोठे ऐकिवात नाही. उलट त्याने आपल्या धर्मपत्नीला टाकून देऊन तिची …

खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ७)

उद्याचे जग आजच्यापेक्षा जास्त न्यायपूर्ण आणि त्यामुळे अधिक सुखी असावे असे विधान मी केले तर माझ्याशी कोणी विवाद करणार नाही. पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांवर आज अधिक बन्धने आहेत. आणि त्यांची स्वायत्तता आज कमी आहे हे माझे विधानही बहुधा विरोधाशिवाय स्वीकारले जाईल. इतकेच नाही तर पूर्वीच्या मानाने ती बंधने आता कमी होत चालली असून स्त्रीची शारीरिक आणि …

खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ८)

ऑगस्ट अंकामध्ये म्हटल्याप्रमाणे मी प्रा. श्याम कुळकर्णी ह्यांच्या पत्रातील काही शिल्लक मुद्यांचा परामर्श घेतो व त्यानंतर ह्या चर्चेचा समारोप करतो. हा विषय आता समारोपापर्यन्त आला आहे असे वाटण्याचे कारण माझा दृष्टिकोन आता वाचकांच्या लक्षात आला आहे असे माझ्या ज्यांच्याज्यांच्याशी भेटी झाल्या त्यांनी मला प्रत्यक्ष सांगितले आहे. मी त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. मला अभिप्रेत स्वायत्तता स्त्रियांना …