मासिक संग्रह: डिसेंबर, १९९०

वा.म.जोशी यांची नीतिमीमांसा

वा.म.जोशी ह्यांचा नीतिशास्त्रप्रवेश हा ग्रन्थ १९१९ साली प्रसिद्ध झाला. ह्यात नीतिशास्त्राच्या त्यावेळी चर्चिल्या जाणार्‍या सर्व प्रश्नांचे सांगोपांग विवेचन आले आहे. हे विवेचन करताना भारतीय आणि पाश्चात्य प्रमुख नीतिमीमांसकांची मते तर त्यांनी विचारात घेतलीच, पण त्यांची तौलनिक चिकित्साही स्वतंत्र बुद्धीने केली. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्याला आज सत्तर वर्षे होऊन गेली आहेत. परंतु अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेली एकदोन पुस्तके सोडली तर नीतिशास्त्रप्रवेशाच्या तोडीचे किंवा त्याच्या जवळपासही जाऊ शकेल असे पुस्तक मराठीत झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे.

या लेखात या संपूर्ण ग्रंथाचा परामर्श घेण्याचा विचार नाही.

पुढे वाचा

कै.वा.म. जोशी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने

२१ जानेवारी १९८२. बरोबर १०० वर्षापूर्वी याच दिवशी कुलाबा जिल्ह्यातील तळे या गावी वामन मल्हार जोशी ह्यांच्या रूपाने सौजन्य मूर्त झाले. थोर तत्त्वज्ञ, युगप्रवर्तक कादंबरीकार, निस्सीम सत्योपासक, वाचकांना विचार करावयास शिकविणारे समर्थ अध्यापक, इत्यादी अनेक नात्यांनी वा. म. जोशी आपल्याला परिचित आहेत. परंतु महाराष्ट्रास सर्वाधिक प्रभावित केले ते त्यांच्या सौजन्याने. सौजन्य हा त्यांच्या आचाराचा, विचाराचा, लेखनाचा के अध्यापनाचा स्थायीभाव होता. सहिष्णुता, वात्सल्य, प्रेम, त्याग, साधुत्व हे गुण त्यांच्या अंगाखांद्यावर एखाद्या लडिवाळ बालकाप्रमाणे निर्धास्तपणे खेळत, बागडत. आपल्या साठ वर्षांच्या आयुष्यात त्यांना अनेक खडतर प्रसंगांना तोंड द्यावे लागले.

पुढे वाचा

विवाह आणि नीती – प्रकरण ८

लैंगिक ज्ञानावर प्रतिषेध (Taboo)
(उत्तरार्ध)

या प्रकरणात मी लैंगिक आचार कसा असावा याचा विचार करीत नसून, लैंगिक विषयांच्या ज्ञानासंबंधी आपली अभिवृत्ती (attitude) काय असावी याचा विचार करतो आहे. अल्पवयीन मुलांना लिंगविषयक ज्ञान देण्याच्या संबंधात आतापर्यंत मी जे म्हटले त्यास सर्व प्रबुद्ध आधुनिक शिक्षणतज्ज्ञांची सहानुभूती माझ्या बाजूने आहे अशी मला आशा आणि विश्वासही आहे. परंतु आता मी एका अधिक विवाद्य मुद्दयाकडे येतो आहे, आणि त्याविषयी वाचकाची सहानुभूती प्राप्त करण्यात मला अधिक अडचण येईल अशी मला भीती वाटते. हा विषय म्हणजे अश्लील साहित्याचा.

पुढे वाचा

विवेकवाद-९

नीतिविचार धर्मविचाराहून निराळा
नवा सुधारकाच्या ऑक्टोबर अंकाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या आगरकरांच्या उतार्‍याचे शीर्षक आहे,‘नीतिविचार धर्मविचाराहून निराळा’. या विषयावर स्पष्टीकरणात्मक असे काही लिहावयाचा आज विचार आहे.

आजपर्यंत ‘विवेकवाद’ या शीर्षकाचे जे आठ लेख प्रसिद्ध झाले आहेत त्यांसंबंधाने काही चमत्कारिक विचारणा आमच्याकडे केल्या गेल्या आहेत. एक वाचक म्हणाले की तुमच्या विवेकवादात भावनांना काहीच स्थान नाही काय? तुमच्या लेखांवरून आमचा असा समज झाला आहे की तुम्हाला फक्त तर्ककर्कश गोष्टीच मान्य दिसतात. तुमच्या व्यवस्थेत भावनेला काहीच स्थान दिसत नाही. दुसरे एक वाचक म्हणाले की तुम्ही धर्मावर असे तुटून पडला आहात की तुमच्या विवेकवादात केवळ सुखप्राप्तीलाच तेवढे स्थान आहे.

पुढे वाचा

वा. म. जोशी यांच्या स्त्रीजीवनविषयक चिंतनातील माघार

प्रस्तुत लेखात कै. दा.म. जोशी यांच्या कादंबर्‍यांच्या साह्याने त्यांच्या स्त्रीजीवनविषयक चिंतनाचा आलेख काढण्याचे योजिले आहे. तात्त्विक कादंबर्‍यांचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या लेखकाच्या कादंबर्‍यांत त्याच्या तत्त्वचिंतनाचे प्रतिबिंब पडलेले असेल असे मानणे गैर ठरू नये.

जोश्यांच्या कादंबरीलेखनाचा काल १९१५ ते १९.३० असा वीस वर्षांचा आहे. या अवधीत त्यांनी एकूण पाच कादंबर्‍या लिहिल्या. या पाचही कादंबर्‍यांचा विषय प्रामुख्याने एकच — म्हणजे स्त्रीजीवन — आहे. विसाव्या शतकाच्या आरंभी भारतीय समाजजीवनात जे मन्वंतर सुरू झाले होते, त्यातील महाराष्ट्रीय स्त्रीच्या जीवनात निर्माण झालेल्या समस्यांची समीक्षा या कादंबर्‍यांत त्यांनी केलेली आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक,
नवा सुधारक
स.न.वि.वि.
नवा सुधारकच्या नोव्हे. ९० अंकातील साथी पन्नालाल सुराणा यांचे पत्र वाचले. त्यांचा आक्षेप मुख्यतः माझ्या लेखातील (नवा सुधारक, ऑक्टो. ९०) प्र.१८ वरील दुसर्‍या परिच्छेदाच्या संदर्भात आहे. त्यातील मांडणी जास्त काटेकोरपणे व संयमाने होणे गरजेचे होते. सर्वश्री ना.ग. गोरे, मधु लिमये व मृणाल गोरे यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. तत्त्वासाठी त्यांनी किंमत दिलेली मला माहीत आहे. या लिखाणाबद्दल श्री सुराणा यांना वाईट वाटले याबद्दल मी दिलगीर आहे.

श्री. सुराणा लिहितात तशी मी मुद्दयांची गल्लत केलेली नाही. आपल्या राज्यघटनेने शैक्षणिक आणि समाजिक दृष्ट्या मागास असणार्‍या गटांना समान संधी मिळाली पाहिजे असे जे सांगितलेले आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे.

पुढे वाचा