मासिक संग्रह: मे, १९९१

पुस्तक परिचय

पुस्तक परिचय: भारतीय स्त्रीजीवन- ले. गीता साने (मौज प्रकाशन मुंबई)
गीता सान्यांचे ‘भारतीय स्त्रीजीवन’ हे पुस्तक १९८६ साली प्रकाशित झाले असले आणि गेल्यावर्षी त्याला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला असला तरी त्याच्याकडे अजून मराठीतील क्रियाशील आणि चोखंदळ वाचकांचे वाचकाचे म्हणावे तसे लक्ष गेले आहे असे वाटत नाही. कारण त्यात कथन केलेले अनुभव इतके दाहक आणि विचार इतके विद्रोही आहेत की त्याने हा वाचकवर्ग कळवळून उठला तरी असता किंवा खवळून विरोधी गञ्जना तरी करू लागला असता. परंतु गेल्या पाच वर्षात या पुस्तकाच्या अनुषंगाने असली आवाहने किंवा साद-पडसाद कानावर आले नाहीत एवढे मात्र खरे.

पुढे वाचा

मार्क्सवादः पुनर्मूल्यांकन-काही प्रश्न

[मार्च १९९१ च्या अंकात जाहीर केलेल्या दोन परिसंवादांच्या विषयांपैकी धर्मनिरपेक्षता’ या विषयाची अपेक्षित व्याप्ती दाखविणारे प्रश्न एप्रिल १४ व्या अंकात प्रसिद्ध केले आहेत. आज दुसर्‍या विषयावरील – माक्र्सवादावरील प्रश्न देत आहोत. ही प्रश्नावली आमचे मित्र हा विश्वास कानडे आणि डॉ निवास खाईवाले यांनी तयार केली आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत. पहिल्या परिसंवादाप्रमाणे चर्चेत भाग घेण्यासाठी आम्ही काही व्यासंगी विद्वानांना झामन्नत करत आहोत. परंतु या परिसंवादात आमच्या वाचकांनाही भाग यावा अश विनंती आहे.
– संपादक]
माक्र्सवाद है सामाजिक असमतोलाचे निदान करण्याचे आणि सामाजिक परिवर्तनाचे दिग्दर्शन करण्याचे एक प्रभावी साधन म्हणून प्रतिष्ठा पावले होते.

पुढे वाचा

धर्म, धर्मनिरपेक्षता, आणि त्यांमधून उद्भवणारे काही प्रश्न – १

आणखी काही दिवसांनी आम्हाला मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावयाचे आहे. मागच्या निवडणुकीमध्ये विविध पक्षांचे जे बलाबल होते त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय अस्थैर्य हा आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये फार मोठा अडथळा आहे हे कोणालाही मान्य होईल. ह्या वेळच्या ह्या राजकीय अस्थैर्याचे मूळ अलीकडे वाढलेल्या धर्माभिमानामध्ये आणि धर्माच्या आधारावर स्वतःला अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक मानण्यामध्ये आहे असे मला वाटते. त्याचप्रमाणे हा धर्माभिमान वाढविण्याची जबाबदारी हिन्दनेतृत्वाची आहे असेही मला वाटते. धर्म आणि धर्मनिरपेक्षता ह्या विषयांना सध्या फार महत्त्व आलेले आहे व कोणाचे काही चकत आहे की काय चुकत असल्यास काय चुकत आहे हे पाहण्याचा यत्न आवश्यक झाला आहे, हिन्दुनेतृत्व काय म्हणते?

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १२)

आजचे कुटुंब आपण प्रकरण २ आणि ३ यांत मातृवंशीय आणि पितृसत्ताक कुटुंब आणि लैगिक-नीतिविषयक प्रारंभिक कल्पनांवर त्यांचा परिणाम यांचा विचार केला याचे वाचकाला एव्हाना विस्मरण झाले असेल. ती कुटुंबविषयक चर्चा फिरून सुरू करण्याची वेळ आता आली आहे, कारण लैंगिक स्वातंत्र्यावर निर्बध घालण्याचा एकमेव विवेकी आधार कौटुंबिक जीवनात आढळतो. कामवासना आणि पाप यांच्यावरील दीर्घ चर्चा आता संपली आहे. काम आणि पाप यांतील संबंध ख्रिस्ती धर्माने निर्माण केला नाही हे खरे, पण त्याने त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला, आणि तेथूनच तो आपणा बहुतेकांच्या नैतिक अवधारणांत (moral judgements) मूर्त झाला आहे.

पुढे वाचा

विवेकवाद – १२

उपयोगितावाद (Utilitarianism)

‘आजचा सुधारक’च्या डिसेंबर-जानेवारी अंकात ‘नीतिविचार धर्मविचाराहून निळा’ या लेखात नीतीचे धडे विवेचन केले होते. आज ते विवेचन अधिक विस्ताराने करण्याचा विचार आहे.

पाश्चात्य नीतिशास्त्राच्या इतिहासात पहिल्यापासूनच दोन परस्परविरुद्ध विचारसरणी किंवा संप्रदाय दिसून येतात. एवढेच नव्हे तर या दोन विचारसरणी परस्परांच्या शेजारी शतकानुशतके चालत आलेल्या आहेत. ह्या दोन संप्रदायांना आपण तापसवादी आणि तृप्तिवादी अशी नावे देऊ शकतो. यापैकी पहिल्या संप्रदायाचे प्रतिपादन असे आहे की वासना किंवा इच्छा हे सर्व दुःखांचे मूळ आहे, म्हणून वासना जिंकणे, किंवा वासनाक्षय हा मानवाच्या हिताचा मार्ग आहे; तर दुसर्‍याचे प्रतिपादन असे आहे की जास्तीत जास्त इच्छची जास्तीत जास्त पूर्ती करणे यात मानवाचे हित आहे.

पुढे वाचा

संत आणि चातुर्वण्र्य

चातुर्वण्याविरुद्ध आजवर अनेक बंडे झाली. त्यांत महाराष्ट्रातील भागवतधर्मी साधुसंतांचे बंड़ प्रमुख होय. पण या बंडातील लढा अगदी निराळा होता. मानवी ब्राह्मण श्रेष्ठ की भक्त श्रेष्ठ असा तो लढा होता. ब्राह्मण मानव श्रेष्ठ की शुद्र मानव श्रेष्ठ हा प्रश्न सोडविण्याच्या भरीस साधुसंत पडले नाहीत. या बंडात साधुसंतांचा जय झाला व भक्तांचे श्रेष्ठत्व ब्राह्मणांना मान्य करावे लागले. तरीसुद्धा या बंडाचा चातुर्वण्र्यविध्वंसनाच्या दृष्टीने काहीच उपयोग झाला नाही. असे म्हणता येईल की तुमचे चातुर्वण्र्य तुम्ही ठेवा, आम्ही भक्त होऊ व तुमच्यातील श्रेष्ठ गणल्या गेलेल्या ब्राह्मणांना लाजवू, अशी अहंमान्यता धरून संतांनी चातुर्वण्र्याला मुळीच धक्का लावला नाही.

पुढे वाचा