मासिक संग्रह: जुलै, १९९२

पुस्तक परिचय

शास्त्रीय विचारसरणीची मीमांसा, ले. राजीव जोशी, मनोविकास प्रकाशन, मुंबई (१९८९), पृ. १०९, किं. रु. १६/-
‘शास्त्रीय विचारसरणीची मीमांसा’ हे शीर्षक असलेल्या शंभर पानी पुस्तिकेत तिचे लेखक डॉ. राजीव जोशी यांनी बुद्धिप्रामाण्यवाद, वैज्ञानिक पद्धति, धर्म, ईश्वर, अंधश्रद्धा इ. अनेक विषयांवर बरेचसे विवेचन केलेले आहे. पुस्तिकेचे शीर्षक पाहिल्यानंतर हा एक सलग निबंध असावा असे वाटले, पण विविध लेखांचा तो केवळ एक संग्रह आहे हे प्रस्तावना व अनुक्रमणिका वाचल्यानंतर लक्षात आले.
परीक्षणाच्या सोयीसाठी या पुस्तिकेतील निबंधांचे दोन गटांत विभाजन करता येईल. पहिल्या गटात लेख क्र.

पुढे वाचा

चर्चा- डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे यांच्या लेखाबद्दल

डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे यांचा मार्च ९२ च्या अंकातील ‘मरू घातलेली जात’ हा लेख, एप्रिल ९२ च्या अंकातील श्री. केशवराव जोशी यांचे पत्र वाचल्यावर पुन्हा एकदा वाचला. त्यावरील प्रतिक्रिया.
डॉ. वर्‍हाडपांडे यांच्या प्रतिपादनाप्रमाणे मार्क्सवाद संपला आहे. ठीक आहे. मग त्याबद्दल इतका त्रागा करून लेख लिहिण्याची गरज कशासाठी?
वस्तुस्थिति अशी आहे की सगळ्या जगालाच मार्क्सवादाचा स्वीकार करणे अनिवार्य होणार आहे. कारण मानवतावाद हा मार्क्सवादाचा केंद्रबिंदु आहे. मार्क्सवाद हा अर्थशास्त्रापुरताच मर्यादित आहे हा चुकीचा समज आहे. मानवाशी संबंध असलेला कोणताच विषय मार्क्सवादाला वर्ण्य नाही.

पुढे वाचा

चर्चा- विवेकवादातील भोंगळ नीतिविचार

‘विवेकवाद’ या शीर्षकाच्या अंतर्गत प्रा. दि. य. देशपांडे यांनी नीतिविचाराची स्वमते चिकित्सक मांडणी ‘आजचा सुधारक’ या मासिकाच्या अनेक अंकातून लेखमाला लिहून चालविली आहे. त्याविषयी त्यांना विचारण्यात आलेल्या शंकांची उत्तरे त्यांनी विवेकवाद – २० (एप्रिल ९२) मधून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःला विवेकवादी म्हणवून घेणार्‍या मंडळींचे नीतिविषयक विचार यामुळे एकत्रित वाचावयाला मिळतात हा या लेखमालेचा अभिनंदनीय विशेष आहे. कांटवादी नीतिमीमांसेला उपयोगितावाद्यांच्या नीतिविचारांची जोड देऊन त्यांनी ही जी ‘अभिनव मांडणी केली ती शक्य तो त्यांचेच शब्द वापरून संकलित केल्यास पुढीलप्रमाणे दिसते. नीतिविचार हा मानवाशी संबंधित आहे.

पुढे वाचा

ताराबाई मोडक (उत्तरार्ध)

पंडिता रमाबाई आणि ताराबाई यांच्यात पुष्कळच साम्य आहेः दोघींनीही शिक्षण क्षेत्रात मूलगामी कार्य केले. खाजगी जीवनात पति-सुखाची तोंडओळख होते न होते तोच त्याने कायम पाठ फिरवली. एकुलती कन्या तरुण असतानाच मरण पावली. दोघींनीही प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत आपले काम उभे केले, इ.इ. पण एका बाबतीत यांच्यात फरक आहे.आणि तो फार मोठा आहे. पंडिता धर्मनिष्ठ होत्या. त्या ख्रिस्ती झाल्या. प्रेम, सेवा या ख्रिस्त शिकवणुकीने त्या भारल्या होत्या. Faith, Hope and Charity (श्रद्धा, आशा, नि परोपकार) ही त्रिसूत्री मिशनच्यांचे ब्रीद आहे. तीमुळे आपण ईश्वराचे काम करीत आहोत अशी दृढश्रद्धा पंडिताबाईंना सहजच बळ देत होती.

पुढे वाचा

परिणामशून्य होमिऑपथी

१८ व्या शतकाच्या शेवटी सॅम्युएल हानेमान या जर्मन डॉक्टरने होमिऑपथीचे मूळ तत्त्व सुलभ रूपात मांडण्यास सुरुवात केली. त्याच्या काळातील प्रचलित वैद्यकीय उपचारपद्धतीमध्ये जळवा लावणे, कोठा साफ करणे व इतर उपचार यांनी लाभ होण्याऐवजी हानीच जास्त व्हायची. हे पाहून खरे तर हानेमान व्यथित झाले होते. मयुरी क्लोराईडसारख्या औषधामुळे होणार्‍या विषबाधेची त्यांना चिंता वाटत असे. त्यांनी नंतर समानांचा नियम” (Law of Similars) विकसित केला – रुग्णाच्या लक्षणांसारखी लक्षणे उत्पन्न करणारे औषध अल्प प्रमाणात देऊन रोगाचे निर्मूलन करणे. Let likes be treated by likes.

पुढे वाचा

धर्म वेगळा, रिलिजन वेगळा

भारतीय संविधानानुसार भारत हे जसे लोकशाहीप्रधान राज्य तसेच ‘सेक्युलर’ म्हणजे ‘धर्मनिरपेक्ष’ राज्य आहे. इंग्रजी भाषेतील ‘रिलिजन’ला समानार्थी शब्द म्हणून ‘धर्म’चा वापर करण्यात येतो. ‘धर्म’ व ‘रिलिजन’ या संकल्पना एक नव्हेत. ‘सेक्युलर म्हणजे ‘रिलिजन’निष्ठ राज्य नाही; तर धर्मप्रधान राज्य होय. परंतु ‘धर्म व रिलिजन’ यांचा समानार्थी वापर केल्यामुळेच ‘सेक्युलर’चा देखील चुकीचा अर्थ लावण्यात आला हे यथामति सांगण्याचा येथे प्रयत्न केला आहे.
जो राजकीय पक्ष संविधानाशी एकनिष्ठ नाही, त्यास निवडणुकांत भाग घेता येणार नाही. निवडणुकीच्या प्रचारात धार्मिक भावनेस आवाहन करून प्रचार केल्याचे सिद्ध झाल्यास न्यायालय विजयी उमेदवाराची निवड रद्द करू शकते.

पुढे वाचा

विवाह आणि नीती

बहुजनसमाजास ही नीती अजून कळू लागली नाही, व केवळ विवाहबाह्य समागम म्हणजेच अनीती अशी त्याची समजूत आहे. शास्त्रीयदृष्ट्या विवाहाचा व नीतीचा बिलकुल संबंध नाही; किंबहुना विशिष्ट वयोमर्यादेपुढे पत्नीवर बळजबरी करण्याचा कायदेशीर हक्क पतीस असल्यामुळे, व विवाहबाह्य समागमात बळजबरी कायदेशीर नसल्यामुळे विवाह हीच कायदेशीर अनीतीस सवड आहे. तथापि धार्मिक वेडगळांस हे कळत नाही, व विवाहबाह्य समागम करणारांस सामाजिक त्रास होण्याची खात्रीच असते; कारण समाज कितीही दुबळा असला तरी त्रास देण्याची शक्ती त्याला असते. अर्थात् यामुळे विवाहबाह्य समागम किंवा व्यभिचार बंद झालेला नाही, मात्र तो समाजाच्या नजरेस येणार नाही अशी खबरदारी लोक घेतात इतकेच …… अशा वेळी समागम करणार्‍या पुरुषाच्या पदरात अनीती येते, कारण त्यापासून अशा स्त्रीची समाजात फजीती होईल, इतकेच नव्हे तर तिचे उपजीविकेचे साधन नाहीसे होऊन तिच्यावर वेश्यावृत्तीचा प्रसंग येईल…….

पुढे वाचा