मासिक संग्रह: सप्टेंबर, १९९४

पत्रव्यवहार

श्री. सम्पादक आजचा सुधारक यास
स.न.वि.वि.
ऑगस्ट ९४ च्या आजच्या सुधारकमध्ये श्री. पळशीकर ह्यांचे ‘निसर्गाकडे परत चला ह्या मथळ्याखाली आजचा सुधारकमध्ये दिलेल्या अवतरणाविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त – करणारे पत्र प्रसिद्ध झाले आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी रसेल यांचे “अडाणीपण” वऔद्धत्य” वरील अवतरणात व्यक्त झाले आहे असा आरोप केला आहे. वस्तुतः पळशीकरांच्या प्रतिक्रियेवरून त्यांचा रसेलच्या विचारांशी फारसा परिचय नाही व त्या विचारापुरते तरी त्यांचे मतप्रदर्शन हे “अडाणीपणाचे” व “औद्धत्याचे आहे असे म्हटल्यास अन्यायाचे होणार नाही. लाओत्से, रूसो, रस्किन व म. गांधी यांची “निसर्गाकडे चला” ही पुकार तत्कालीन परिस्थितीला उचित होती असे पळशीकरांचे म्हणणे.

पुढे वाचा

चर्चा- श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार

जून ९४ च्या आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या वरील विषयावरील लेखावर आक्षेप घेणारे श्री. न. ब. पाटील यांचे पत्र संपादकांनी माझ्या अवलोकनास पाठविले आहे. या पत्रातील सर्वच मजकूर अपेक्षित वळणावरच आहे. ज्यांची साक्षात्कारावर श्रद्धा आहे, त्यांच्यावर माझ्या विवेचनाचा काही परिणाम होईल अशी अपेक्षा मी केली नाही. कारण श्रद्धा ही मुळात पुराव्यावर आधारलेली नसते, त्यामुळे विरुद्ध पुराव्याने ती नष्ट होण्याचा संभव नसतो. श्री. पाटील यांच्या सात पानी पत्रात श्रीरामकृष्णांचे साक्षात्कारी समजले गेलेले वर्तन मिर्गीच्या व्याधिताचे होते हे त्यांच्याच आईबापांचे व डॉक्टरांचे निदान चूक होते असे दाखवणारी कोणतीच तथ्ये मांडली नाहीत.

पुढे वाचा

पर्यावरणवादाचा अन्वयार्थ

(१)
मानव-निसर्ग संबंधाच्या अभ्यासाचा इतिहास जुना असला तरी पर्यावरणवादाचा विकास ही अलीकडच्या काळातील घटना आहे. निसर्गातील काही घटकांचे माहात्म्य मानवाने बर्यावच आधीपासून जाणले होते. निसर्गातील विविध घटकांची त्याच्या सुखकर जीवनासाठी आवश्यकता त्याला समाजजीवनाच्या सुरुवातीपासूनच प्राथमिक स्वरूपात का होईना ज्ञात होती. असे असले तरी या संबंधाच्या आणि या अभ्यासाच्या मुळाशी एकीकडे मानव व दुसरीकडे उरलेला निसर्ग असा मानवसापेक्ष दृष्टिकोन होता. सुरुवातीला निसर्गातील उर्वरित घटकांच्या तुलनेत माणसाचे अस्तित्व नगण्यच होते. मानवासकट सर्वघटकांची एक व्यवस्था म्हणजे पर्यावरण ही मानवनिरपेक्ष संकल्पना अलीकडली आहे.
ह्या संकल्पनेचा विकास अपरिहार्यपणे आधुनिक वैज्ञानिक प्रगतीशी निगडित आहे.

पुढे वाचा

अतीतवाद, विवेकवाद व विज्ञान

मे १९९४ च्या आजचा सुधारक च्या अंकात प्रा. मे. पुं. रेगे यांनी सातारा येथील संमेलनात केलेल्या अध्यक्षीय भाषणाच्या संदर्भात प्रा. दि. य. देशपांडे यांचा “अतीत व विवेकवाद” हा व प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांचा “प्रा. रेग्यांची अतीतवादी मीमांसा’ हे दोन विचारप्रवर्तक लेख आले आहेत. यात प्रा. कुळकर्णी यांनी विज्ञानाविषयी बरीच स्पष्ट विधाने केली आहेत. प्रा. देशपांडे यांचा लेख वाचताना शीघ्र संदर्भ म्हणून उपयोगी पडावा हा प्रा. कुळकर्णी यांच्या लेखाचा उद्देश आहे. प्रा. रेग्यांचे संपूर्ण भाषण व वरील दोन लेख वाचल्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोनातून आलेले काही विचार मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

पुढे वाचा

वैज्ञानिक रीत

आपल्या समजुतींतील सत्याची मात्रा वाढविण्याचे उपाय प्रसिद्ध आहेत. त्यांत कोठल्याही गोष्टीच्या सर्व बाजू लक्षात घेणे, सर्व संबद्ध वास्तवे निश्चित करण्याचा प्रयत्न करणे, आपले पूर्वग्रह विरुद्ध पूर्वग्रह असणार्‍या लोकांशी चर्चा करून दुरुस्त करणे, आणि अपुरा सिद्ध झालेल्या कोणत्याही उपन्यासाचा (hypothesis) त्याग करण्याची तयारी जोपासणे – यांचा त्यांत समावेश होतो. या रीतींचा वापर विज्ञानात केला जातो, आणि त्यांच्या साह्याने विज्ञानाचे भांडार जमविले गेले आहे. कोणत्याही काळी जे विज्ञान म्हणून स्वीकारले जाते. त्याचा नव्या शोधांमुळे त्याग करावा लागणे अटळ आहे ही गोष्ट शुद्ध वैज्ञानिक दृष्टी असलेला कोणताही वैज्ञानिक मान्य करायला तयार असतो.

पुढे वाचा

चर्चा – अंधश्रद्धानिर्मूलन आणि धर्म

(१)
मा. संपादक “आजचा सुधारक
स.न.वि.वि.
अंधश्रद्धा निर्मूलन आणि धर्म” या आपल्या जुलैच्या अंकातील लेखानिमित्ताने हे पत्र. (याच विषयी मी आपल्याला पूर्वीही एक पत्र लिहिले होते जे प्रसिद्धीसाठी नव्हते.) मी आजचा सुधारकचा नियमित वाचकव उत्साही प्रचारक आहे हे आपल्याला ठाऊकआहेच. आपल्याविषयी संपादक म्हणून माझ्या मनात आदराची भावना आहे. परंतु आपला हा लेख वाचून मात्र प्रथमच आपल्या विवेकवादाविषयी शंका आली. या लेखाच्या निमित्ताने शिक्षण, पर्यावरण व एकूणच सुधारकच्या अलीकडील अंकांबाबत माझे मत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी लिखाणाची शैली थोडी पसरट आहे, माफी असावी.

पुढे वाचा