मासिक संग्रह: डिसेंबर, १९९४

पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक,
स.न.वि. वि.
आजचा सुधारक नोव्हेंबर ९४ च्या अंकातील स्त्रीपुरुषसमता व स्त्रीमुक्तीसंबंधी सर्वेक्षण’ या संबंधातील डॉ. र.वि. पंडित यांची प्रश्नावली वाचली. डॉ. पंडित कोणत्या कालखंडात वावरत आहेत?आज २१व्या शतकाच्या उंबरठ्यावर खरोखरी सुखवस्तु मध्यमवर्गीय, विशेषतः ब्राम्हण, समाजात पुरुषमुक्तीची गरज आहे. परंतु या बटबटीत वास्तवाकडे कोणीच लक्ष देत नाही ही खेदाची बाब आहे. विवेकवाद वास्तवाकडे डोळेझाक करून भावनांच्या आहारी कधीच जात नसतो. खालील कवितेत, स्त्रीमुक्तीच्या अतिरेकाने ब्राह्मण युवक कसा अगतिक बनला आहे हे पहायला मिळेल.
।। मॉडर्न ब्राह्मण युवक ।।
(चाल – चोली के पीछे ची)
आपलं चांगलं सोडलं । हीन पाश्चात्त्य घेतलं ।।।
करुनी पत्नीची गुलामी । स्वतः समजे पुरोगामी ।।
पत्नी पतीला दटावी । निमुटपणे ऐकून घेई ।।।
शब्द काढिता चकार । दावी त्राटिका अवतार ।।।
काय करतो बिचारा । सदा तिचाच दरारा ।।
उपमर्द सदा करी । पती तोही सहन करी ।।
पती सदा अँड्जस्ट होतो । तिची कृत्ये खपवुनं घेतो ।।
पत्नी असते सर्वेसर्वा । याला वाटत नाही हेवा ।।।
सगळ्याची ह्या परिणती । कशामध्ये तरी होई ।।
संसाराचा खुळखुळा । करून घेतो मॉडर्न खुळा ।।
करू घातलेले सर्वेक्षण बैल दुभवण्यासारखे आहे.

पुढे वाचा

श्री दिवाकर मोहनींच्या स्त्री-पुरुष संबंधाच्या भ्रामक कल्पना

आजचा सुधारकच्या काही अंकातून दिवाकर मोहनी यांनी स्त्रीपुरुषांमधील स्वातंत्र्याचा विचार मांडताना स्त्रीपुरुषात स्वैर लैंगिक स्वातंत्र्य असावे असे म्हटले आहे. त्याना एकपतीपत्नीव्रताची कल्पना मान्य नाही. बहुपतिक किंवा बहुपत्नीक कुटुंब असल्यास हरकत नाही असे त्याना वाटते. त्यांच्या एकूण विचारावरच लैंगिक स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य असून इतर मूल्ये दुय्यम स्वरुपाची आहेत असे त्यांचे मत असावे असे वाटते. त्यांनीह्या प्रश्नाच्या सर्व अंगाचा विचार केला आहे असे दिसत नाही.
ह्या प्रश्नाचा विचार करताना प्राचीन भारतीयानी काम व अर्थ यांच्यापेक्षा धर्म आणि मोक्ष (स्वातंत्र्य) यांना अधिक महत्त्व दिले होते.

पुढे वाचा

इंग्लंडमधील कौटुंबिक जीवन

इंग्लंडमधील कौटुंबिक जीवनाचा शोध घेणे परदेशी पर्यटकाला शक्य नाही. परंतु त्याचे पडसाद त्यांच्या वृत्तपत्रात सतत ठळकपणे उमटत असतात. आमच्या मराठी वृत्तपत्रातच काय, आमच्या इतर सर्व भाषांतील वृत्तपत्रांत राजकीय पुढारी, त्यांचे राजकारण यावर जास्त भर असतो. ‘बड्या लोकांची गुप्त कृत्ये छापण्यास आमचे पत्रकार धजत नाहीत. ही ‘गुप्त कृत्ये उजेडात आणण्यासाठी परदेशी वृत्तपत्रांचे बातमीदार आणि त्या पत्रांचे संपादक आणि मालक राजी नसतात. पण दी टाइम्स, दी इंडिपेंडन्ट, डेली मेल, डेली एक्सप्रेस, गार्डीयन आदी वृत्तपत्रात सामाजिक आणि सांस्कृतिक घटनांना प्राधान्य दिले जाते.
मध्यमवर्गीय इंग्रज कुटुंब, तसेच आमचे भारतीय वृत्तपत्रे विकत घेत नाहीत.

पुढे वाचा

दिवाळीतील ओळखी

टिळकांनी लिहिलेः ग्रंथ हे आमचे गुरू होत, आणि पुढे बजावले, छापण्याची कला आल्यापासून ग्रंथनिर्मितीला सुमार राहिलेला नाही. त्यामुळे निवड करून चांगले तेवढेच वाचा. आयुष्य थोडे आहे.
महाराष्ट्रात मासिकांची – नियतकालिकांची दिवाळी येते तेव्हा तर हा उपदेश फारच आठवतो.
आणखी एक, फडक्यांनी (ना. सी.) एका सुंदर गुजगोष्टीत हितोपदेश केला, तो मार्मिक आहे. आयुष्य कसे घालवावे, आपले काय काय चुकले, ते कसे टाळता आले असते इत्यादी गोष्टींचे ज्ञान माणसाला होते त्यावेळी त्याच्या आयुष्याची संध्याकाळ झालेली असते. आता उमजले तसे जगायला आयुष्य फारसे उरलेले नसते.

पुढे वाचा

चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ३)

मागच्या लेखांकात प्रा.म.ना. लोही ह्यांच्या सविस्तर पत्राचा मी उल्लेख केला होता. त्यांच्या लेखामधील महत्त्वाचा अंश घेऊन त्यावर मी माझे म्हणणे पुढे मांडणार आहे. मजकडे आलेले लेख किंवा पत्रे ही स्वतंत्रपणे लिहिलेली व वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेली असल्यामुळे त्यात कोठे कोठे पुनरुक्ती आहे, तसेच त्यांच्या काही भागांचा संक्षेप करता येण्याजोगा आहे असे वाटल्यावरून त्यांच्या मुद्द्यांचा तेवढा परामर्श घेण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे हा वादविवाद नाही; मी कोठलाही पवित्रा घेतलेला नाही. म्हणून मला एखादा मुद्दा महत्त्वाचा वाटला नाही आणि त्यामुळे तो माझ्या विवेचनातून गळला तर तो पुन्हा माझ्या लक्षात आणून द्यावयाला हरकत नाही.

पुढे वाचा

भक्ती हे मूल्य आहे काय?

आपल्या तत्त्वज्ञांनी आणि संतांनी भक्तीला एक श्रेष्ठ स्थान दिले आहे. गीतेत मोक्षाच्या सर्व मार्गात भक्तिमार्ग श्रेष्ठ मानला आहे. एखादा मनुष्य भगवद्भक्त आहे असे म्हणणे म्हणजे त्याची अत्युच्च स्तुती करणे आहे असे आपण समजतो.
भक्तीला एवढे माहात्म्य कशामुळे प्राप्त झाले?भक्तीविषयीचे हे जे सार्वत्रिक मत आहे ते बरोबर आहे काय?असा प्रश्न कोणी विचारल्यास त्याला आपण काय उत्तर देऊ शकू?
भक्तीचा उचित विषय म्हणजे परमेश्वर. तसे इतरही अनेक विषय मानले गेले आहेत. पिता, माता, गुरू, पती आणि स्वामी यांचे माहात्म्य आपल्या धर्मग्रंथांतून केलेले आपण पाहतो.

पुढे वाचा

लोकशाही तत्त्वाचा उद्देश

लोकशाही तत्त्वाचा उद्देश जुलूमशाही टाळण्याकरिता राजकीय संस्थांची निर्मिती, विकास आणि रक्षण करणे हा आहे. याचा अर्थ असा नव्हे की आपण या प्रकारच्या निर्दोष किंवा अभ्रंश्य संस्था कधी काळी निर्मू शकू, किंवा त्या संस्था अशी शाश्वती देऊ शकतील की लोकशाही शासनाने घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबर, चांगला किंवा शहाणपणाचाच असेल. पण त्या तत्त्वाच्या स्वीकारात असे नक्कीच व्यंजित आहे की लोकशाहीत स्वीकारलेली वाईट धोरणेही (जोपर्यंत शांततेच्या मार्गांनी ती बदलून घेण्याकरिता आपण प्रयत्न करू शकतो तोपर्यंत) शुभंकर आणि शहाण्या जुलूमशाहीपुढे मान तुकविण्यापेक्षा श्रेयस्कर असतात. या दृष्टीने पाहता बहुमताचे शासन असावे हे लोकशाहीचे तत्त्व नाही असे म्हणता येईल.

पुढे वाचा