मासिक संग्रह: एप्रिल, १९९६

पत्रव्यवहार

मा. संपादक
आजचा सुधारक यांस स. न.
श्री. ह. चं. घोंगे यांचा ‘हिदुत्व अन्वेषण’ हा आक्टोबर ९५ च्या अंकातील लेख वाचनात आला. या आधीच्या म्हणजे सप्टेंबर ९५ च्या अंकातील ‘शारदेच्या पुनर्जन्मावरील त्यांचा लेख वाचलेला होताच. आधीचा लेख वाचल्यानंतर लेखकाच्याबद्दल काही अपेक्षा आधीच निर्माण झाल्या होत्या. मात्र ‘हिन्दुत्व अन्वेषण हा लेख वाचून भ्रमनिरास झाला. लेखकाच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास केवळ ‘शाब्दिक चावटीचाच नव्हे, तर ‘वैचारिक चावटीचाही आश्रय घेऊन लिहिलेला हा लेख वाटला. जागोजाग ‘हिंदुत्व आणि ‘हिंदु यांतील वैयर्त्य दाखविताना लेखकाने ‘वैचारिक चावटीचा केलेला उपयोग निषेधार्ह वाटतो.

पुढे वाचा

अंताजीची बखर’ : एक ऐतिहासिक कादंबरी,वेगळ्या दृष्टिकोणातून

अंताजीची बखर ही बखरीचा घाट दिलेली कादंबरी अर्थात् ही ऐतिहासिक कादंबरी आहे. तिच्यात खरा इतिहास आहेच, पण थोड्या वेगळ्या दृष्टिकोणातून पाहिलेला आहे. ही आगळी दृष्टी हेच या कादंबरीचे मुख्य वैशिष्ट्य. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इतिहास मराठ्यांचाच पण प्रकाशझोत वेगळ्या क्षेत्रावर टाकला आहे. कादंबरीच्या अर्पणपत्रिकेचा उपयोग एखादा पताकास्थानासारखा करून लेखकाने आपल्या दृष्टिकोणाचा परिचय करून दिला आहे.
अर्पण पत्रिका म्हणते :
‘सर्वश्री रणजित देसाई, ना. सं. इनामदार, वासुदेव बेलवलकर, गो. नी. दांडेकर, ब. मो. पुरंदरे, वि. ना. हडप, नाथमाधव….. आणि हो…. जॉर्ज मॅकडॉनल्ड फ्रेञ्जर यांस हे लिखाण सादर, सप्रेम अर्पण’
१.

पुढे वाचा

हिंदुत्व -प्रा. आचार्यांच्या प्रश्नांना उत्तरे

‘हिंदुत्व एक अन्वेषण’ या लेखासंबंधी आजच्या सुधारकात, प्रश्न करणाच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रा. आचार्यांनी ऐतिहासिक विधानांच्या सत्यासत्यतेसंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत. श्री. रिसबुडांनी या विषयाच्या अनुषंगाने आपली वैचारिक प्रतिक्रिया मांडलेली आहे. या दोन्ही विचारवंतांच्या प्रतिक्रिया मननीय आहेत. हिंदुत्वासंबंधी आमच्या विधानांना या विद्वानांचा फारसा आक्षेप असलेला दिसत नाही. तरीपण या विचारवंतांनी लेखनातील ज्या नेमक्या त्रुटी दाखविल्या आहेत त्या भरून काढण्यापूर्वी या लेखामागे असणारी आमची मनोभूमिका प्रदर्शित करणे आवश्यक वाटते. हिंदुत्व ही संकल्पना विशिष्ट गटापुरती का होईना रूढ झालेली आहे. ती नाकारण्यात अर्थ नाही.

पुढे वाचा

‘बैंडिट क्वीन’च्या निमित्ताने

काही दिवसांपूर्वी माझ्या एका विद्यार्थी मित्राचे पत्र आले. त्यात त्याने लिहिलेल्या ‘बैंडिट क्वीन’वरील प्रसिद्ध झालेल्या लेखाचे कात्रण होते. तो लेख वाचला, मनापासून आवडला, तसे त्याला कळविले अन् सिनेमा पाहण्याचे ठरविले. तोवर सिनेमा पाहावा हे तीव्रतेने जाणवले नव्हते. कुटुंबीय आणि इष्ट मित्रांसह सिनेमा पाहून आलो. परवा घातलेली बंदी वाचून आपण सिनेमा पाहण्याची संधी हुकवली नाही ह्याचे समाधान वाटले. नाहीतर एक अतिशय भेदक वास्तव कलाकृती पाहायचे राहूनच गेले असते.

‘बैंडिट क्वीन’ ही फूलनदेवीची जीवन कहाणी! लहान, अल्लड, निरागस फूलनचा डाकूची राणी बनण्यापर्यंतचा तिच्या आयुष्याचा प्रवास त्यात दाखवलेला.

पुढे वाचा

न्यायाधीश आणि अंधश्रद्धा

सर्वोच्च न्यायालयाचे आपल्या घटनेत विशेष स्थान आहे. आजकाल ज्या घटना घडत आहेत त्यामुळे तर त्या न्यायालयाबद्दलचा नागरिकांचा आदर अनेकपटींनी वाढला आहे व अपेक्षाही वाढल्या आहेत.
अशा वेळी या न्यायालयाचे पद भूषविणारे एक न्यायाधीश के. रामस्वामी यांनी नुकत्याच दिलेल्या एका निकालातील विधाने आश्चर्यजनक आहेत.
भूमिसंपादनाचे हे प्रकरण शिरडीच्या साईबाबा संस्थानचे. या संस्थानाला शिरडीचे साईबाबा मंदिर व द्वारकामाई मंदिर यांना जोडणार्या. रस्त्याकरिता बाजीराव कोते यांची जमीन व घर पाहिजे होते. खाजगी वाटाघाटी यशस्वी न झाल्यामुळे शासनाकरवी सार्वजनिक उपयोगाकरिता मालमत्ता संपादन करण्याची कारवाई सुरू झाली.

पुढे वाचा

रहस्य, जीवोत्पत्तीचे

रोम येथील व्हॅटिकनच्या सिस्टीन चॅपेलच्या छतावर Creation of Adam हे चित्र रखाटले आहे. मुळामध्ये शिल्पकार असूनही चित्रकार बनलेल्या मायकेल अँजेलोची ही भव्य कलाकृती आहे. या चित्रात निवृक्ष टेकडीवर पहुडलेल्या अॅडमने आपला डावा बाहू पुढे केलेला आहे. आकाशातून परमेश्वर देवदूतांसह अवतीर्ण होत आहे; त्याने अॅडममध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आपल्या उजव्या हाताची तर्जनी अॅडमच्या पुढे केलेल्या हाताच्या तर्जनीजवळ नेलेली आहे. या प्रख्यात भित्तिचित्रात बायबलप्रणीत संकल्पनेचे उत्कृष्ट भव्य दर्शन घडते. परमेश्वराने सर्व प्राणी आणि अर्थातच मनुष्य निर्माण केला आणि त्यात प्राण ओतला ही कल्पना अनेक धर्मामध्ये आढळते.

पुढे वाचा

पुन्हा एकदा “सततचा पहारा”

नोव्हें. ९५ च्या आजच्या सुधारकात ज्ञान मिळवण्याच्या मार्गाबद्दल “सततचा पहारा ही स्वातंत्र्याची किंमत आहे” या नावाचा एक लेख मी लिहिला. “The price of liberty is eternalvigilance” या वचनाचे भापांतर शीर्षक म्हणून वापरले. विवेकवादी भूमिकेतून साक्षात्कार व अंतःस्फूर्ती हे ज्ञान कमवायचे मार्ग कसे दिसतात, ते पहायचा प्रयत्न होता. असे काही मार्ग आहेत, हे एकदा मान्य केले, की त्या मार्गांनी मिळालेले ज्ञान खुद्द ज्ञानार्जन करणारा सोडून इतरांना “बाबावाक्य म्हणून मान्य करावे लागते. हा अखेर विवेकवाद्याच्या स्वातंत्र्यावर घाला ठरतो. म्हणून अशा ज्ञानमार्गाबाबतचे दावे फार काळजीपूर्वक तपासायला हवेत, असा लेखाचा सूर होता.

पुढे वाचा

धर्मसुधारणा – एक वदतोव्याघात : प्रा. स. ह. देशपांडे यांना उत्तर

आजचा सुधारक, जानेवारी ९६ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘धर्म, सुधारणा आणि विवेक या माझ्या लेखावर प्रा. स. ह. देशपांडे यांनी मार्चच्या अंकात बरेच सविस्तर विवेचन करणारा लेख लिहिला आहे. माझ्या लेखाची दखल घेतल्याबद्दल मी प्रा. देशपांड्यांचा ऋणी आहे, आणि स्वतःबरोबरच अन्य सर्व वाचकांचीही माझी प्रतिक्रिया जाणून घेण्याची इच्छा असणार असे मधाचे बोट त्यांनी लावले असल्याने त्यांना उत्तर देणे भाग आहे हे ओळखून मी पुढील मजकूर लिहीत आहे.
लेखारंभीच धर्मसुधारणा हा शब्द मला वदतोव्याघात वाटतो या माझ्या विधानाविषयी प्रा. देशपांडे म्हणतात की धर्मसुधारणा ही प्रत्यक्ष अस्तित्वात असणारी गोष्टआहे, त्यामुळे तिच्यात व्याघात आहे असे म्हणणे बरोबर नाही.

पुढे वाचा

हा मानवजातीचा इतिहास नव्हे!

ज्याला लोक इतिहास समजतात तो म्हणजे ईजिप्त, बॅबिलोनिया, इराण, मॅसिडोनिया आणि रोम इत्यादींच्या साम्राज्यांपासून थेट आपल्या काळापर्यंतचा इतिहास. ते त्याला मानवाचा इतिहास म्हणतात, पण त्यांना अभिप्रेत असलेली गोष्ट. (जी ते शाळेत शिकतात) म्हणजे राजकीय शक्तींचा इतिहास होय.
मानवाचा इतिहास नाही; मानवी जीवनाच्या विविध अंगांचे अनेक इतिहास तेवढे आहेत. आणि त्यांच्यापैकी एक राजकीय शक्तींचा इतिहास आहे. त्यालाच जगाचा इतिहास असे भारदस्त नाव दिले जाते. पण हे मानवाच्या कोणत्याही शिष्ट संकल्पनेचा अधिक्षेप करणारे आहे असे माझे मत आहे. पैशाच्या अफरातफरींचा, दरवडेखोरीचा किंवा विषप्रयोगाचा इतिहास मानवजातीचा इतिहास मानण्यासारखे ते आहे.

पुढे वाचा