मासिक संग्रह: ऑक्टोबर , १९९६

कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव

‘डीप ब्लू’ ह्या संगणकावरील कार्यप्रणालीत बुद्धिबळात अनेक वर्षे जगज्जेता असलेल्या कॅस्पोरोव्हला ‘बुद्धिमत्तेची झलक दिसली व ती एक विचित्र, अकार्यक्षम व लवचिकता नसलेली बुद्धिमत्ता आहे असे वाटले. (आजचा सुधारक जून ‘९६). नंदा खरे ह्यांना अपेक्षित असलेल्या बुद्धिमत्तेच्या संकल्पनेविषयी चर्चा न करता कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव (robot) या संपूर्ण दोन वेगवेगळ्या तंत्रज्ञानांच्या शाखांवरून बुद्धिमान यंत्रमानवाचा विकास होण्याची शक्यता आहे काह्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.
यंत्रमानवाविषयीचे तंत्रज्ञान पूर्णपणे मानवाच्या शारीरिक क्षमतेस पर्यायी व्यवस्था म्हणून विकसित करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक बिनडोक, स्वतंत्र निर्णय न घेणारा पण पूर्ण आज्ञाधारक, तंतोतंत, बिनचूक काम करणारा व मानवापेक्षा कित्येक पटींनी अधिक क्षमता असलेल्या यंत्रमानवाची रचना करून मानवाचे शारीरिक श्रम व वेळ वाचवण्यास मदत होत आहे.

पुढे वाचा

आगरकर : एक आगळे चरित्र (भाग २)

आगरकर ले. य. दि. फडके, मौज प्रकाशन, १९९६. किंमत रु. १७५/
आगरकर उंच होते. अंगकाठी मूळची थोराड व काटक होती(११६)*, डोळे पाणीदार (९). राहणी-वेश पारंपरिक, शेंडी मोठी पण घेरा लहान, (११६). मात्र ते जानवे घालत नसत आणि संध्याही करत नसत (२४२) .त्यांचे किंचित पुढे आलेले दात झुपकेदार मिशांनी झाकले जात (११६). बुद्धी चपळ आणि वृत्ती मनमिळाऊ असलेले (९) गोपाळराव डेक्कन कॉलेजातल्या शिक्षकांना आठवतात ते ‘सर्वांत मोठा विद्यार्थी, धिप्पाड व बलवान’ असे या रूपात (२५२). आगरकरांचे हे चित्र, चरित्रग्रंथात विखुरलेले उल्लेख एकत्र करून जुळवता येते.

पुढे वाचा

समतेच्या मार्गातील अडथळे

आजच्या सुधारकच्या मागच्या म्हणजे सप्टेंबर १९९६ च्या अंकामध्ये डॉ. चिं. मो. पंडित ह्यांचे एक पत्र व त्यावर डॉ. श्रीनिवास खांदेवाले ह्यांचे उत्तर असे दोन लेख प्रकाशित झाले आहेत.
डॉ. पंडितांनी मांडलेले किंवा त्यांसारखे आणखी काही मुद्दे प्रस्तुत लेखकालाही अनेक वर्षांपासून छळत आहेत; त्यामुळे अर्थकारण हा त्याच्या जिज्ञासेचा विषय राहिला आहे. त्याविषयी काही चिंतन त्याच्या मनात झालेले आहे. चालू आहे. ह्या लेखाच्या निमित्ताने त्याचे विचार वाचकांसमोर मांडण्याची संधी घेत आहे. त्या विचारांची दिशा बरोबर आहे की नाही ह्याचा पडताळा वाचकांनी त्याला द्यावा अशी विनंती आहे.

पुढे वाचा

श्री पंडित आणि श्री खांदेवाले यांच्याचर्चेच्या निमित्ताने

श्री. चिं. मो. पंडितांचे पत्र व त्याला श्री. खांदेवाल्यांचे उत्तर यावरून सुचलेले कांही मुद्दे असे –
(१) वेगवेगळे व्यवसाय व त्यांच्यात ‘रूढ झालेली वेतने यांमधील असमतोल वाढत आहे, व हे पंडित आणि खांदेवाले या दोघांनाही (व मलाही) गैर वाटते. ज्या क्षणी श्रमविभाजन आले, त्या क्षणी व्यवसाय घडले. तोपर्यंत माणसे ‘बहु-उद्देशीय’ असू शकत होती.
व्यवसाय, व्यक्ती व समाज यांच्या संबंधात दोन बाजूंनी विचार करायला हवा. एक म्हणजे, प्रत्येक समाज कोणकोणत्या देशाची किती किती माणसे ‘बाळगू शकतो, हे जवळपास ठरीव असते. जसे, एखाद्या समाजातले अर्धे लोक वैद्य असू शकत नाहीत.

पुढे वाचा

सोवियत यूनियनमधील धर्मस्वातंत्र्य (प्रा. सत्यरंजन साठे यांचे पूर्वग्रहदूषित विधान)

जुलै-ऑगस्ट १९९६ च्या आजचा सुधारकच्या अंकात प्रा. सत्यरंजन साठे यांचा ‘धर्मनिरपेक्षता आणि सर्वोच्च न्यायालय’ असे शीर्षक असलेला एक चांगला लेख प्रसिद्ध झाला
आहे. परंतु त्यामध्ये रशियामध्ये व्यक्तीला धर्माबाबतचे स्वातंत्र्यचनाकारले गेले’, असे एक विधान पान १४२ वर करण्यात आले आहे. उजव्या विचारसरणीच्या नियतकालिकांमधून अथवा ग्रंथांमधून करण्यात आलेला पूर्वग्रहदूषित अपप्रचार जर बाजूला ठेवला तर काय आढळते?
(१)१९८८ सालच्या आकडेवारीनुसार खालील विविध धर्म व धर्मपंथीयांची मिळून वीस हजार प्रार्थना अथवा उपासना मंदिरे सो. यूनियनमध्ये अस्तित्वात होती : रशियन ऑर्थोडॉक्स, रोमन कॅथलिक, लुथेरन, ओल्ड बिलीव्हर्स, बॅप्टिस्टस्, सेव्हन्थ डे अॅडव्हेन्टिस्टस्, मोलोकन्स, सिनेगॉगस्, मशिदी, बौद्ध देवालये.

पुढे वाचा

विवेकवादाविषयी पुन्हा थोडेसे

‘विवेक’ हा शब्द मराठीत आणि संस्कृतमध्ये ‘reason’ याच्या अर्थाहून काहीशा वेगळ्या अर्थाने रूढ आहे. उदा. ज्ञानेश्वरांनी गीतेच्या विषयाचे वर्णन ‘विवेकाची गोठी’, म्हणजे विवेकाची गोष्ट असे केले आहे. परंतु आपण तो शब्द reason या अर्थी वापरीत आहोत, कारण ‘rationalism’ या शब्दाला पर्याय म्हणून आगरकरांनी ‘विवेकवाद’ हा शब्द वापरला आणि आपण त्यांचे अनुसरण करीत आहोत. आता खुद्द इंग्रजीत ‘rationalism’ हा शब्द निदान दोन अर्थांनी रूढ आहे, आणि त्यापैकी एकच आपल्याला अभिप्रेत आहे. म्हणून ‘rationalism’ या शब्दाच्या कोणत्या अर्थी ‘विवेकवाद’ हा शब्द अभिप्रेत आहे असा प्रश्न पडतो.

पुढे वाचा

मृत्युशय्येवरील ह्यूम

… ७ जुलै १७७६ रोजी मी मि. डेव्हिड ह्यूम’ यांना भेटायला गेलो. ते आपल्या दिवाणखान्यात एकटेच टेकून पडले होते. ते कृश आणि भेसूर दिसत होते. ते शांत आणि समाधानी दिसले. आपण लवकरच मरणार आहोत असे ते म्हणाले … मृत्यू समक्ष उभा असतानाही मरणोत्तर अस्तित्वावरील आपला अविश्वास कायम आहे काय असे मी विचारले. त्यावेळी ते जे बोलले त्यावरून तो कायम होता असे माझे मत झाले. मरणोत्तर अस्तित्व शक्य नाही काय? असे मी विचारले. ते म्हणाले की कोळसा आगीत टाकल्यावर जळणार नाही हेही शक्य आहे.

पुढे वाचा