मासिक संग्रह: जानेवारी, २००५

पत्रसंवाद

जॉर्ज ऑरवेलची नॅशनॅलिझमवरची टीका ही समूहवादाला उद्देशून होती, राष्ट्रवादाला नव्हे हे मी सप्टें. ०४ च्या अंकातील पत्रात स्पष्ट केले होते. तशीच चूक मीरा नंदा ह्यांच्या ‘आधुनिकोत्तरवाद’ ह्या लेखात दिसते. भारतात इ.स. १३०० पासून मुस्लिमांनी जिहादच्या नावाने प्रचंड कत्तली घडवून आणल्या आहेत. ह्याची प्रतिक्रिया म्हणून शिवाजीच्या वेळेपासून हिंदू समाजाचे संघटित होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच परिणाम टिळक, सावरकर, हेडगेवार यांच्या राष्ट्रवादाच्या पुरस्कारात झाला आहे. ही तथ्ये नाकारली आहेत.
हे मुस्लिम दहशतवादी अत्याचार आजही चालू असून त्याविरुद्ध राष्ट्रवादी शक्ती उभ्या करणे ही काळाची गरज आहे.

पुढे वाचा

विवेकवाद – भाग ४

गेल्या दोन लेखांकांत आपण पाहिले की ईश्वरास्तित्वसाधक कोणताही युक्तिवाद निर्णायक नाही. त्यांपैकी काही निराधार गोष्टी गृहीत धरून त्यावर आधारलेले आहेत, तर काहींत स्वच्छ व्याघात आहे असे आपल्याला आढळून आले. पण एक युक्तिवाद अजून तपासायचा राहिला आहे, आणि त्यावर ईश्वरवाद्यांची बरीच भिस्त आहे. हा युक्तिवाद म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार होतो या दाव्यावर आधारलेला. त्याकडे आता वळू.
या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात असे म्हटले होते की कोणत्याही विधानावर विश्वास ठेवायचा (किंवा ते स्वीकारायचे) तर तो त्या विधानाच्या पुराव्यावर आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना प्रमाण मानावे. यावर साक्षात्कारवादी चटकन् म्हणेल की ‘म्हणजे तुम्ही आप्तवचन मानता तर!

पुढे वाचा

पोटासाठी

पैसे, जमीन आणि पाणी कमी असतात तेव्हा हिंसेच्या शक्यता वाढतात.
जानेवारी १९९८ मध्ये ‘ह्यूमन राइट्स वॉच, आशिया’ या स्वयंसेवी संस्थेच्या सिड्नी जोन्सने आर्थिक नाराजीचे वांशिक आणि धार्मिक असंतोषात रूपांतर होईल, असे भाकीत केले होते. त्याचे निरीक्षण असे होते की आधीच्या अठरा महिन्यांत पश्चिम इंडोनेशियात चिनी मालकीच्या दुकानांइतकेच गरीब मुस्लिमांचे चर्चवरील हल्ले वाढले होते. पूर्व इंडोनेशियात ख्रिस्ती वस्ती जास्त आहे, तिथे मुस्लिम व्यापाऱ्यांवरील हल्ले वाढले होते.
पण ज्या देशांमध्ये अशी हिंसा भेडसावते आहे तिथले पोलीस मानवी हक्कांबद्दल फारसे जागरूक नाहीत. याच देशांमध्ये कामगारांच्या हक्कांकडेही फारसे लक्ष दिले जात नाही.

पुढे वाचा

सलाम व्हिएतनाम

कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, ललित लेख, अनुभवकथन इतिहास यांपैकी कशातच न मोडणारे असे हे पुस्तक आहे. श्री. ज.रा आपटे यांनी व्हिएतनाममध्ये न जाता अमेरिकेतील प्रकाशित साहित्यावर, अप्रकाशित माहितीवर व अनेक व्यक्तींशी प्रत्यक्ष चर्चा करून, संशोधनपर पुस्तक लिहिले. संशोधनपर लेख संबंधित व्यक्तीच वाचतात, कारण इतरांना त्या नीरस वाटतात, परंतु हे पुस्तक तसे वाटत नाही.
मुखपृष्ठापासून ते परिशिष्टांपर्यंत छपाईचे कार्य सुंदर व सुबक केले आहे. भाषा सोपी, प्रवाही, अर्थपूर्ण आणि लक्षवेधक आहे. परंतु पुस्तकातील संदर्भ, राजकीय नेतृत्व, भौगोलिक स्थिती, अमेरिकेतील साम्यवादी विरोधक, दुसऱ्या महायुद्धामुळे झालेली हानी गोंधळलेला आणि अतार्किक दृष्टिकोन, जनमताचा विशेषतः युवावर्गाचा आक्रोश, यासंबंधी फारशी माहिती नाही.

पुढे वाचा

काही सूचना

प्रशासनाने पारदर्शक असणे हे काही नोकरशहांच्या दृष्टीने घातकच असते. लोकाभिमुख प्रशासनात लोक हा शब्द नागरिक या अर्थाने वापरला गेला आहे. लोकशाहीची ‘लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचेच राज्य’ ही व्याख्या अतिशय बाळबोध आहे. नागरिक होण्यासाठी या देशात जन्म घेणे एवढेच पुरेसे आहे. त्या भांडवलावर आपण नागरिकांचे हक्क मिळवू शकतो. सर्वोच्च-न्यायालयानेसुद्धा नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यांची सांगड घालताना कर्तव्यांत कसूर झाली तरी हक्कावर बाधा येत नाही असेच सांगितले आहे. बहुसंख्य लोकांना हक्क हे माहीतच नाहीत. ती त्यांना सवलतच वाटते. कर्तव्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.

पुढे वाचा

भ्रष्टाचार : कारणे व उपाय (भाग २)

क) पैशाचे साध्यमूल्य
साधारणतः पैशाचे साधनमूल्य म्हणून असलेले महत्त्व सर्वच जण स्वीकारतात. तथापि एकदा पैसा मिळविण्यास सुरुवात केली की, त्याचे एक विलक्षण असे आकर्षण निर्माण होते. आणि साधनमूल्य विसरून त्याला साध्याचे स्थान येते. पैसा हेच साध्य ठरल्यावर तो किती व कसा मिळवायचा याला मर्यादा राहत नाहीत. यामुळेच ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे असे लोकही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा अवलंब करीत असताना दिसतात. म्हणून मंत्री, ज्येष्ठ सनदी अधिकारी यांच्या स्तरावर भ्रष्टाचाराचे प्रमाण प्रचंड प्रमाणावर वाढल्याचे आपणास दिसून येते. ड) आर्थिक आवश्यकता या उच्चवर्गाबरोबरच कनिष्ठ वर्गातही छोट्यामोठ्या स्वरूपात होणारा भ्रष्टाचार आपणास दिसून येतो.

पुढे वाचा

विवेक आणि अंतःप्रेरणा (Reason and Intuition)

Choose Life या पुस्तकाचे मलपृष्ठावरील अवतरण खालीलप्रमाणे : (टाइम साप्ताहिक, अमेरिका यांच्या अंकातून ): अर्नोल्ड टॉयन्बी यांचेवर टीका करणारे आहेतच. पण त्यांची गणना आइन्स्टाइन, श्वाइट्झर किंवा बरट्रांड रसेल, यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय संतांच्या मालिकेत होते. अनेकानेक विषयांवरील त्यांच्या मतांची चौकशी केली जात असे. डाइसाकु इकेडा त्यांच्या इतर ग्रंथांतून, व्याख्यानांतून आणि लेखांतून इकेडा यांनी ‘जागतिक अन्न बँक’, ‘संरक्षण खर्चात कपात’ व ‘आण्विक शस्त्रांचा त्याग’ याविषयी ऊहापोह केला आहे. त्यांचा सर्वाधिक ओढा मात्र मानवी समूहांतील युद्धविरोधी भावनांची वाढ या विषयांकडे आहे. इकेडा (इ) : अंतःप्रेरणा (Intuition) आणि विवेक (reason) एकमेकांस पूरक असतात.

पुढे वाचा

‘अंतिम’ इतिहास

भावी पिढ्यांतील इतिहासकार ‘अंतिम’ इतिहासाची अपेक्षा ठेवणार नाहीत. त्यांचे संशोधनाचे काम वारंवार नवनव्या संशोधनाने मागे पडणार आहे, हे त्यांना अपेक्षितच असेल. त्यांना जाणीव असेल, की भूतकाळाचे ज्ञान आपल्यापर्यंत काही माणसांमार्फत, त्यांनी केलेल्या प्रक्रियांमधूनच येते. त्या ज्ञानात मूलभूत, व्यक्तिनिरपेक्ष, अपरिवर्तनीय असे काही मानता येत नाही.
काही उतावळे अभ्यासक तर अशा साशंक भूमिकेला येऊन पोचतील, की ऐतिहासिक ज्ञानाचे निष्कर्ष माणसे व दृष्टिकोन यांतूनच आपल्यापर्यंत येत असल्याने एक मांडणी व पर्यायी मांडणी यांतील कोणतीही मानायला हरकत नाही, कारण वस्तुनिष्ठ ऐतिहासिक सत्य असे काही नसतेच.

पुढे वाचा