मासिक संग्रह: मे, २००९

पुरुषांच्या नावे एक खुले पत्र

प्रिय सद्गृहस्थहो, आमच्याविषयी व आमच्या उद्दिष्टांविषयी आपण आपल्या मनात काही गैरसमज बाळगून आहात, असे आमच्या निदर्शनास आले आहे. आपण सर्व एकत्र येऊन एक अधिक संतुलित समाज बनविण्याच्या कामात या गैरसमजुती व काही तद्दन खोट्या गोष्टींमुळे अडथळा निर्माण होतो. आपल्या मनातील हे अपसमज-गैरसमज दूर करावे अशी आमची मनापासून इच्छा आहे. कृपया तसे करण्याची संधी आम्हाला द्यावी.
१. तुमचे लिंगच्छेद करण्याचा आमचा अजिबात इरादा नाही.
२. (स्त्री व पुरुषांच्या) भूमिकांची अदलाबदल करणे हे आमचे ध्येय नाही. हजारो वर्षे आम्ही ज्या तुरुंगात खितपत पडलो त्यात तुम्हाला बंदिस्त करून ठेवणे हे आमचे उद्दिष्ट नाही.

पुढे वाचा

साहित्याचा एकाकी/एकटा आवाज

मी आता आपल्यासमोर जे काही मांडणार आहे ते एका टीकाकाराच्या किंवा व्यावसायिक समीक्षकाच्या दृष्टिकोणातून नव्हे वा एखाद्या अॅकॅडेमिक प्रोफेसरच्या दृष्टिकोणातूनही नव्हे. तो आहे एका लेखनकर्मीचा दृष्टिकोण, ज्याच्यासाठी साहित्य हे गेली चाळीस-पन्नास वर्षे एक आसऱ्याचे ठिकाण, निवारा-आणि दुःख आणि वेदनांच्या क्षणी परमशांती आणि सांत्वना देणारा असा एक चिरतन स्रोत राहिलेले आहे.
फॉकनरने कुठेतरी असे म्हटलेले आहे की ज्या माणसांना आयुष्य जगता येते ती ते जगतात, आणि ज्यांना ते जमत नाही अशी माणसे आयुष्याविषयी लिहितात. मी या दुसऱ्या वर्गात मोडणारा आहे. खरे तर प्रत्येक कलावंत हा कमी अधिक प्रमाणात त्या प्रागैतिहासिक आदिम कलावंतासारखाच असतो, जो लाखो वर्षांपूर्वीच्या त्या काळात, इतरांबरोबर शिकारीला न जाता मागे गुहेत थांबायचा; इतरांच्या जगण्याचे तो निरीक्षण करायचा.

पुढे वाचा

विनाशकाले विपरीत ‘धर्म’

अलिकडेच तीन आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या. एक मुंबईत, दुसरी ढाका येथे आणि तिसरी ब्रुसेल्सला. तीनही ठिकाणी चर्चासत्रांचा मुख्य विषय होता – धर्म आणि दहशतवाद. धर्म हा हिंसेची वा हत्याकांडाची प्रेरणा कशी होऊ शकतो? गांधीजींची हत्या करणारा नथुराम कोणत्याही व्यक्तिगत स्वार्थाने प्रेरित झालेला नव्हता, तर प्रखर हिंदुत्वाने भारलेला होता. इंदिरा गांधींना ठार मारणारे शीख सुरक्षा गार्ड्स हेही धर्मभावनेने झपाटलेले होते. फाळणीच्यावेळी झालेला लक्षावधी लोकांच्या हिंसेचा आगडोंब, दक्षिण आणि उत्तर आयर्लंडमधील कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट ख्रिश्चनांमधील १०० वर्षे चालू राहिलेला हिंसाचार, इस्रायल आणि पॅलेस्टिन यांच्यात आजही चालू असलेले घनघोर युद्ध या सर्वांमागे धर्म हीच उदात्त प्रेरणा आहे.

पुढे वाचा

पवित्रतेची बदलती व्याख्या

प्रभाकर नानावटी नवीन संस्कृती
आर्थिक व्यवहारांचे व माहिती-संवाद तंत्रज्ञानाचे सार्वत्रिकीकरण होत असलेल्या या कालखंडात सर्वस्वी वेगळी वाटणारी संस्कृती मूळ धरू पाहत आहे. ही नवीन संस्कृती मानवी हिताची असेल किंवा नसेलही. आता अस्तित्वात असलेल्या संस्कृतीच्या उलथापालथींची अनेक कारणे असू शकतील. पृथ्वीतलावरील प्रत्येकाला हवामानबदलाचा फटका बसत आहे. आपल्यातील सर्वांना पेट्रोलियम पदार्थ संपून जाण्याच्या भीतीने त्रस्त केले आहे. ऊर्जास्रोतांची कमतरता/अभाव या भीतीमुळे आपल्या सर्वांनाच आर्थिक अरिष्टांना सामोरे जावे लागेल की काय अशी धास्ती वाटत आहे. हीच धास्ती पाण्यासाठी, अन्नासाठी, ऊर्जास्रोतांसाठी ठिकठिकाणी युद्ध पेटवत आहे.

पुढे वाचा

एक क्रान्तीः दोन वाद (भाग ५)

[एक क्रान्तीः दोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. दुसऱ्या भागात आपण इंग्लंडच्या लोकसंख्येवर व कायद्यांवर झालेले परिणाम तपासले. सोबतच आदिम समाजवादी विचार, मार्क्सचे विचार व अमेरिकेतील व्यवस्थापित भांडवलवाद तपासले. तिसऱ्या भागात आपण क्यूबा व स्वीडन या दोन देशांमधील समाजवादाच्या आवृत्त्या तपासल्या. गंमत म्हणजे स्वीडन हे चांगला समाजवाद व चांगला भांडवलवाद या दोन्हींचे उदाहरण मानले जाते! यानंतर आपण काही देशांचा इतिहास तपासून पुढे पुनर्बाजारीकरणाचे प्रयत्न व त्यानंतरचे प्रश्न पाहिले. आपण जवळजवळ आजपर्यंत आलो आहोत !

पुढे वाचा

ई!

२६ फेब्रुवारी ‘०९ च्या लोकसत्ता मध्ये प्रशांत मोरे यांचा मराठी मासिकांची ग्लोबल स्पेस! हा लेख आहे. त्याचा मुख्य भाग असा.
निरनिराळी प्रसारमाध्यमे वरकरणी एकमेकांना मारक ठरत असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात ती परस्परपूरक असतात. माध्यमांचे हे “एकमेका साह्य करू’ धोरण सध्याच्या बदलत्या काळात काहीशा मागे पडलेल्या मराठी भाषेतील मासिक स्वरूपात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांना अनुकूल ठरल्याचे दिसत आहे. पुणेस्थित साची वेबनेट प्रा. लि. या कंपनीने ‘मायईमॅगझिन्स डॉट कॉम’ नावाचे संकेतस्थळ इंटरनेटच्या महाजालात मराठी मासिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. यानिमित्ताने माध्यमांच्या कोलाहलात कसेबसे तग धरून राहिलेल्या मराठी मासिकांना चक्क ग्लोबल स्पेस मिळाली आहे.

पुढे वाचा

‘मी’ आणि ‘माझे

विवेकी स्वार्थ हा कार्लचा धर्म आहे. तो मुक्त बाजारपेठेच्या वेदीवर पूजा करतो. फ्रॉईड जसे सर्व काही सुरत (Sex) आहे, असे मानायचा, तसे कार्ल सर्व सामाजिक व्यवहार, मग ते कितीही व्यामिश्र असोत, सोडवायला त्यांवर किंमतीचे लेबल लावतो, नागरी गृहसमस्या, शिक्षण. स्पर्धा आणि नफ्याची आशाच सर्व प्रश्न सोडवू शकते. मोठी थिअरी आहे, ही. सर्वांना प्रवाहातून त्यांचे त्यांचे बादलीभर पाणी घेण्यासाठी झगडू द्या, आणि त्या पाण्याचा हवा तो वापर करू द्या. काहीजण त्या पाण्यापासून वाफ बनवतील, काही पाणी पितील, काही आंघोळ करतील. उद्योजकता फोफावेल आणि लोक सुखी होतील.

पुढे वाचा