मासिक संग्रह: जानेवारी, २०१२

पुस्तक परिचय प्रेडिक्टेबली इरॅशनल… (लेखक – डॅन अर्ले)

माणूस जगतो, म्हणजे काय?
क्षणांपाठी क्षण, दिवसामागून दिवस आणि वर्षांनंतर वर्ष असा त्याचा प्रवास होणे म्हणजे जगणे असे सामान्यपणे मानले जाते. व्यावहारिक अर्थाने ते खरेही आहे. यासोबतच, माणूस जगतो म्हणजे क्षणोक्षणी तो निर्णयांची साखळी गुंफत जातो. ह्या क्षणानंतर तो असे जसे म्हटले जाते तसेच, ह्या निर्णयानंतर तो निर्णय, असे जगण्याचे स्वरूप असते.
आपण ‘जगात’ जगतो आणि त्यामुळे आपला आणि बाह्य जगाचा अप्रतिहत संबंध येत राहतो. या जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोण वातावरणातून, शिक्षणातून आणि संस्कारांतून आकाराला आलेला असतो. कोणत्याही क्षणाला आपण नव्याने सामोरे जात नाही.

पुढे वाचा

प्राचीन भारतातील विज्ञानाचा ह्रास का झाला?

प्राचीन भारतीय संस्कृती जगातल्या इतर सर्व संस्कृतींपेक्षा प्रगत होती आणि अण्वस्त्रांपासून (ब्रह्मास्त्र!) पुष्पक विमानापर्यंत सर्व काही आपल्याकडे कित्येक हजार वर्षांपूर्वीच होते असा एक समज सामान्य माणसाच्या मनात घट्ट रुजलेला दिसतो. हे खरे मानायचे तर मग असलेले सर्व गेले कुठे हा प्रश्न उद्भवतो. त्याचे उत्तर मुस्लिम आक्रमणात आणि ब्रिटिश राजवटीत शोधले जाते. ते कितपत बरोबर आहे? पुनरुज्जीवनवादी विचारसरणीची ही खेळी समाजाची सत्यापासून दिशाभूल करते. वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करता विज्ञानाची खरोखरच किती प्रमाणात झाली होती, ती कोणत्या कारणांनी थांबली असावी, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोण यांची अधोगती का झाली असावी, या प्रश्नांची उत्तरे ऐतिहासिक काळ, भौगोलिक सीमा, सामाजिक स्थिती यांचे संदर्भ तपासत उपलब्ध पुराव्यांच्या आधारे शोधण्याचा हा प्रयत्न आहे.

पुढे वाचा

आजचा सुधारक तर्फे परिसंवाद व वाचकमेळावा

आजचा सुधारक चे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2011 चे अंक मराठीकारण विशेषांक म्हणून काढण्यात आले होते. त्यांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने दि.20 नोव्हेंबर 2011 रोजी नागपूर येथील बाबुराव धनवटे सभागृहात ‘मराठी माणूस : गडचिरोली से सिलिकॉन व्हॅली’ ह्या विषयावर परिसंवाद व त्याला जोडून आ.सु. चा वाचक मेळावा आयोजित करण्यात आला होता. परिसंवादासाठी शिवसेना आमदार अभिजित अडसूळ, मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे, दै.भास्करचे समूहसंपादक प्रकाश दुबे आणि अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर ह्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

पुढे वाचा

भविष्य काबीज करा

[ऑक्युपाय वॉल स्ट्रीट ह्या चळवळीने अमेरिकेत अल्पावधीतच वेग घेतला आहे. वॉल स्ट्रीट हा, अमेरिकेची आर्थिक सत्ता ज्या मूठभरांच्या हातात आहे, त्यांचा भाग आहे. अमेरिकेच्या बाबतीत, आर्थिक सत्ता म्हणजे सर्वकष सत्ता. ती मूठभरांच्या हातात न राहता सर्वसामान्यांच्या हातात यावी यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले यामध्ये तरुणांचा सहभाग सर्वाधिक होता आणि आम्ही 99 टक्के जनतेचे प्रतिनिधित्व करतो असा त्यांचा दावा होता. हे ह्या आंदोलनाचे अनन्य वैशिष्ट्य म्हणावे लागेल, कारण भारतात वा अन्यत्रही, पुरोगामी चळवळींनी अशी भूमिका पूर्वी घेतली नव्हती. आम्ही आंदोलनकर्ते अल्पसंख्य असून इतरांचे (99 टक्क्यांचे) मार्गदर्शक आहोत, अशीच ती होती.

पुढे वाचा

समता (भाग 2) पुस्तकपरिचय : द स्पिरिट लेव्हल

[गेल्या अंकात विषमता आणि चिंता, विषमतेचे माप, आसास निर्देशांक हे भाग पूर्ण आले. आलेख आणि सांख्यिकी याची सुरुवात येथे पुन्हा देत आहोत.]
TSL मधील सर्व आलेख खालच्या डाव्या कोपऱ्यात सुरू होतात. आडव्या अक्षावरील मापे उजवीकडे वाढत जातात, तर उभ्या अक्षावरील मापे वरच्या दिशेने वाढत जातात. अशा आलेखांत डावीकडे खाली सुरू होऊन उजवीकडे वर जाणारी रेषा दोन मापांचा थेट संबंध दाखवते; म्हणजे आडवे माप जास्त तर उभेही माप जास्त. याउलट डावीकडे वरून सुरू होऊन उजवीकडे खाली जाणारी रेषा व्यस्त संबंध दाखवते, की आडवे माप जास्त तर उभे माप कमी.

पुढे वाचा

विकासनीतीची प्रतीकचिह्न (भाग-2)

1966 मध्ये भारतात हरितक्रांतीची सुरुवात झाली. ही सुरुवात तशी दणकेबाज होती. 1965-66 मध्ये भारतात अन्नधान्याचे एकूण उत्पादन 72.35 दशलक्ष टन होते. त्यानंतर फक्त 5 वर्षांत, म्हणजे 1970-71 मध्ये या उत्पादनाने 108.42 दशलक्ष टनाचा उच्चांक गाठला. ही घटना इतकी क्रांतिकारी होती की त्यातून कुठे तरी हरितक्रांती या शब्दाची निर्मिती झाली असावी. खरे तर या क्रांतीच्या मुळात असलेली नवी विकसित बियाणे देशात इतर ठिकाणीही वापरात आणण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण इतर राज्यांच्या तुलनेत हरितक्रांती सर्वाधिक वेगाने पसरली ती पंजाब आणि हरयाणामध्येच.
पंजाबमधले अन्नधान्य उत्पादन 1965-66 मध्ये 3.39 दशलक्ष टन होते, ते वाढत वाढत 1985-86 मध्ये 17.22 दशलक्ष टनापर्यंत पोचले.

पुढे वाचा

एक क्षण स्तब्धता

या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी
या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी
मी तम्हाला एक क्षण स्तब्ध राहण्याची विनंती करेन;
… त्यांच्या स्मरणार्थ जे अकरा सप्टेंबरला
वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये मारले गेले….
… आणि त्यांच्यासुद्धा, जे त्या हल्ल्याच्या सूडापोटी
छळले गेले, तुरुंगात टाकले गेले, दिसेनासे झाले,
अत्याचारित आणि बलात्कारित झाले, आणि मारले गेले..
…अमेरिका आणि अफगाणिस्तान, दोन्ही देशातल्या पीडितांसाठी
आणि मी अजून एक विनंती करू शकत असेन तर…
… स्तब्धतेची – एक पूर्ण दिवस,
त्या हजारो पॅलेस्तीनींसाठी जे अमेरिकेच्या हातांनी
आणि पाठोपाठ दशकानुदशके इस्रायली फौजांच्या
अतिक्रमणाने मारले गेले.

पुढे वाचा

इतिहासकार

भांड्यात दूध उकळत ठेवले तर ते उतू जाते. असे का घडते हे मला माहीत नाही, आणि माहीत करून घ्यावेसे वाटलेही नाही. या प्रश्नावर मला कोणी छेडले तर मी बहुधा त्याचे कारण हे देईन की दुधाच्या ठिकाणी उतू जाण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. ते तसे खरेही आहे, पण त्याने काहीच स्पष्ट होत नाही. पण मग मी काही भौतिक शास्त्रज्ञ नाही. त्याचप्रमाणे भूतकालीन घटनांविषयी, त्या तश्या का घडल्या हे जाणून घेण्याची इच्छा न बाळगता एखादा त्याच्यासंबंधी वाचन किंवा लेखनही करू शकेल. किंवा एखाद्याला इतके म्हणणे पुरेसे वाटेल, की दुसरे जागतिक महायुद्ध घडून आले.

पुढे वाचा