मासिक संग्रह: मार्च, २०१२

पत्रसंवाद

दत्तप्रसाद दाभोळकर, ‘या’ सदर बझार, सातारा. स्थिरध्वनी (02162)239195), भ्रमणध्वनी : 9822503656 id : dabholkard@dataone.in .
सूर्यापोटी शनैश्वर…? पण कोण…?
आजीव वर्गणीदारांची व्यथा मांडणाऱ्या माझ्या पत्राची खिल्ली उडवीत मला तर्कट तिरकस भाषेत दिलेले आपले उत्तर (आ.सु.494, फेब्रुवारी 2012) वाचले. आम्ही संपादक आहोत. मासीक आमचे आहे. तुमचे पैसे बुडवून वर आम्ही, तुमचीच आमच्या मासीकात खिल्ली उडव शकतो हा तमचा अहंकार मी समजू शकतो. पण रस्त्यावरचे गंड ज्याप्रमाणे आई, वडील, जात यांचा उद्धार करीत एखाद्यावर हल्ला करतात. त्याप्रमाणे माझे कुटुंब, परिवार यांचा उद्धार आपण करावयास नको होता.

पुढे वाचा

हिंदुधर्म आणि हिंदुत्व

(सेक्युलॅरिझम (धर्मनिरपेक्षता) हे विसाव्या शतकाने जगाला दिलेले मूल्य. ‘आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करीत आहोत’ असे संविधानाच्या उद्देशिकेत नमूद केले आहे. इहवाद हा सेक्युलॅरिझमचा एक अर्थ असला, तरी, सामाजिक जीवनात धर्म न आणणे, सामाजिक व वैयक्तिक जीवन त्या अर्थाने परस्परमुक्त ठेवणे हा त्याचा खरा अर्थ होता. धर्मनिरपेक्षता ही आतापर्यंत पुरोगामित्व व विवेकवाद ह्यांची खूण समजली जात असे. धर्मचिकित्सेपासूनच सर्व चिकित्सांची सुरुवात होते असे मानण्यातून ह्या संकल्पनेची सुरुवात झाली. आता मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन, त्या शब्दाचा आजचा अर्थ, व्यक्तिगत जीवनातही धर्माचे पालन न करणे असा झाला आहे, कारण, पुरोगाम्यांच्या मते धर्मापासून मुक्ती ही सामाजिक जीवनाची पूर्वअट मानली जाते.

पुढे वाचा

पुस्तकपरिचय पंडित-सुधारक : श्री. म. माटे (1006-1957)

प्रोफेसर माटे यांचा जन्म १८८६ साली दिगंबर-श्वेतांबरी जैन यांचे तीर्थक्षेत्र असलेलया वाशिम जिल्ह्यातील शिरपर (जैन) येथे व्हावा हा विलक्षण योगायोग मानला पाहिजे. कारण जैन तत्त्वज्ञान तत्त्वतः वर्णव्यवस्थेविरुद्ध असलेले वेदांचे प्रामाण्य नाकारणारे नास्तिकदर्शन. प्रोफेसर माटे यांचे जीवितकार्य अस्पृश्योद्धार. त्यांनी अस्पृश्य-दलितांसाठी शाळा चालविल्या; त्यांना आरोग्याचे धडे दिले; त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची प्रसंगी व्यवस्था केली. त्यांच्या व्यथेला वाचा फोडणारे उपेक्षितांचे अंतरंग ही व्यक्तिचित्रे सादर केली. त्यामध्ये ‘बन्सीधरा तू कोठे जाशील’ यासारखी हृदयद्रावक कथा लिहिली. बहुतांची अंतरे राखून अस्पृश्योद्धाराचे कार्य केले म्हणून त्यांना बहुधा सनातनी सुधारक म्हणत असावेत.

पुढे वाचा

साहित्यातून विवेकवाद (२) – जॉर्ज ऑर्वेल

स्टाईनबेकसारखाच 1902 साली जन्मलेला एरिक ब्लेअर. वडील बंगालात एक्साईज खात्यात होते. स्पष्ट सांगायचे तर अफूचे पीक नियंत्रित करणाऱ्या खात्यात होते. मुलगा शाळेत जायच्या वयाचा झाल्यावर इंग्लंडमध्ये निवासी शाळा शोधल्या गेल्या. त्या काळची इंग्रजी शिक्षणव्यवस्था ग्रामर म्हणजे प्राथमिक शाळा, प्रेपरेटरी किंवा प्रेप शाळा या माध्यमिक, आणि चांगल्या उच्चशिक्षणासाठी पब्लिक स्कूल्स. खरे तर पब्लिक स्कूल्स अत्यंत प्रायव्हेट आणि महाग असायची. त्यातूनही जरा चांगल्या, ख्यातनाम पब्लिक स्कूल्समध्ये प्रवेश कठीण असायचा, आणि शिष्यवृत्त्या आणिकच अवघड. मध्यम दर्जाच्या सनदी अधिकाऱ्याच्या मुलाला शिष्यवृत्ती नसली तर सामान्य, अनिवासी प्रायव्हेट शाळा हाच पर्याय; अत्यंत असमाधानकारक, पण एरिक हुषार होता.

पुढे वाचा

ही स्त्री कोण? (भाग १)

[ बाईचे बाईपण, तिचे भोग, दुःख ह्या सर्वांचे मूळ शोधण्याच्या उद्देशाने त्या अर्थाच्या मराठी, संस्कृत व इंग्रजी शब्दांच्या व्युत्पत्ती शोधण्याचा हा प्रयत्न. – संपादक ]
माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगलं
माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडलं
– बहिणाबाई (1880-1951)
स्त्री-पुरुष हे शब्द नेहमीच फारच सैलसर अर्थाने वापरले जातात. ते जरा नीटस अर्थाने वापरले गेले तर त्यांच्या उपयोजनातील संकल्पनात्मक गोंधळ संपण्याची शक्यता असतेच पण जरा शिस्तबद्धताही येते.
‘स्त्री’ला मराठीत पर्यायी शब्द आहे महिला, वनिता, बाई, इ. अनेकवचन बायका, बाया. हिन्दी/उर्दूमध्ये औरत, लौंडी इ.

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (२)

मुळात हे विश्व अस्तित्वात का आहे?

प्रसिद्ध विज्ञानकथालेखक डोग्लास एडम्स यांच्या मते या विश्वाचा आकार प्रचंड, अतिप्रचंड आहे. तरीसुद्धा महास्फोट सिद्धान्तानुसार (big bang theory) हिशोब केल्यास एके काळी हे विश्व आकाराने फारच लहान होते, असे म्हणता येईल. 1370 कोटी वर्षापूर्वी काळ व अवकाश शून्यातून बाहेर पडले, असा दावा हा सिद्धान्त करतो. हे कसे शक्य झाले? हाच प्रश्न अजून एका प्रकारे विचारता येईल. या जगात कशाचेही अस्तित्व का आहे? प्रश्न फार मोठा आहे. अनाकलनीय आहे. शून्यातून विश्वाची उत्पत्ती, किंवा कुठल्याही वस्तूची उत्पत्ती होऊ शकते याचीच कल्पना करणे अवघड ठरत आहे.

पुढे वाचा

लोकनेता

आपल्या लोकशाही राज्यप्रणाली असलेल्या देशात आमदार अथवा एमएलए ही थेट निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये सर्वात महत्त्वाची कड़ी आहे. एकाच वेळी ती जनतेच्या सर्व थरांत संबंध असलेली व सरकारांतही अधिकार असलेली व्यक्ती असते. सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी केल्यावर वा करताना त्याची काय प्रतिक्रिया येते ते सर्वप्रथम कळणारी ती व्यक्ती असते. त्याला बरीच तारेवरची कसरत करावी लागते. एकतर त्याला मतदारांच्या आवडी(interest)चे विषय सांभाळावे लागतात तर दुसरीकडे तो त्याच्या पक्षाला बांधील असतो. जर त्याला सरकारात काही स्थान मिळवायचे असले तर त्याला त्यांच्या पक्षातल्या श्रेष्ठींना चांगलेच सांभाळावे लागते.

पुढे वाचा

पैशाचे मला दिसणारे स्वरूप (१)

कोणत्याही वस्तूला. मूल्य येते. ते तिला असलेल्या मागणीमुळे. ज्या वस्तूला मागणी नाही, तिला किंमत नाही. ही मागणी एकतर गरजेपोटी किंवा हावेपोटी असते. गरज लवकर पुरी होते आणि हाव कधीच संपत नाही. ज्या वस्तूची गरज लवकर संपेल, तिला किंमत असली तरी ती अत्यल्प असते. उदाहरणार्थ, तर अन्न! …..
सोन्याला व रजांना जी किंमत असते ती त्यांच्याविषयी माणसाला वाटणाऱ्या हावेमुळे प्राप्त झाली आहे.
सध्या पैसा म्हणून जी वस्तू वापरली जाते. ती म्हणजे कागद! कागदाची उपलब्धता विपुल आहे. त्याला किंमत कमी असते; पण त्या क्यगदावर सरकारकडून विशिष्ट पद्धतीने आकदा कापला गेला की त्या कागदाविषयी प्रत्येकाच्या मनाव व उत्पन्न होते आणि त्या हावेमुळे केवळ त्या कागदाचा उपयोग चलन म्हणून होऊ शकतो.

पुढे वाचा

नक्षलवाद, लोकशाही व देशाची अखंडता

नक्षलवादी चळवळीच्या हिंसाचाराविरुद्ध लोकप्रतिनिधी बोलत नाहीत कारण त्यांना जिवाची भीती असते व निवडणुका जिंकायच्या असतात. विकासकामांना विरोध हे नक्षलवाद्यांचे अजूनही प्रभावी हत्यार असले, तरी यामागील गणिते परिस्थिती बघून ठरवली जातात. जनतेने विकासकामात सहभागी होऊ नये असे बजावणाऱ्या नक्षलवाद्यांना कंत्राटदारांनी केलेली कामे चालतात, कारण त्यांतून खंडणी मिळते. त्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या भागाचा पायाभूत विकास झाला तर जनता पाठीशी राहणार नाही, अशी भीती या चळवळीला सतत वाटत आली आहे. यामुळे अशा प्रकरणांत खंडणी उकळताना अतिशय सावध पावले उचलली जातात. नक्षलग्रस्त भागाचा विकास झाला तर आदिवासी प्रगत होतील व कोणताही प्रगत माणूस या चळवळीकडून होणाऱ्या नरसंहाराबाबत शांत बसणार नाही याची जाणीव नक्षलवाद्यांना आहे; म्हणूनच त्याना विकास नको आहे.

पुढे वाचा