मासिक संग्रह: मे, 2014

थॉस रॉबर्ट माल्थस – एक अर्थशास्त्रीय अवलोकन

अठराव्या शतकात राजकीय अर्थशास्त्राचे जनक मानले गेलेले अॅडम स्मिथ (Adam Smith) (१७२३-१७९०) यांच्या विचारांचा पगडा होता. जे काही बदल समाजात घडत आहेत, जी काही औद्योगिक प्रगती समाजात होत आहे ती सर्व मनुष्यजातीला वरदान ठरेल ही भावना जनसामान्यांत आणि विचारवंतां ध्ये रुजू लागली होती. हे सर्व बदल समाजाला एका आदर्श सामाजिक व्यवस्थेकडे घेऊन जातील हा विशास मूळ धरू लागला होता. अशातच मे १७९८ मध्ये जोसेफ जोहन्सन (Joseph Johnson) या लेखकाच्या नावाने इंग्लंडमध्ये एक निबंध प्रकाशित झाला. विषय होता जनसंख्या. आणि या एका छोट्याशा निबंधाने तत्कालीन अर्थकारण आणि राजकारण ढवळून काढले.

पुढे वाचा

पुस्तक परिचय

काबाचा पवित्र काळा पाषाण मुळात अल्-उझ्झा या अरबस्तानच्या आद्य मातृदेवतेचे प्रतीक होता —- ‘अरबस्तानची महादेवी सर्वसामान्यपणे अल्-उझ्झा या नावाने संबोधली जाई. अल्-किंदी आपल्याला सांगतो की, अल्-उझ्झा म्हणजे चंद्र. तिचे मुख्य मंदिर, आठा अरबस्तानचे सर्वांत प्रसिद्ध व पवित्र स्थान, मक्केचे काबा हे होते. या पवित्र स्थानाचे वतनदार असलेला कुरेश गण (कबीला) इस्लामपूर्व काळात तिचा पुरोहितवर्ण होता आणि म्हणूनच त्याला ‘अब्द अल्-उस्सा’, ‘अल्-उझ्झाचे दास’, अशी पदवी होती. पण मक्केच्या मंदिरात तिची प्रत्यक्ष सेवा वृद्ध पुजारिणी करीत. अजूनही काबाच्या पालकांना बनु साहेबाहू, ‘म्हातारीची मुले,’ असे ओळखले जाते….

पुढे वाचा

हिंदू कशाचा अभिमान बाळगू शकतात आणि त्यांनी कशाचा अभिमान बाळगावा

मूळ लेखक: रामचन्द्र गुहा

धर्माच्या भविष्याची चिंता करणाऱ्यांनी सुधारकांच्या कार्याचे मूल्य लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनी ह्या प्राचीन, अश्मीभूत अनेक तुकड्यां ध्ये विभागल्या गेलेल्या धर्माला त्याच्या पूर्वग्रहापासून, त्याच्या संकुचित मनोवृत्तीपासून मोकळे केले.”
माझ्या एका उच्चवर्णीय ‘भद्रलोक’ मित्राचे असे मत आहे की १६ डिसेंबर हा दिवस भारत-सरकारने ‘विजय-दिवस’ म्हणून साजरा करावा. १९७१ साली बांगलादेश युद्धात, पाकिस्तानी सेनेने भारतीय सेनेसमोर त्यादिवशी शरणागती पत्करली होती. त्याच्यामते सर्वसाधारण भारतीय आणि प्रामुख्याने हिंदू ज्या सोशीक, पराभूत मनोवृत्तीमुळे पांगळे बनले आहेत त्यातून त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे आणि विजय दिवसासारखे समारंभ त्यासाठी आवश्यक आहेत.

पुढे वाचा

धर्मसुधारणा – विचाराचा एक अंतर्गत प्रवाह

श्रद्धा आणि परंपरा हीच धर्माची बलस्थाने असतात असे मानले जाते. त्यामुळे धर्म आणि धार्मिक आचार यांच्यात सुधारणा संभवत नाही, असे गृहीत धरले जाते. जो धर्म एकाच धर्मग्रंथाचे प्रामाण्य मानत नाही, त्या हिंदुधर्मात थोडी लवचिकता होती; परंतु पारतंत्र्याच्या काळात ती नष्ट होऊन रूढींना कवटाळून बसण्याची प्रवृत्ती निर्माण झाली.
ह्यावर मात करून धर्मचिकित्सा करण्याचे प्रयत्न दीडशे वर्षांपूर्वी सुरू झाले. धार्मिक परंपरा न मानणाऱ्यांनी व त्या न पाळणाऱ्यांनी धर्मसुधारणेचा विचार मांडला तर तो लोकांना पटणे अवघड असते. वाईसारख्या क्षेत्री धर्मशास्त्राचे अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या एका ज्ञाननिष्ठ तपस्व्याने धर्मसुधारणेचा एक क्रांतिकारक प्रयत्न केला.

पुढे वाचा

पुरोहित राजा आणि राजधर्म

आज (२३ एप्रिल २०१४) सर्व पत्रपंडित आणि ‘पोल’पंडित एकमुखाने सांगत आहेत की येत्या १६ मे रोजी नरेंद्र मोदी यांना भारताच्या पंतप्रधानपदाची वस्त्रे मिळतील. मतभेद असलेच तर भाजपचे संख्याबळ, सरकार बनवण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून व आघाडीबाहेरून किती मदत लागेल, त्या मदतीसाठी काय मोल द्यावे लागेल, वगैरे तपशिलाबाबत आहेत.
इथपर्यंत पोचण्यासाठी मोदी, त्यांचा पक्ष भाजपा, त्यांचे ‘माहेर’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या सर्वांनी गेले सहा महिने मोदींची जनमानसातील प्रतिमा बदलण्याचा चंग बांधला आहे. संघ प्रचारक, कट्टर हिंदुत्ववादी, तितकेच कट्टर मुसलमानद्वेष्टे, ही मोदींची प्रतिमा पुसून एक सेक्युलर विकासपुरुष अशी प्रतिमा रेखण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे.

पुढे वाचा