मासिक संग्रह: एप्रिल, २०१५

‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’

सर्वव्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती! बौद्धधर्म हिंदुस्थानांतून परांगदा होईपर्यंत (म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत) तरी भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच काही सुगावा लागत नाही. मग तोपर्यंत आमचे हे हिंदू देव थंडीवाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातान्हांत धडपडत पडले तरी कोठे होते? विद्वान संशोधकांच्या मते, आर्याच्या ऋग्वेदकाळाची गणना जास्तीत जास्त इसवी सनापूर्वी ७००० वर्ष धरली, तर इतकी वर्षे हे आमचे मोक्षदाते देव, देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे? आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला, तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरडय़ा भाकरीची पंचाईत!

पुढे वाचा

नीतीची मूलतत्वे (पूर्वार्ध)

नीती आपल्याला समाजात कसे वागावे ते सांगते. नीतीचे नियम ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ या विषयी असतात. असे नियम जो पाळतो तो/ती नीतीमान: अशा व्यक्तीची नीतिमत्ता चांगली आहे असे म्हटले जाते. समाजात सर्वांनी नीतीने वागावे अशी अपेक्षा असते. परंतु काय करावे वा करू नये हे ठरवायचे कसें ‘चांगले वागावे, वाईट वागू नये’ हे खरे, पण ‘चांगले’ काय हे नक्की कसे ठरवायचे? एखाद्याला जे चांगले वाटेल ते दुसऱ्याला तसे वाटेलच असे नाही.

वागणूक चांगली-वाईट, इष्ट-अनिष्ट,योग्य-अयोग्य हे ठरवण्याचा मक्ता धर्मसंस्थेने घेतलेला आहे.

पुढे वाचा

गोळीनं विचार मारता येतात का?

१६ फेब्रुवारीची सकाळ… डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास दीड वर्ष उलटूनही लागत नाही, याचा निषेध सांस्कृतिक मार्गानं करण्यासाठी ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या इस्लामपूर शाखेनं बसवलेलं रिंगण-नाटक घेऊन आम्ही दिल्लीत दाखल झालो. पहिला प्रयोग सुरू करण्याच्या पाचच मिनिटं आधी कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्याची बातमी येऊन थडकली. या प्रकारात पानसरे यांच्या पत्नी उमाताईही जखमी झाल्या.

तीच सकाळची वेळ, तेच व्यायामाला जाणं आणि तसेच मोटारसायकलवरून आलेले मारेकरी. आणि व्यक्ती तरी कोणती निवडलेली? डॉ. दाभोलकरांच्या इतकीच विधायक कृतिशील, धर्मचिकित्सेचा आग्रह धरणारी, दलित, वंचित, शोषितांच्या हक्कांसाठी लढणारी आणि लोकशाही मार्गानं जनसंघटन उभं करण्यासाठी हयात वेचणारी.

पुढे वाचा

दलित स्त्रियांची आत्मकथने : एक ऐतिहासिक दस्तऐवज

व्यक्ती आणि समष्टी यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्यांवरती समष्टीच्या अंतरंगातून प्रकाशकिरण टाकून, तिचे चिकित्सक समीक्षण करणारी आणि त्याचवेळी व्यक्तीच्या खासगी आयुष्याच्या व `स्व’रूपाच्या जडणघडणीचे आकलन इतरेजनांसमोर सार्वजनिक रीतीने मांडणारी कृती म्हणजे आत्मकथन होय. अशी कृती एकाच वेळी व्यक्ती आणि समष्टीच्या जडणघडणीत सातत्याने कार्यरत असणाऱ्या, बहुविध आणि परस्परावलंबी प्रियांशी स्वत:च्या समूहाला आणि त्याचबरोबर वाचकालाही, जोडून घेत असते. एका दृष्टीने आत्मचरित्रे म्हणजे इतिहासाच्या विस्तीर्ण अवकाशातील एका विशिष्ट भूप्रदेशाचा स्थलकाल – संस्कृतीविशिष्ट असा जिवंत नकाशा उलगडणारे पथदीपच आहेत असे मानले पहिजे.

व्यक्तीव्यक्तींनी मिळून समाज बनतो असे वरकरणी जरी वाटत असले तरी ते खरे नाही.

पुढे वाचा

माझे मनोगत……

भारतीय वैदिक तत्त्वज्ञानात सहा प्रमुख दर्शने मानली आहेत. ती अशी :

(१) सांख्य, (२) वैषेशिक, (३) पूर्वमीमांसा, (४) न्याय, (५) योग आणि (६)वेदान्त (उत्तरमीमांसा हा वेदान्ताचाच भाग आहे.)

त्यांपैकी पहिली तीन संपूर्णपणे निरीश्वरवादी असून त्यांचे प्रणेते अनुक्रमे कपिल महामुनी, महर्षी कणाद, आणि आचार्य जेमिनी हे तिघेही महान तत्त्ववेत्ते आणि विचारवंत म्हणून गणले जातात. न्याय आणि योग ह्या दर्शनांचेविषय वेगळे असून “ईश्वर” हा त्यांच्या चर्चेचा विषय नाही. काही अनुषंगाने ईश्वराचा उल्लेख आला असेल तेवढाच. एका परीने न्याय आणि योग ही दोन्ही दर्शने ईश्वराच्या बाबतीत “उदासीन” आहेत.

पुढे वाचा

‘मानव विकास अहवाला’त भारत

गाझा पट्टीत होत असलेल्या मानवी हक्क हननाविरुद्ध ‘युनायटेड नेशन्स ह्युमन राइट्स काऊन्सिल’ ने मांडलेल्या ठरावाच्या बाजूने भारताने ज्या दिवशी मतदान केले त्याच्या आदल्याच दिवशी, म्हणजे २३ जुलै २०१४ रोजी ‘जागतिक मानव विकास अहवाल- २०१४’ प्रसिद्ध झाला. दर वर्षी प्रसिद्ध होणारा हा ‘मानव विकास अहवाल’ म्हणजे जगातील प्रत्येक देशासाठी स्वत:ला आरशात न्याहाळून घेण्याची एक संधी असते. देशाची स्थिती-गती काय आहे ते समजून घेता येणे शक्य होते. देशहिताच्या दृष्टीने अग्रक्रमाने कोणती पावले उचलायला हवीत हेही कळते. मागच्या दोन दशकांत मानव विकासाच्या आघाडीवर भारताची जी वाटचाल सुरू आहे ती कितपत समाधानकारक आहे?

पुढे वाचा

सुसह्य नागरीकरणासाठी हवा संतुलित विकास

“शहरीकरणाच्या प्रक्रियेत अग्रेसर असलेले राज्य’, असा महाराष्ट्राचा लौकिक पार त्याच्या स्थापनेपासूनचा आहे. आर्थिक विकास, औद्योगीकरण आणि शहरीकरण यांचे जैविक नाते ध्यानात घेता, या वास्तवाचा विस्मय वाटत नाही. औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले राज्य, अशीच महाराष्ट्राची ओळख आहे. वस्तुनिर्माण उद्योग (मॅच्युफॅक्‍चरिंग) आणि सेवा उद्योग (सर्व्हिसेस) या दोन बिगरशेती क्षेत्रांचा राज्याच्या ठोकळ उत्पादितामधील एकत्रित वाटा आज जवळपास 89 टक्‍क्‍यांच्या घरात आहे. तर, 2011 सालच्या जनगणनेची जी प्राथमिक आकडेवारी हाती येते, तिच्यानुसार नागरीकरणाची राज्यातील सरासरी पातळी 45.23 टक्के इतकी आहे. नागरीकरणाच्या देशपातळीवरील 31 टक्‍क्‍यांच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील नागरीकरणाची सरासरी पातळी किती तरी अधिक आहे.

पुढे वाचा

अनश्व रथ, पुष्पक विमान या लेखमालिकेवरील चर्चासत्र

(रवींद्र रुक्मीणी पंढरीनाथ यांच्या आजचा सुधारक च्या सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर 2015 च्या अंकात अनश्व रथ, पुष्पक विमान ही लेखमालिका प्रकाशित झाली होती. त्या लेखमालिकेवरील चर्चासत्राचा हा वृत्तांत आहे. हे चर्चासत्र मुंबई सर्वोदय मंडळ, शांताश्रम, ताडदेव, मुंबई येथे दि. ७.१२.१४ रोजी आयोजित केली होती. व डॅनियल माजगावकर, सुनीती सु. र. व सुरेश सावंत या चर्चासत्राचे निमंत्रक होते. चर्चेचे शब्दांकन अनुराधा मोहनी यांनी केले आहे. – का. सं)

सुनीती: ही चर्चा केवळ वेळेवर नाही तर आशयावर अवलंबून आहे.

पुढे वाचा

मला दंड द्या!

देशावर, समाजावर अशी घोर आपत्ती व पतन पाहून –
या कठिण संकटकाळातून सुटकेसाठी –
पुनः पुन्हा व आवश्यक चिंतन–मननानंतर-
मला एखादा विचार मार्ग पटला आहे.
पण
अशा विचारमार्गावर आचरणासाठी
माझे हातपाय गळत असतील
आणि
अशा विचारांनुसार जीवन जगण्यासाठी
मी प्रगतीशील व प्रयत्नशील नसेल;
तर
हे माझ्या देशा, माझ्या समाजा –
मला दंड द्या.
माझ्या नाकर्तेपणाचा धिक्कार करा भर चौकात.
हे मला जगवणाऱ्या माती;
माझ्या फुफ्फुसात भरलेली हवा;
माझे सिंचन करणारे जल;
ह्या कठिण काळातही
जगण्याच्या माझ्या तटस्थतेवर थुंका.
हे माझ्या मुक्त आकाशा, माझ्या विनम्र झाडांनो,
आणि धडधडून पेटलेल्या अग्नीशिखांनो;
माझ्या सोई-सुविधालोलूप दिशाहीनतेसाठी
मला दंड द्या.

पुढे वाचा