मासिक संग्रह: डिसेंबर, २०१५

दरी

नकाच पडू माझ्या भानगडीत
चालू देत माझं आपलं
वेगळंच काहीतरी, भलतंच काहीतरी
तुम्हाला नाहीच कळणार
माझा आवाज तुमच्यापर्यंत नाहीच पोहोचणार
कारण आपल्यामधे एक दरी आहे
हां म्हणजे नातं आहेच, कचकड्याचं
तो डीएने पण आहे, ते जीन्स पण
पण या सगळ्याला व्यापून उरणारी
एक भली थोरली दरी आहे आपल्यात
या दरीत ते शेतकरी आहेत
ज्यांच्या विषयी तुम्हाला जराही कणव नाही
कारण ते टॅक्स भरत नाहीत
’ती लोकं’ आहेत फॅंड्रीमधली
ज्यांची तुम्हाला किळस वाटते
ती आदिवासी लोकं पण आहेत
विकासाच्या मार्गातले धोंडे बनलेली
आणि ती विस्थापित लोकं पण
ती नाही का — सिग्नल्स वर दिसतात
त्यांचे घाणेरडे हात आपल्याला, आपल्या गाडीला लावत भीक मागतात
असं सगळं तुम्ही नाकारलेलं वास्तव या दरीत साचलंय
नदीत वाहून आलेल्या गाळासारखं
दिवसागणिक थरावर थर साचताहेत
घट्ट होत जाताहेत
भीतीदायक आहे सगळं
प्रलय येऊन पुनश्च सृजनाची सुरुवात असलेला
पिंपळाच्या पानावरचा तो बाळकृष्ण दिसेपर्यंत तरी

amrutapradhan@gmail.com

पुढे वाचा

हिटलरसंबंधी दोन चित्रपट

हिटलर, एकाधिकारशाही, फॅसिझम

आधुनिक मानवी इतिहासातील काळाकुट्ट पट्टा म्हणून दुसऱ्या महायुद्धातील ज्यूंची वंशहत्या या घटनेकडे बघितले जाते. त्यासाठीचा खलनायक म्हणून आणि प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच्या आणि युद्धाच्या काळातील जर्मनीचा हुकूमशहा म्हणून हिटलर आपल्याला ज्ञात आहे. हिटलरसंबंधी दोन चित्रपटांची ओळख करुन देणे हा या लेखाचा हेतू आहे. यातील पहिला चित्रपट आहे ’डाऊनफॉल’; ज्याची मांडणी हिटलरच्या आयुष्यातील शेवटच्या दहा दिवसांतील घटनांवरती आधारलेली आहे. दुसरा चित्रपट आहे ’हिटलर : द राईज ऑफ इव्हिल’; ज्यात हिटलरच्या राजकारणातील प्रवेशापासून तो हुकुमशहा बनण्यापर्यंतच्या कालावधीतील राजकीय घटनांवर आधारलेले चित्रण आहे.

पुढे वाचा

धर्म आणि मैत्री…

धर्म, मैत्री

तिच्या वडिलांबरोबर ती प्रथमच माझ्या बँकेच्या शाखेत आली होती. तिचे वडील नेहमीच माझ्याकडे येत, त्यांना मी एक एकाकी वृद्ध प्रोफेसर म्हणून ओळखत होते. या सधन वस्तीतील एका श्रीमंत स्टायलिश मुलांनी गजबजलेल्या कॉलेजमध्ये ते उर्दू शिकवत तेव्हापासून मी त्यांना पाहात होते.
प्रोफेसर मुस्लिम होते. अत्यंत देखणे रूप, गोरापान रंग, खानदानी वावर, देहबोली. या वार्धक्यात अधिकच गहिरलेली डोळ्यातली निळाई. सर उर्दूतले प्रसिद्ध शायर-साहित्यकारही होते.
आणि जिभेवर उर्दू शेरोशायरीबरोबरच फर्मास इंग्लिश भाषेची साखरपेरणी. त्यातच रंगतदार आठवणी. कधी कॉलेजचे किस्से, कधी फिल्म इंडस्ट्रीतल्या खमंग कहाण्या, सरांची दिलीपकुमार वगैरे फिल्मी दिग्गजांशी अंतरंग मैत्री होती.

पुढे वाचा

लंडन पार्लमेंट स्क्वेअरमध्ये गांधी

गांधी, लंडन, लोकशाही, वसाहतवाद

गांधीजी हे एक सातत्याने उत्क्रांत होत गेलेले व्यक्तित्व होते. त्यामुळे एखाद्या विशिष्ट संदर्भबिन्दूवरून त्यांची भूमिका ठरविण्याने नेहमीच गफलत होते. इंग्रजी राज्य, वसाहतवाद, पाश्चात्त्य सभ्यता ह्या सर्वांविषयीची त्यांची भूमिका कशी बदलत गेली व बदलाची ही प्रक्रिया त्यांच्या एकूण जीवनदर्शनातील स्थित्यंतराशी कशी समांतर होती, ह्याचा एका युवा अभ्यासकाने घेतलेला हा अनोखा शोध.

महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले त्याला ह्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यायोगाने गांधींच्या कारकीर्दीचे पुनर्विलोकन करण्याचा प्रयत्न चालू आहे.

पुढे वाचा

आर्थिक प्रगतीसाठी सहिष्णुता आवश्यक

आर्थिक प्रगती, सहिष्णुता, अभिव्यक्तिस्वातंत्र्य

प्रश्न विचारणे आणि पर्यायी दृष्टिकोन मांडणे यांतच नवीन संकल्पनांचा उगम असतो. म्हणूनच भारताला आर्थिक प्रगती करायची असेल तर येथील समाजजीवनात प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहायला हवे. देशाच्या आर्थिक विकासाची सहिष्णुता ही पूर्वअट आहे. एकविसाव्या शतकात मानाने जगायचे असेल तर आपल्याला आपल्या परंपरेतील विमर्श व खुली चिकित्सा ह्या प्राणतत्त्वांची जोपासना करावी लागेल. आय आय टी दिल्ली येथील पदवीदान-समारंभात भारतीय रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांनी केलेले महत्त्वाचे प्रतिपादन.

मला या संस्थेमध्ये पदवीदानाचे भाषण देण्यास बोलाविल्याबद्दल मी आपला आभारी आहे. तीस वर्षांपूर्वी मी याच संस्थेतून विद्युत्-अभियांत्रिकीची पदवी मिळविली होती.

पुढे वाचा

तोपर्यंत प्रश्न राहतीलच!

गुजरात मॉडेल, अभिव्यक्तिस्वातंत्र्य

देशातील नामवंत साहित्यिक, शास्त्रज्ञ, व कलाकार ह्यांनी केलेल्या ‘पुरस्कार वापसी’वरून अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्नावर सध्या देशभर वादंग माजला आहे. ह्या संदर्भात अभिव्यक्तिस्वातंत्र्य व गुजरात मॉडेल ह्या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर गुजराथचे रहिवासी असणाऱ्या एका सर्जनशील साहित्यिक व भाषातज्ञाचे हे वैचारिक मंथन..

जोपर्यंत भीती व आभास या दोन गोष्टी देशाची नजरबंदी करत राहतील, तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जात राहीलच. कधी साहित्यिकांकडून, कधी चित्रपटकलाकारांकडून, कधी शास्त्रज्ञांकडून, कधी विद्यार्थ्यांकडून, आणि एके दिवशी संपूर्ण देशाकडून..
गेली साडेतीन दशके माझे वास्तव्य गुजरातमध्ये आहे. त्यातील पंधरा वर्षे, अलीकडे अलीकडे भारतभर गाजत असलेल्या ‘गुजरात मॉडेल’ला जवळून अनुभवण्यात मी घालवली आहेत.

पुढे वाचा

देवाचे मन जाणताना

विश्वनिर्मिती, ईश्वर संकल्पना, विवेकवाद

विज्ञानाच्या मदतीने मानवाने अतिशय थोड्या कालावधीत विश्वनिर्मितीचा कूटप्रश्न सोडविण्याच्या दिशेने दमदार वाटचाल केली आहे.जागतिक तापमानवाढ व वाढती शस्त्रास्त्रस्पर्धा यांतून मानवजात अजून 500 वर्षे तग धरून राहिली तर ह्या प्रश्नाच्या उत्तराच्या खूप जवळ आपण पोहचू शकू. पण हे कोडे त्याला पूर्णपणे उलगडले तरी ईश्वर ह्या संकल्पनेला फारसा धक्का बसणार नाही. ती संकल्पना व विवेकवाद ह्यांत अंतर्विरोध निर्माण होऊ न देणे हे विवेकवादी व्यक्तींसमोरील महत्त्वाचे आह्वान आहे.

“जर आपल्याला सृष्टीचा स्वयंपूर्ण सिद्धान्त शोधता आला तर, कालांतराने तो फक्त काही निवडक शास्त्रज्ञच नव्हे तर तत्त्वज्ञ आणि सर्वसामान्य माणसांनाही विश्वाच्या व मनुष्यप्राण्याच्या उत्पत्तीबद्दल मार्गदर्शक ठरेल.

पुढे वाचा

संपादकीय

आजचा सुधारक चा हा नवा अंक आपल्यासमोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याची संधी मी घेत आहे.
मराठीत नियतकालिकांची कमतरता नाही. त्यांपैकी वैचारिक नियतकालिकांची स्थिती मात्र गेल्या अनेक वर्षांपासून चिंताजनक म्हणावी अशी आहे व ती दिवसेंदिवस ढासळताना दिसते आहे. मुळात मराठी भाषेतील व्यवहारालाच ओहोटी लागली आहे. वैयक्तिक संवादापासून गहन विमर्शापर्यंत सर्व व्यवहारांत इंग्रजीशिवाय आपले पानही हलू शकणार नाही अशी समजूत येथील अभिजनांनी (व त्यांचे अनुकरण करणाऱ्या बहुजनांनी) करून घेतली आहे. समाजात असहिष्णुता वाढीला लागली आहे, किंवा सुप्तावस्थेतील अनुदार वृत्ती सामाजिक माध्यमे व प्रत्यक्ष कृतीच्या रूपाने उसळून बाहेर येत आहे.

पुढे वाचा