Author archives

आता कोण आहे क्लेशात? गेल व्हाइन्स

‘एखादा प्राणी क्लेशात असणे शक्य आहे का?’ हे कसे ठरवावे याबद्दल दोन ब्रिटिश प्राणिशास्त्रज्ञांनी एक मत मांडले आहे. ते म्हणतात की उत्क्रांतीतून जर एखादा प्राणी एखादी परिस्थिती भोगण्यास ‘लायक’ अशा शरीररचनेला पोचला असेल, तर ती परिस्थिती क्लेशकारक असण्याची शक्यता आपण कल्पनेने मान्य करण्याइतकी जास्त नसणेही शक्य आहे. आणि जर क्लेश होत असतील अशा परिस्थिती शेतांत किंवा प्रयोगशाळांमध्ये असतील तर अशा परिस्थिती याप्रमाणे (क्लेश न देणाऱ्या त-हेने) बदलणे शक्य आहे. इमूळ वाक्ये आहेत —- To discover whether an animal is likely to be suffering , they say, you need to ask if evolution has designed it to deal with such conditions.

पुढे वाचा

लोकशाहीने घोडे मारलेले नाही?

भारताच्या लोकशाहीने काही घोडे मारलेले नाही. दिशाभूल होऊन ताळतंत्र सोडलेल्या आणि कोणत्याही सकारात्मक कामाला हात न घालता केवळ सत्तेच्या निखळ लालसेने मयूर बनलेल्या भ्रष्ट राजकीय पक्षांना ताळ्यावर आणले गेले, तरी भारतीय लोकशाही कार्यक्षम होऊ शकते. लोकशाही ही कमीत कमी दुष्ट राज्यव्यवस्था आहे, की जीमध्ये जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त कल्याण होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. गेल्या शंभर वर्षांचा जगाचा इतिहास पाहिला तर कट्टर मार्क्स-वाद्यांना काय, पण स्वदेशी नाझींनादेखील हे पटू शकेल. फक्त यात गृहीत आहे, ती मध्यमवर्गीयांची आणि राजकीय पक्षांची लोकशाही मूल्यांशी बांधिलकी!

पुढे वाचा

पत्रसंवाद

जे. के. रोलिंग या ब्रिटिश लेखिकेने लिहिलेल्या हॅरी पॉटर नायक असणाऱ्या कादंबऱ्यांनी सध्या जगातील बालमनाचा पगडा घेतला आहे. लेखिकेला मिळालेले हे यश कौतुकास्पद आहे यात शंकाच नाही पण ज्या मुलाची मातृभाषा व संस्कार भारतीय आहेत त्यांनीही या पुस्तकासाठी रांगा लावाव्यात असे या पुस्तकात काय विशेष आहे या कुतूहलाने त्यातील एका भागाचे मराठी भाषांतर ‘हॅरी पॉटर आणि गुपितांचे दालन’ वाचून मोठी निराशा पदरी पडली. केवळ एवढेच नव्हे तर अशी पुस्तके आपल्या पाल्यांना वाचायला देण्यापूर्वी जागरूक पालकांनी ती स्वतः वाचून त्या वाचनाचा मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा असे वाटते.

पुढे वाचा

हॅरी पॉटर आणि बुद् प्रौढ लोक

हॅरी पॉटर बद्दलच्या पुस्तकांच्या ‘स्फोटक आणि जागतिक’ यशाचे रहस्य काय? ती मुलांना समाधान का देतात? आणि त्याहून अवघड प्रश्न म्हणजे इतकी प्रौढ माणसे ती का वाचतात? मला पहिल्या प्रश्नाचे उत्तर सुचते ते हे, की पोरकट मानसशास्त्रावर घट्ट पकड राखून ती पुस्तके मुलांच्या नजरेतून जगाकडे पाहतात. पण हे उत्तर दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देणे अधिकच कठीण करते—-एक बाब दुसरीला काट मारते.
आधी आपण सोपे उत्तर तपासू. फ्रॉईडने ‘फॅमिली रोमान्स’ चे वर्णन केले आहे—-आपल्या साध्या घर-कुटुंबाने समाधान न मिळणारे मूल एका उच्चकुलीन, जगाला वाचवणाऱ्या नायकाभोवती एक परीकथा बेतते.

पुढे वाचा

पीटर सिंगर यांच्या लेखाविषयी

‘सर्व प्राणी समान आहेत’ हा पीटर सिंगर यांचा दि. य. देशपांडे यांनी अनुवादित केलेला लेख वाचला. (आ.सु. जून 2003) आपणाला पटणाऱ्या विचारांचाच अनुवाद अनुवादक करीत असतो, असे मी गृहीत धरतो. लेख वाचून पहिला प्रश्न मनात उद्भवला तो म्हणजे, ‘मुळात मानवजात मानवाशी तरी माणुसकीने वागण्या- इतपत प्रगत झालेली आहे का?’ तसे असते तर संहारक शस्त्रास्त्रांची निर्मिती त्याने थांबवली असती. माणसाने माणसांना मारण्यासाठी जी युद्धे होतात तीही होणार नाहीत याची काळजी त्याने घेतली असती. धर्माच्या नावावर होणाऱ्या दंगलींनाही पायबंद घातलेला आढळला असता. परंतु हा युक्तिवाद बाजूला ठेवू या, कारण एखादा नैतिक विचार सबल कारणांसह दिलेला असेल तर ‘इतर जण अनैतिक वागतात म्हणून मीही अनैतिक वागेन किंवा त्याचे समर्थन करीन’ हे म्हणणे योग्य ठरणार नाही.

पुढे वाचा

‘मित्र’ च्या निमित्ताने

काही दिवसांपूर्वी ‘मित्र’ या सुयोग निर्मित नाटकाचा प्रयोग पाहण्याचा योग आला. नाटकाविषयी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेली परीक्षणे वाचली होती. तेव्हाच हे नाटक बघायचे असे ठरविले होते. आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे डॉ. लागूंची भूमिका! इतर नाटकांप्रमाणेच ह्याही नाटकात डॉक्टरांनी अभिनयाची जी उंची गाठली आहे ती अवाक् करणारी आहे. सतत आपण काहीतरी अद्भुत अनुभवीत आहोत ही भावना मनात येत होती. त्यांना साथ देणाऱ्या होत्या ज्येष्ठ रंगकर्मी ज्योती चांदेकर! दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षक डोळे भरून पाहत होते.

नाटकाचे सादरीकरणही वेगळ्या प्रकारे केले गेले. पार्श्वभूमी म्हणून कथा-नायकाला – दादासाहेब पुरोहितांना – अर्धांगवायूचा झटका, तसेच त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे जी जखम होते त्यावर उपचार करायला म्हणून दवाखान्यात ठेवलेले असते.

पुढे वाचा

कुपोषणाची तपासणी

पोषणाच्या बाबतीत गरोदर व अंगावर दूध पाजणाऱ्या स्त्रिया आणि शाळेत जाण्याच्या वयाच्या आतील मुले हे समाजातील सर्वांत हळवे गट आहेत. आदिवासी भागात या गटांच्या पोषण-पातळीची आणि अन्न-सुरक्षेची एक पाहणी केली गेली. गडचिरोली जिल्ह्यातील वनाच्छादित गावे (‘वन-गट’) आणि जंगल तोडून शेतीकडे वळलेली गावे (‘शेती गट’) यांचा हा तौलनिक अभ्यास होता.
पाहणीसाठीचे नमुने आकाराने लहान होते, कारण पाहणीच्या मर्यादित वेळात रानावनात फिरणाऱ्या आदिवासींना मोठ्या संख्येने एकत्र करता आले नाही. ही एका छोट्याशा काळात केलेली छेद-परीक्षा (Cross-Sectional Study) होती; दीर्घकाळ पाठपुरावा करणारी दीर्घ-परीक्षा (Longitudinal Study) नव्हती.

पुढे वाचा

स्वातंत्र्योत्तर भारतीय विज्ञानाचे यशापयश (भाग २)

विज्ञानाची सद्य:परिस्थिती:
विज्ञानविश्वातील परिस्थिती गेल्या पन्नास वर्षांत झपाट्याने बदलली. पूर्वीचे वैज्ञानिक बरेचदा स्वतःच साधनसामुग्री जमवून संशोधन करीत असत. संशोधनातला त्यांचा रस त्यांना तसे करण्यास उद्युक्त करी. सी. व्ही. रमण, भाभा (सुरवातीच्या काळात) हे याच पठडीतील संशोधक, गेल्या पन्नास वर्षांत संशोधन हे मोठ्या प्रमाणावर संस्थांच्या माध्यमांतून सुरू झाले. त्यामुळे संशोधनातील संघटन वाढले. काय करायचे, कधी करायचे व किती पैशांत करायचे हे आधी ठरवून मग संशोधन करायचे असे सुरू झाले. थोडक्यात म्हणजे विज्ञानाचे व्यवसायीकरण झाले. संघटित विज्ञानात ज्येष्ठता, कनिष्ठता, अग्रक्रमाविषयीची चढाओढ आणि आपल्या संशोधनास पैसा मिळविण्याची धडपड ओघानेच आली.

पुढे वाचा

‘इट कान्ट हॅपन हिअर’: सिन्क्लेअर ल्युइसकृत फासिस्ट हुकूमशाहीचा पंचनामा

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक स्तरावरची दिग्भ्रांत अवस्था, मध्यमवर्गीयांची अलिप्तता, कामगार-शेतकऱ्यांची दैना, श्रीमंत आणि गरीब ह्यांच्यात वाढत जाणारी दरी, युवकांमधली बेकारी, त्यातून येणारे नैराश्य, दिशाहीनता, दारिद्र्य आणि वैचारिक, बौद्धिक दिवाळखोरी माजून समाजात जेव्हा अराजकसदृश्य भयावह पोकळी निर्माण होते तेव्हा फासिस्ट हुकू मशहा निर्माण होण्याच्या साऱ्या शक्यता त्यात दडलेल्या असतात. ह्या साऱ्या अराजकातून समाजाला बाहेर काढण्याच्या, त्याचे हरवलेले गतवैभव परत मिळवून देण्याच्या मिषाने कुणी बझेलियस विंड्रिप नावाचा हुकूमशहा अमेरिकेत अवतरतो. देशकालपरत्वे (त्याचे नामाभिधान कधी हिटलर, मुसोलिनी, स्तालिन, तर कधी खोमेनी वगैरे बदलत जाते!) हुकुमशाही ही सर्वंकष दमनकारी यंत्रणा धर्म, वर्ण, वर्ग, रंग, जात असे निरनिराळे रूप धारण करून समाजाला नुसते वेठीसच धरत नाही तर साऱ्या समाज-जीवनालाच गिळंकृत करू बघते.

पुढे वाचा

ग्रामीण स्त्रीजीवनाचा आलेख

ग्रामीण भारतातील स्त्रियांसाठीची आरोग्यसेवा दुर्लक्षित आहे, आणि याचे परिणाम दारुण अनारोग्याच्या रूपात दिसतात, हे सर्वज्ञात आहे. मृणाल पांडे यांचे नवे पुस्तक, “स्टेपिंग आउट : लाइफ अँड सेक्शुअॅलिटी इन रूरल इंडिया’ (पेंग्विन, २००३), हे या स्थितीचा वृत्तपत्री आलेख मांडून थांबत नाही. त्यापुढे जाऊन स्त्रियांच्या आरोग्या-बाबत ग्रामीण क्षेत्रात निष्ठेने भरघोस काम करणाऱ्या अनेक बिगर-सरकारी स्वयंसेवी संस्थांकडे हे पुस्तक लक्ष वेधते.
यासाठी पांडेंनी गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू अशा विस्तृत क्षेत्रात हिंडून निरीक्षणे केली व मुलाखती घेतल्या. सेवा (SEWA), सर्च (SEARCH), अर्थ (ARTH), मासूम (MASUM), सिनि (CINI), रूवेस्क (RUWESC) अशा आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी (क्रा) संस्थांचे काम पांडेंनी तपासले.

पुढे वाचा