Author archives

भाषा, जात, वर्ग इत्यादी

[पालकनीती मासिकात आलेल्या किशोर दरक ह्यांच्या ‘शिक्षणाच्या माध्यमाचे राजकारण’ ह्या लेखावर दिवाकर मोहनी ह्यांनी दिलेला प्रतिसाद, त्यामध्ये भाषिकदृष्ट्या महत्त्वाचे अनके मुद्दे असल्यामुळे, ‘आसु’च्या वाचकांसाठी येथे पुनर्मुद्रित करीत आहोत. – संपा.]

श्री.दरक म्हणतात, “शालेय शिक्षणाची भाषा किंवा जगाची कोणतीही भाषा Neutral (तटस्थ) नसते, तर त्या भाषेला जात, लिंग, धर्म, वर्ग, भूगोल व इतिहास असतात.” माझ्या मते भाषेचे हे गुण तिच्या ठिकाणी अंगभूत (जन्मजात) नसतात, तर ते चिटकविलेले असतात. भाषा मुळात तटस्थच. पुढे त्यांनी इंग्रजीची तरफदारी केलेली आहे. आणि तिच्या वापरामुळे मुलांचे कल्याण होईल असे सुचविले आहे.

पुढे वाचा

स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, आणि मार्क्सवाद

मार्क्सवादाविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यापैकी एक म्हणजे मार्क्सवादात किंवा साम्यवादी राज्यकर्ता असलेल्या देशात व्यक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य नसते. मार्क्सवाद हा लोकशाहीविरोधी आहे; असे मत होण्याला अर्थात काही कारणे आहेत. काही मार्क्सवाद्यांच्या भूमिकाही त्याला कारणीभूत आहे. एका विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीत अप्रगत अशा भांडवली देशात म्हणजे रशियात क्रांती झाली. तिकडे झारशाही होती. भांडवली लोकशाही नव्हती. प्रगत भांडवली देशात पहिली क्रान्ती होईल असे मार्क्सने भाकित केले होते. परंतु क्रांती झाली ती लोकशाही नसलेल्या झारशाही रशियात. ग्रामशी या इटालिअन मार्क्सवाद्याने त्या क्रांतीला मार्क्सविरोधी क्रान्ती असे म्हटले आहे.

पुढे वाचा

भाकीत

पोर नागवे कभिन्न काळे
मस्त वावरे उघड्यावरती
बाप बैसला झुरके मारीत
चूल पेटवी मळकट आई
भिंतीमागे पॉश इमारती
कंपनी तेथे संगणकाची
थंड उबेधी लठ्ठ पगारी
कोडी सोडवत जगप्रश्नांची
कोण सोडवील कोडी इथली
उघड्यावरच्या संसाराची,
रस्त्यावरच्या अपघातांची,
मरू घातल्या वन रानांची?
पोर नागवे चालत चालत
जाईल का त्या इमारतीत
बसेल जर ते संगणकावर
कोडी सोडवील तेही झटपट
– अनिल अवचट (मस्त मस्त उतार मधून साभार)

पत्रसंवाद

प्रा. प्रवीण घोडेस्वार, नाशिक gpraven 18feb@gmail.com
बंजारा समाजातील ढावलो गीते हा सुनंदा पाटील यांचा लेख आजचा सुधारक च्या डिसेंबर २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे. मी गेल्या काही वर्षांपासून आजचा सुधारकचा नियमित वाचक आहे. माझं अत्यंत नम्र आणि प्रामाणिक मत आहे की, आजचा सुधारकमध्ये असं लेखन प्रसिद्ध झालेलं नाही. त्यामुळे अंकात हा लेख बघून थोडासा धक्का बसला. काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. या लेखाच्या गुणवत्तेबद्दल मत अथवा अभिप्राय व्यक्त करण्याचा माझ्यापाशी अभ्यास नि अधिकार नाही. पण गेल्या काही वर्षांचा वाचक म्हणून माझ्याकडे असलेल्या अनुभवाच्या आधारे हे मत मी मांडत आहे.

पुढे वाचा

टिप्पणीविना वृन्दावनच्या विधवांचा रंगोत्सव

मथुरेच्या जवळचे वृन्दावन म्हणजे विधवांचे क्षेत्र. हतभागिनी, फुटक्या कपाळाच्या मानल्या गेलेल्या ह्या विधवा येथे समाजापासून तोंड लपवून कृष्णाची पूजाअर्चा करीत कसेबसे आयुष्य कंठतात. ह्या वर्षी त्यांच्या बाबतीत एक आनंदाची गोष्ट घडली. त्या चक्क होळी खेळल्या. सण-उत्सवात त्यांना सहभागी होऊ न देणाऱ्या प्रथा-परंपरा धाब्यावर बसवून त्यांनी जल्लोष साजरा केला. त्या गाणी गायल्या, नाचल्या. एकमेकींच्या अंगावर त्यांनी गुलाल आणि फुले उधळली. कुटुंबसंस्थार्फत महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या बळी ठरलेल्या महिलांचे हे पवित्र क्षेत्र तसे दरवर्षीच धुळवडीचा सण साजरा करते, पण अगदी हळू आवाजात. आपापल्या आश्रमांच्या आतमध्येच कृष्णाच्या रासलीलेतील दृश्ये त्या साकार करतात.

पुढे वाचा

समर्पणबंधः एक सांस्कृतिक वैशिष्ट्य

मराठीवाङ्मयातील एक कुतूहलजनक सामाजिक विशेष म्हणजे ‘समर्पण सिंड्रो’. ‘सिंड्रो’ म्हणजे ‘पुनःपुन्हा घडून येणाऱ्या ठरावीक प्रकारच्या गोष्टींचा गट’. आपण याचे नामकरण ‘समर्पण-बंध’ असे करू या. समर्पण-बंध ज्या कथांध्ये फुलवलेला असतो त्या कथांध्ये समर्पणाच्या भावनेने भारावलेली एखादी व्यक्ती चित्रित केली जाते. उदाहरणांळे या सिंड्रोचे स्वरूप स्पष्ट होईल. त्याग, समर्पण या मूल्यांचे परम महत्त्व मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय संस्कृतीत फार पूर्वीपासून मानले गेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या मनोवृत्तीला विशेष बळ प्राप्त झाले. गांधीवाद, मार्क्सवाद या त्यावेळी प्रभावी असलेल्या विचारधारा समर्पण-सिंड्रोला पूरक होत्या. समर्पण-सिंड्रो सर्वांत ठळक बनला तो वि.स.खांडेकरांच्या

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (९)

संगणक आपला ताबा घेतील का?

आपला मेंदू म्हणजे एक अजब व विचित्र रसायन आहे. जगातील इतर कुठल्याही गुंतागुंतीच्या रचनेपेक्षा मेंदूची गुंतागुंत अनाकलनीय ठरत आहे. तरीसुद्धा आपण त्याला रक्त-मांस-चेतापेशी-मज्जारज्जू पासून तयार झालेले मशीन असेच म्हणू शकतो. म्हणजेच मेंदच्या कार्यप्रणालीप्रमाणे कार्य करू शकणारे मशीन आपणही बनवू शकतो असा अर्थ त्यातून ध्वनित होतो. या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोंची रचना – थोडक्यात एआय (Artificial Intelligence) – आघाडीवर आहे.
एआय आज ज्या पातळीवर आहे त्याच पातळीवर पुढील काळातही राहील याची खात्री नाही.

पुढे वाचा

दलित की बौद्ध – नावात काय आहे ?

मूळ लेखक: अनन्या वाजपेयी

फुले-आंबेडकर विचार ह्या विषयावरील सम्मेलनासाठी मी जानेवारीमध्ये नाशिक येथे गेले होते. महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यापीठांतून तेथे वक्ते आले होते. माझ्यासारखे काही बाहेरूनही आलेले होते. विद्याक्षेत्रातील विभूतींशिवाय, वाहरू सोनावणे आणि लक्ष्मण गायकवाड ह्यांसारखे साहित्यिक, उदित राज व राजा ढाले सारखे राजकारणीदेखील तेथे आले होते. सम्मेलनाचा केंद्रबिंदू साहित्य, आत्मचरित्र, चरित्रे, कादंबऱ्या, नाटके, काव्य, साहित्यिक समीक्षा असावा अशी अपेक्षा होती, पण मराठीत चाललेली ती चर्चा पुढे दलित जीवनाचे सर्वच पैलू, जसे राजकारण, इतिहास ह्यांकडे वळू लागली. बाहेर कॉलेजच्या प्रांगणात पुस्तकांचे प्रदर्शन लागले होते.

पुढे वाचा

यंदाचे जीवशास्त्रातील नोबेल पारितोषिक

इसवी सन दोनहजार बाराचे शरीरक्रियाशास्त्रीय वैद्यकशास्त्र या विषयातले नोबेल पारितोषिक ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ सर जॉन गर्डन आणि जपानी जीवशास्त्रज्ञ शिन्या यामानाका ह्या दोघांना प्रौढ पेशीपासून बहुशक्तिक पेशी बनवण्यासाठी देण्यात आले. ह्यातील प्रौढ पेशी आणि बहुशक्तिक पेशी म्हणजे काय आणि एका प्रकारच्या पेशीचे रूपांतर दुसरीत कशासाठी करायचे हे समजून घेण्यासाठी हा लेख.
आपल्या शरीरात साधारण चारशे प्रकारच्या पेशी असतात. प्रत्येक प्रकाराचे काम ठरलेले असते. उदाहरणार्थ लाल रक्तपेशी प्राणवायू वाहून नेतात तर शेत रक्तपेशी शरीराचे जन्तूंपासून रक्षण करतात. तसेच स्नायुपेशी, अस्थिपेशी, मज्जारज्जूधील पेशी या सर्वांचे काम आणि त्यांची रचना परस्परांहून अगदी भिन्न असते.

पुढे वाचा

भांडवलशाही आणि मार्क्सवाद

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस युरोपात भांडवलशाहीचा उदय झाला. तेव्हापासून तिच्याविरुद्ध निरनिराळे मतप्रवाह समाजात प्रचलित आहेत. युरोपातील भांडवलशाहीने सरंजामशाहीशी मोठा लढा दिला. औद्योगिक क्रांती होऊन नवीन उत्पादनपद्धती प्रचलित झाल्यानंतर अर्थव्यवस्थेच्या नाड्या भांडवलदारांच्या हातात आल्या व त्यांना राज्यसत्ता ताब्यात घेण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. तेव्हा त्यांनी केलेली पहिली गोष्ट म्हणजे गुलामांची मुक्तता. त्यांना गुलामांबद्दल प्रे होते म्हणून नव्हे, तर त्यांना कारखान्यात काम करायला स्वस्तात मजूर हवे होते म्हणून. दुसरी गोष्ट, त्यांनी राज्यसत्ता आणि चर्च यांची फारकत व्हावी आणि राज्यसत्ता निधर्मी राहावी अशी मागणी करून तिची अंलबजावणी केली.

पुढे वाचा