विषय «आरोग्य»

आयुर्वेदाच्या मर्यादा

होमिओपॅथीचे बिंग फोडल्याबद्दल लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकाचे आभार. परंतु अशीच काहीशी परिस्थिती आयुर्वेदाची आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगातील ८०% लोक रोगप्रतिबंधासाठी वैकल्पिक उपचारपद्धती वापरतात. त्यांपैकी आयुर्वेद एक महत्त्वाची उपचारशाखा असल्यामुळे या विषयाला विशेष महत्त्व आहे. सामाजिक आरोग्याच्या विषयावर प्रबोधन करणे हे डॉक्टरांचे कर्तव्यच असल्यामुळे हा लेखनप्रपंच केला आहे. आमच्या ज्ञानशाखेला ‘ॲलोपॅथी’ असे चुकीचे नाव पडले आहे. रोगाच्या परिणामांच्या विरुद्ध परिणाम घडविणारे उपचार (रोगाचे कारण न शोधता) करणे म्हणजे ॲलोपॅथी होय. वैज्ञानिक वैद्यक ॲलोपॅथीपेक्षा भिन्न आहे. वैज्ञानिक वैद्यकाचा एक भाग ‘लक्षणांवर आधारित उपचार’ (सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट) आहे.

पुढे वाचा

आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन

आयुर्वेदाच्या ऱ्हासाची कारणे बरीच असली तरी मोगल आणि इंग्रजांचे आक्रमण हा यातील एक मोठा घटक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मोगल आक्रमणापासून आयुर्वेदाचा राजाश्रय खंडित झाला तो आजतागायत पुन्हा आयुर्वेदाला पूर्णपणे प्राप्त झालेला नाही. स्वातंत्र्योत्तर काळामध्येदेखील आयुर्वेदाला मिळणारा वाटा हा एकंदर स्वास्थ्यावर खर्च होणाऱ्या रकमेच्या दोन ते तीन टक्केच होता. परंतु आयुर्वेदाचे खरे नुकसान झाले ते इंग्रजांच्या काळात. त्यांनी आपल्याबरोबर आपले वैद्यकशास्त्र आणले, जे आज ‘आधुनिक वैद्यक’ म्हणून ओळखले जाते. याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु याचबरोबर त्यांनी एक समज प्रचलित केला की पाश्चात्त्य विचारपद्धतीच एकमेव शास्त्रीय विचारपद्धती आहे.

पुढे वाचा

निसर्ग, मानव आणि आनुवंशिक अभियांत्रिकी

मानव हा जीवसृष्टीतील सर्वात बुद्धिमान जीव आहे त्यामुळे मानवाने अनुभवांचे, विचारांचे आणि ज्ञानाचे प्रचंड संचय निर्माण केले आहेत. १८ ते २० लक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीमध्ये व इंडोनेशिया आणि चीनमध्ये सरळ ताठ चालू लागल्यापासून माणूस सतत चालतोच आहे, शिकतोच आहे आणि बुद्धीला सुचेल ते करून पाहून पुढेच चालला आहे. वैयक्तिक आणि गटाधीन विचारमंथन सतत चालूच असून नवनवीन कल्पना, विचार व ज्ञान वृद्धिंगत होतच राहणार. यामध्ये संचारमाध्यमांचा मोठाच वाटा आहे. गलबते, रेल्वे, विमाने, पोस्ट व तार यामुळे भारतीयांना जगाचे दरवाजे उघडून दिले.

पुढे वाचा

विवाहयोग्य वय- वास्तव व प्रचार

मुलींच्या विवाहाचे योग्य वय १८ च्या वर व मुलांचे २१ च्या वर असा दूरदर्शनवर अनेक वर्षांपासून प्रचार करण्यात येत आहे. या वयांच्या आधी विवाह करणे हा कायद्याप्रमाणे गुन्हादेखील आहे. १८ वर्षांच्या खाली मूल झाल्याने स्त्रीच्या व अपत्यांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो हा या कायद्याच्या समर्थनासाठी मुख्य मुद्दा मांडण्यात येतो.

दोन तोटकी विधाने
आश्चर्याची गोष्ट अशी की वरील ठाम विधाने कशाच्या आधारावर केली आहेत हे कधीच सांगण्यात येत नाही. दूरदर्शनाकडे याबद्दल चौकशी करणारे एक पत्र पाठविले पण त्याचे उत्तर मिळाले नाही. तेव्हा मी स्वतःच या विषयीचे वाङ्मय धुंडाळले.

पुढे वाचा