कृत्रिमप्रज्ञा या विषयावर काही तज्ज्ञ विचारवंतांनी धोक्याची सूचना दिली आहे. जसजशी कृत्रिमप्रज्ञा प्रगत होत जाईल तसतशी मानवी मेंदूची अधोगती होईल. प्रज्ञा या मूळ विषयाचा गाभा माहिती नसलेली पिढी केवळ संगणकाच्या सहाय्याने कामे करू लागतील. संपूर्ण समाज कृत्रिमप्रज्ञेच्या ताब्यात जाईल. कोरोनाच्या धोक्यापेक्षा किंवा अणूयुद्धाच्या धोक्यापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होईल. मेंदूचा ताबा कृत्रिमप्रज्ञेच्या ताब्यात जाईल. OpenAI ही कृत्रिमप्रज्ञेवर संशोधन करणारी संस्था आहे. ChatGPT आणि DALLE/2 अश्या कंपन्यांसोबत आता मायक्रोसॉफ्ट कंपनी जोडली गेली आहे. रोबोटिक्स प्रणालीने तंत्रज्ञान जेवढे विकसित केले त्यामुळे अमर्याद बेकारांचे लोंढे तयार झाले ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
विषय «आरोग्य»
आरोग्यासाठी कृत्रिमप्रज्ञा
डोळे, कान, नाक, जीभ, आणि त्वचा या मुख्य ज्ञानेंद्रियांमधून आपण आजूबाजूच्या जगाची माहिती घेतो, मेंदूमध्ये त्या माहितीचा अर्थ लावतो, आणि आपल्या दृष्टीने योग्य तो प्रतिसाद देतो. योग्य प्रतिसाद काय हे आपण स्वतः, आपले कुटुंबीय, आणि समाजाच्या सामुदायिक अनुभवांमधून शिकतो. विषयामधील गुंतागुंत जसजशी वाढत जाते, तसे ते शिकण्यासाठी लागणारा वेळ वाढत जातो. लहानपणी अक्षरे शिकून आपले नाव लिहिणे काही आठवड्यांत शिकता येते, तर वाक्ये लिहिण्यासाठी काही महिने जावे लागतात. सुसंगत वाक्ये असलेली गोष्ट वाचण्यासाठी आणि सुसंगत वाक्ये स्वतः लिहिण्यासाठी काही वर्षे शिक्षण घ्यावे लागते.
महाग पडलेली मोदीवर्षे
- नोव्हें २०१६ च्या डिमॉनेटायझशन नंतर काळा पैसा, खोट्या नोटा आणि दहशतवाद कमी झाला का?
- मेक-इन-इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, आणि इतर योजनांनी रोजगारनिर्मितीला आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळाली का?
- स्वच्छ भारत योजनेपरिणामी उघड्यावर शौच करणे बंद होऊन भारतीयांचे स्वास्थ्य सुधारले का?
- मोदीकाळात भ्रष्टाचाराला रोख लागून शासनव्यवस्था अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम झाली का?
- जगभरच्या नेत्यांना मिठ्या मारणारे आणि स्वतःचे मित्र म्हणवणारे मोदी भारताचे जगातील स्थान उंचावण्यात यशस्वी झाले आहेत का?
- निवडणुकांमध्ये दोनदा संपूर्ण बहुमताने निवडून आलेले मोदीसरकार लोकशाही पाळत आहे का?
स्टॉक मार्केट उच्चांक पाहून “सब चंगा सी” म्हणणाऱ्या उच्च मध्यमवर्गासाठी, हिंदी-इंग्लिश-मराठी टीव्ही चॅनेल्सवरच्या झुंजींना बातम्या असे समजणाऱ्या, किंवा सोशल मीडियावरून माहिती मिळवणाऱ्या सर्वांसाठी वरील बहुतांश प्रश्नांचे उत्तर “होय, नक्कीच” असे आहे.
आयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती?
सध्या वेगवेगळ्या पॅथीचे लोक एकमेकांच्या उरावर बसत आहेत. पण वास्तव लक्षात घेता या सगळ्या उपचारपद्धतींत ॲलोपॅथी ही कालसुसंगत आहे असेच म्हणावे लागते. म्हणूनच अनेक विद्यार्थी ॲलोपॅथीला प्रवेश घेण्यास प्राधान्य देतात. ज्यांना ॲलोपॅथीला प्रवेश न मिळाल्यामुळे नाईलाजाने आयुर्वेदिक डॉक्टर व्हावे लागते अशा लोकांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झालेला असतो. त्यावर मात करण्यासाठी ते मग आयुर्वेद हे ॲलोपॅथीपेक्षा उच्च दर्जाचे असून आपल्या प्राचीन भारताची देण आहे, अश्या बढाया मारू लागतात. पण खरी ‘अंदर की बात’ अशी असते की, ॲलोपॅथीला प्रवेश न मिळाल्यामुळे त्याचा पोटशूळ म्हणून ते ॲलोपॅथीवर खार खात असतात. मग आपले अस्तित्व टिकवण्यासाठी लोकांच्या धार्मिक अस्मितेला साद घालत परंपरांचा बडेजाव मिरवणे त्यांना भाग पडते.
रामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते?
नुकताच १ जुलैला डॉक्टर्स डे होऊन गेला. महिन्याभरापूर्वी रामदेवबाबाने ॲलोपॅथी आणि डॉक्टर या दोहोंबद्दलही अनुद्गार काढून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडवून दिला होता. नंतर जूनच्या मध्यावधीत “डॉक्टर तो भगवान के रूप होते हैं” असे म्हणत सारवासारव केली आणि आपणही लस घेणार असल्याचे सूतोवाच केले.
असो. मुद्दा तो नाही.
या चर्चांतून काही प्रश्न उपस्थित झाले. पहिला म्हणजे, पॅथी-पॅथींमधली (उपचारपद्धतींमधली) भांडणे ही आपल्या वृथा अभिमानाची आणि अज्ञानाची द्योतक आहेत हे शहाण्यासुरत्या लोकांना तरी का समजू नये? दुसरे म्हणजे, एखाद्या गोष्टीमागचे विज्ञान अजून आपल्याला पूर्ण समजले नसेल, किंवा अजून त्याचा शोध लागला नसेल तर विज्ञानालाच मोडीत काढणे योग्य आहे का?
असं केलं तर..
करोनाच्या लाटांवर लाटा फुटत आहेत. या साथीने आपल्या आरोग्यव्यवस्थेतल्या अनेक त्रुटी उघड्या पाडल्या आहेत. यातील काही आपल्याला आधीच माहीत होत्या. लोकसंख्येच्या मानाने डॉक्टरांची कमतरता ही त्यातली एक.
पण ज्या साथीमुळे ही कमतरता ठसठशीत झाली, त्याच साथीदरम्यान, साथीसारख्याच पसरलेल्या तंत्रज्ञानाने, यावर मात करणे शक्य आहे. इंटरनेट आणि आभासी उपस्थितीतील शिक्षण आता अचानक पुढ्यात आले आहे. ह्याचे तोटे आहेत तसे फायदेही आहेत.
आपल्याकडे फॅमिली डॉक्टरांची कमतरता आहे यामागील कारण अर्थातच आर्थिक आहे. एक एमबीबीएस डॉक्टर निर्माण करण्यासाठी प्रचंड पायाभूत सुविधा आणि भरपूर संसाधने लागतात. याला अवाच्यासवा खर्च येतो. तो सरकारला परवडत नाही. यावर
कोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम
चीनच्या वूहान शहरातून २०१८मध्ये सुरुवात झालेल्या कोविदची लाट जगभरात पसरली. जगभरात १५ जून २०२१ पर्यंत १७.७ कोटी लोक बाधित झाले व ३८.४ लाख लोक मरण पावले. कोविदचा सामना करण्यासाठी बहुतेक देशातील आरोग्ययंत्रणांवर प्रचंड ताण आला. हा विषाणू नवीन असल्याने व तो मानवी शरीरावर कसा परिणाम करतो, याविषयी माहितीचा अभाव होता. कोणती औषधे यावर प्रभावी ठरतील याविषयी माहिती नव्हती. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सामाजिक अंतर, साबण व सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण असे उपाय सुचविण्यात आले. या नियमांचे पालन लोकांनी न केल्यामुळे रुग्णसंख्या वाढू लागल्यावर टाळेबंदीचा उपाय करण्यात आला.
जागतिक साथींचा इतिहास – कॉलरा
कॅरेबीअन समुद्रातील एक लहानसा गरीब देश म्हणजे हैती. या देशात डिसेंबर २०१०मध्ये अचानक जीवघेण्या अतिसाराची साथ पसरली. काही दिवसांतच हजारो लोक आजारी, तर शेकडो लोक मृत्युमुखी पडले. ती साथ कॉलऱ्याची होती. त्यापूर्वीच्या १०० वर्षांत हैतीमध्ये कॉलऱ्याचा एकही रुग्ण आढळला नव्हता, त्यामुळे तिथले नागरिक या आजाराबद्दल अनभिज्ञच होते.
जानेवारी २०१०मधील विनाशकारी भूकंपानंतर जगभरातून हैतीला मदतीचा ओघ सुरू झाला. त्यापैकी एक म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेची नेपाळी स्वयंसेवकांची तुकडी. त्यांच्या कॅम्पमधून जमा होणारा मैला जवळच्याच आर्टीबोनाइट नदीत सोडला जाई. नेपाळमध्ये कॉलरा एंडेमिक म्हणजेच त्या भागात वर्षानुवर्षे टिकून राहिलेला आजार आहे.
दूध आणि वातावरणबदल
वातावरणबदलामुळे मानवी अस्तित्व धोक्यात येणार आहे याची आता सर्वांना कल्पना आली आहे. त्यामुळे हवेतील कार्बन-डायऑक्साइड आणि मिथेन कमी करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सरकारने यासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत हे खरे आहे. पण व्यक्तिशः आपणही त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण काय केले असता वातावरणातील ग्लोबल वॉर्मिंग गॅसेसचे प्रमाण व उत्सर्जन कमी होईल याचा विचार करू.
गाई व म्हशी हे रवंथ करणारे प्राणी आहेत. त्यांना चार जठरे असतात. त्यांपैकी दोन जठरांमध्ये त्यांनी खाल्लेल्या गवताचे व इतर पालापाचोळ्याचे जंतूंच्या साह्याने पचन केले जाते.
पर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३
भाग ३ : इकॉलॉजी, विषाणू आणि आरोग्य
करोना विषाणूची उत्पत्ती आणि रोगाचा प्रसार बघता पर्यावरणाचे आणि जैवविविधता संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित होते. कसे ते समजून घेऊ. करोनासारखे विषाणू प्राण्यांकडून माणसाकडे संक्रमित (Zoonotic) होतात. जगातील ६०% साथीचे रोग हे प्राण्यांकडून येतात. यातले ७२% जंगली प्राण्यांकडून येतात. हे प्रमाण गेल्या शतकात बरेच वाढलेले दिसते. सार्स, मर्स, इबोला, निपा, झिका, एच.आय.व्ही. ही सगळी अशीच पिल्लावळ. साहजिक प्रश्न येतो की हे सगळे जीव माणसाच्या आरोग्यासाठी कधी, कुठे, केव्हा, कसे आणि का घातक ठरत आहेत?