विषय «कृषी-उद्योग»

शेतकऱ्यांच्या आत्महत्या : ग्रामीण दुरवस्थेचे दार्शनिक रूप

शेवटी शेतकरी कशासाठी शेती करतात? काय मिळवायचे असते त्यांना? त्यांची सर्व शक्ती उत्पादनापेक्षा अनिश्चिततेच्या दडपणाखालीच खर्च होते. बऱ्याचवेळा त्याला माहीत असते की पेरण्या करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. पण तो तरी दुसरे काय करू शकतो? संपूर्ण दिवाळखोरीत जाइस्तोवर शेतकरी पेरीतच राहणार.

आजची अर्थव्यवस्था अगदी भिन्न-भिन्न नैसर्गिक परिस्थितीत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांत जीवघेणी चढाओढ लावते. आणि खरोखरच शेतकरी घायाळ होतात, मरतातही.

श्रीमंत आणि गरीब यांना आहार-उष्मांक (food calories) सारखेच लागतात. अन्नधान्याच्या पुरवठ्यात म्हणून फारशी लवचीकता असत नाही. शेतकऱ्यांना सातत्याने उत्पादन वाढवायला म्हणून वावच नसतो, लिोकसंख्यावाढ सोडू५ पीक खलास होणे आणि अमाप येणे त्याच्यासाठी आपत्तीच ठरतात.

पुढे वाचा

शेती, अन्नसाखळी आणि ऊर्जा

मी ज्यावेळी एकटा बसून असतो त्यावेळी सतत माझ्या डोक्यात एकच विचार घोळत असतो : माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे ऊर्जेवरचे परावलंबित्व कमी कसे करता येईल ? खास करून खनिज तेलावरचे (Fossil Fuel). सायकल वापरता येईल, खाजगी गाडी न वापरता सार्वजनिक वाहतुकीचा आश्रय घेता येईल, Compact Fluorescent Bulbs वापरता येतील, विजेवर चालणारी उपकरणे कमी करता येतील, सूर्यचूल, सूर्यबंब वापरता येईल. . . . . पण एक माहिती मिळाली आणि माझे धाबेच दणाणले एक अन्न उष्मांक (food calorie) मिळविण्यासाठी अमेरिका १० खनिज उष्मांक वापरते !

पुढे वाचा

अनुभव

माझ्यासारखा सामान्य माणूस काय नवीन अनुभव सांगू शकणार? तरीपण काही लोकांना ज्यांना अजिबातच या विषयीची माहिती अथवा ीीश नाही, त्यांना त्यात ळपींशीशीीं वाटण्याची शक्यता आहे असे वाटून आज काहीतरी लिहावे असे मी ठरवले आहे.

माझे शिक्षण अभियांत्रिकीमधले. मी पास झाल्यावर २-३ वर्षांनी बार्शीला आलो आणि वाटले की आपला पिढीजात व्यवसाय कोणता, तर शेतीचा! मग आपल्याकडे एवढी शेती असताना आपण ती का करू नये? काही लोकांना ती जमते तर आपल्याला का जमू नये? म्हणून मी शेतीमध्ये भाग घ्यायचा असे ठरविले. सुरुवातीला माझ्या वडिलांनी आम्हाला २० गुंठे जमीन आणि त्याला पुरेल एवढे एका विहिरीचे पाणी, मोटार वगैरे गोष्टी वापरायची परवानगी दिली.

पुढे वाचा

रानवस्ती

मी अनिल दामले. पांढरपेशा शहरी. जन्म मुंबईतला. पुण्यात वाढलो. शिकलो. पुण्यातील सुप्रसिद्ध प्रभात फिल्म कंपनीच्या दामल्यांचा मी नातू. सिने सृष्टीच्या आणि शहराच्या झगमगाटांत वावरलो. त्याचबरोबर रानोमाळ हिंडायचो. दऱ्याखोऱ्या, गड, किल्ले, वने पाहिली. शेतीवाडीवर राहिलो. झाडझाडोरा, नदी, तळी, ऊन, वारा, पावसाचे शिंतोडे, पक्ष्यांचे बोल. ह्या सगळ्या निसर्गरूपांवर भाळलो. निसर्गसान्निध्यात राहावे, मनसोक्त, मनमुराद आयुष्य जगावे. शहरी चाकोरी रुळलेली वाट सोडून काहीतरी नवलाईचा मार्ग पत्करावा असे वाटत होते. घरच्यांचे पाठबळ होते. शेती करायची ऊर्मी होती, ध्यास होता. १९७६ साली खामगाव तलावाकाठी एक पडीक रान शेलारवाडीच्या ‘हडवळ्यांत’ विकत घेतले.

पुढे वाचा