विषय «चित्रपट परीक्षण»

लिओनार्डो डा व्हिन्ची

सध्या लिओनार्डो डा विंची ह्याचे नाव, डॅन ब्राऊन या अमेरिकन लेखकाने लिहिलेल्या, “डा व्हिन्ची कोड’ या कादंबरीवर निर्मित त्याच नावाच्या चित्रपटातील वादग्रस्त विषयामुळे, बरेच चर्चेत आलेले आहे. लिओनार्डो या इटालियन चित्रकाराची, येशूख्रिस्ताच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारित “दि लास्ट सपर’ आणि ‘मोना लिसा’ ही चित्रे इतर चित्रांबरोबर जगभर अतिशय गाजली. परंतु तो जगद्विख्यात चित्रकार होता तसा एक थोर शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ होता हे किती जणांना माहीत असेल?
सर्वांत प्रसिद्ध असतील तर त्याची शास्त्रीय संशोधने! त्याच्या चित्रांच्या पसाऱ्यात, अनेक यंत्रांच्या, काही नुसत्या यंत्राच्या प्रयोगात्मक कल्पना तर काही पूर्णपणे विकसित केलेल्या यंत्रांचे आराखडे आणि नोंदी सापडतात.

पुढे वाचा

‘नॉट ओन्ली मिसेस् राऊत’च्या निमित्ताने.

‘नॉट ओन्ली मिसेस् राऊत’ हा इंग्रजी शीर्षक असलेला मराठी चित्रपट. दिग्दर्शिका अदिती देशपांडे. नुकताच हा चित्रपट पाहिला आणि त्याच्या झालेल्या प्रभावातून पुरतेपणी भानावरही आले नव्हते, तर एक प्रतिक्रिया कानावर आली, ‘चावून चावून चोथा झालेला विषय आहे’ प्रतिक्रिया व्यक्त करणारा अर्थात पुरुष! ज्याला मिसेस् राऊतच्या वेदनांशी आपली नाळ जोडता येईल, तो कोणीही अशी प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. मिसेस् राऊत ज्या परिस्थितीतून गेली आहे तिथे तुम्ही स्वतःला ठेवा अन् मग आपण काय केले असते, ह्याचा विचार करा. मेंदूला झिणझिण्या येतील. “एखादी स्त्री जी कोणाचीच नसते ती सर्वांचीच असते का?’

पुढे वाचा

‘उंबरठा’ने मनात निर्माण केलेले प्रश्न

काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवर ‘उंबरठा’ हा सिनेमा पुन्हा पाहिला. २०/२५ वर्षांपूर्वी तो जेव्हा प्रथम प्रदर्शित झाला तेव्हाही पाहिला होता आणि त्यावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चर्चेचा कार्यक्रमही आयोजित केला होता. आजही तो चित्रपट माझ्या मनात तीच अस्वस्थता, तेवढ्याच तीव्रतेने निर्माण करून गेला. या अस्वस्थतेत वाचकांनाही सहभागी करून घ्यावे असे वाटले म्हणून ही प्रश्नावली.

१. महाजन कुटुंबाच्या घरातील एकंदर वातावरणात समाजकार्य करणाऱ्या सासूची एकाधिकारशाही दिसते. ती मोठी सून स्वीकारते परंतु धाकट्या सुनेला – सुलभाला, जिला स्वकर्तृत्त्वाचे भान आहे, स्वीकारणे जड जाते. त्यात तिचे काय चुकले?

पुढे वाचा

‘मित्र’ च्या निमित्ताने

काही दिवसांपूर्वी ‘मित्र’ या सुयोग निर्मित नाटकाचा प्रयोग पाहण्याचा योग आला. नाटकाविषयी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेली परीक्षणे वाचली होती. तेव्हाच हे नाटक बघायचे असे ठरविले होते. आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे डॉ. लागूंची भूमिका! इतर नाटकांप्रमाणेच ह्याही नाटकात डॉक्टरांनी अभिनयाची जी उंची गाठली आहे ती अवाक् करणारी आहे. सतत आपण काहीतरी अद्भुत अनुभवीत आहोत ही भावना मनात येत होती. त्यांना साथ देणाऱ्या होत्या ज्येष्ठ रंगकर्मी ज्योती चांदेकर! दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षक डोळे भरून पाहत होते.

नाटकाचे सादरीकरणही वेगळ्या प्रकारे केले गेले. पार्श्वभूमी म्हणून कथा-नायकाला – दादासाहेब पुरोहितांना – अर्धांगवायूचा झटका, तसेच त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे जी जखम होते त्यावर उपचार करायला म्हणून दवाखान्यात ठेवलेले असते.

पुढे वाचा

‘देहभान’: एका आदिम सत्याचा पुनरुच्चार

अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहनी दिग्दर्शित देहभान नाटक पाहिले. नीना कुलकर्णी आणि डॉ. गिरीश ओक यांच्यासारख्या ज्येष्ठ रंगकमींनी त्यात भूमिका केलेल्या आहेत. इतर सहकलाकारांनी त्यांना दिलेली साथही उल्लेखनीय आहे. नाटक दोन पातळ्यांवर घडतंय. एका महाविद्यालयाच्या शतकपूर्तीनिमित्त होणाऱ्या स्नेह-संमेलनात उत्कृष्ट नाटक सादर केले जावे ह्या हेतूने ‘देहभान’ या कादंबरीवर आधारित नाटक सादर करण्याचा धाडसी निर्णय दिग्दर्शिका प्राचार्यांच्या संमतीने घेते. नाटकातच नाटक घडतं आहे. बहुतेक प्रमुख पात्रे दुहेरी भूमिका करताहेत. प्राचार्या दमयंती आणि विकास केंद्रातील मावशी ह्या भूमिका नीना कुळकर्णी ह्यांनी समर्थ अभिनयाने साकार केल्या आहेत.

पुढे वाचा

‘हरीभरी’च्या निमित्ताने

माझ्या मित्रमैत्रिणींनी शिफारस केली म्हणून ‘हरीभरी’ पाहायला गेले. शाम बेनेगल दिग्दर्शक, शबाना आझमी, रजित कपूर, नंदिता दास आदी कसलेले कलाकार वाचल्यावर ‘हरीभरी’ नक्कीच आपल्याला आवडेल असा असणार असे वाटले. शाम बेनेगल कोणती तरी सामाजिक समस्या घेऊन येणार व त्याला आशादायी असे उत्तर सुचविणार ह्याची अपेक्षा होती. (‘अंकुर’मधील लहान मुलाने काचेवर दगड फेकून व्यवस्थेला आपला नोंदवलेला निषेध आठवा.) अन् झालेही तसेच!

प्रश्न जरी केवळ मुस्लिम स्त्रियांपुरताच मर्यादित ठेवला असला तरी ‘शितावरून भाताची परीक्षा’ या न्यायाने त्या समस्येचे सामान्यीकरण करायला हरकत नाही, तेही तेवढेच सत्य ठरेल.

पुढे वाचा

‘बैंडिट क्वीन’च्या निमित्ताने

काही दिवसांपूर्वी माझ्या एका विद्यार्थी मित्राचे पत्र आले. त्यात त्याने लिहिलेल्या ‘बैंडिट क्वीन’वरील प्रसिद्ध झालेल्या लेखाचे कात्रण होते. तो लेख वाचला, मनापासून आवडला, तसे त्याला कळविले अन् सिनेमा पाहण्याचे ठरविले. तोवर सिनेमा पाहावा हे तीव्रतेने जाणवले नव्हते. कुटुंबीय आणि इष्ट मित्रांसह सिनेमा पाहून आलो. परवा घातलेली बंदी वाचून आपण सिनेमा पाहण्याची संधी हुकवली नाही ह्याचे समाधान वाटले. नाहीतर एक अतिशय भेदक वास्तव कलाकृती पाहायचे राहूनच गेले असते.

‘बैंडिट क्वीन’ ही फूलनदेवीची जीवन कहाणी! लहान, अल्लड, निरागस फूलनचा डाकूची राणी बनण्यापर्यंतचा तिच्या आयुष्याचा प्रवास त्यात दाखवलेला.

पुढे वाचा