मूळ लेखिका – मेधा देशमुख भास्करन
भाषांतर – फिटे अंधाराचे जाळे – सुनंदा सदाशिव अमरापूरकर
वेश्यांबद्दल सामान्य माणसाच्या भावना संमिश्र असतात. कुतूहल, घृणा आणि करुणा असे एक रसायन त्याच्या मनात असते. घरांमध्ये वेश्यांचा विषय काढला जात नाही. बायका वेश्यांबद्दल बोलणे टाळतात, पुरुष बोलले तर त्यांचा उल्लेख “रांडा” असे तुच्छतादर्शक करतात. पण एखादा माणूस कुतूहल आणि घृणेच्या पार पलीकडे जातो आणि अथांग करुणेने वेश्यांच्या प्रश्नाला भिडतो. त्याच्या जिद्दीने, परिश्रमाने आणि धैर्याने अनेकजण त्याच्या कार्यात सहभागी होतात आणि तो संस्था उभारून आपल्या कार्याला स्थायी रूप आणतो.
