मानवाची शहरनिर्मितीची प्रक्रिया किमान आठ ते दहा हजार वर्षांपूर्वी सुरू झाली होती. गेल्या दीड-दोनशे वर्षांपासून ह्या प्रक्रियेच्या उगमाचा, विस्ताराचा शोध घेण्याची सुरुवात झाली. आज जगभरात प्राचीन-ऐतिहासिक शहरांचे अवशेष नवनवीन ठिकाणी सापडत आहेत. ही प्रक्रिया कशी, कुठे, केव्हा-केव्हा सुरू झाली, त्यामागच्या मानवी प्रेरणा काय होत्या, ह्याचा शोध अजूनही चालू आहे. शहरांनी त्यांच्या प्रदेशातील संस्कृतींमध्ये काय योगदान दिले? मानवी उत्क्रांतीमध्ये त्यांचे महत्त्व काय? शहरे भरभराटीला येऊन नष्ट का झाली? आधी शहरे निर्माण झाली आणि नंतर खेडी की आधी खेडी, आणि मग शहरे असा क्रम होता?
Category «निसर्ग»
नद्या जोडताना..
एखादा देश आपल्या नद्यांशी कसा वागतो, विशेषतः अश्या देशात जिथे नद्यांना माता म्हणून पूजले जाते, ह्यावरून त्या देशाच्या धोरणकर्त्यांचे पर्यावरणीय भान किती खोल आहे, हे लक्षात येते. आपल्या धोरणकर्त्यांना मोहवणारी एक कल्पना म्हणजे ‘नदी जोड प्रकल्प’, ऐकायला फार सोपी आणि शहाणपणाची वाटते. जिथे पाणी जास्त आहे त्या नदीखोऱ्यातून कृत्रिम कालव्यांनी ते जिथे कमी आहे तिथे वळवा; पुराने हैराण करणारे पाणी दुष्काळग्रस्त भागात न्या; निसर्गाने केलेली ‘चूक’ मानवी अभियांत्रिकीच्या वापराने सुधारा, असे दिवास्वप्न ही कल्पना दाखवते आणि आपण सहज ह्या सापळ्यात फसतो.
मानव-वन्यजीव संघर्षातून सहवासाकडे!
ग्रामस्वराज्याविषयी बोलताना वनहक्क, वनउत्पादने, गौण खनिजे ह्यांच्याविषयी जितके बोलले जाते, तितके आदिवासी-वन्यजीव ह्यांमधील परस्परसंबंधांविषयी बोलले जात नाही. परंतु वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी बनलेले/असलेले कायदे आणि त्यांची योग्यायोग्यता हाही एक चर्चेचा विषय आहेच. वन्यप्राण्यांशी असलेल्या आदिवासींच्या संबंधांकडे कायदा कसे बघतो ते समजून घेण्यासाठी लेखकद्वयाने केलेले प्रयास त्यांच्याच शब्दांत…
उपोद्घात
आजघडीला स्थानिक ते देशपातळीवर मानव व वन्यजीव संघर्षाने उग्र रूप धारण केले आहे. कधीकाळी आपल्याकडे मानव व वन्यजीव ह्यांचे सहचर्य होते. सजीव सृष्टीतील सर्व प्राणिमात्र व मानव ह्यांचे अद्वैत सांगणारी भारतीय परंपरा व तिला जोडलेले तत्त्वज्ञान आजही तेच सांगते.
नाते कुंपणावरचे
ॲलन ट्यूरिंग संगणन आणि कृत्रिम बुद्धिमतेचा जनक मानला जातो. दुसरे महायुद्ध जिंकण्यात त्याचा मोठा वाटा मानला जातो. १९५२ साली, त्याच्या घरी चोरी झाली. रिवाजाप्रमाणे पोलीस आले. तपासादरम्यान ॲलन ट्यूरिंगचे त्याच्या मित्राशी शारीरिक संबंध असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याला अटक झाली आणि त्याच्यावर खटला भरला. ट्यूरिंग दोषी मानला गेला आणि त्याला शिक्षेचे दोन पर्याय देण्यात आले – दोन वर्षे कारावास किंवा रासायनिक पद्धतीने कॅस्ट्रेशन. ॲलनने दुसरा पर्याय निवडला. पण त्यानंतरही पोलिसांचा ससेमिरा त्याला चुकवता आला नाही. जागतिक किर्तीचा वैज्ञानिक असलेला ॲलन ट्यूरिंग ही अवहेलना आणि मानहानी सहन करू शकला नाही आणि सायनाईड ठेवलेले सफरचंद खाऊन त्याने आत्महत्या केली.
पृथ्वीच्या हवामानबदलाचे उग्र स्वरूप
गेल्या दहा वर्षांत उष्णतेची लाट, जंगलातील वणवा, महापूर, ढगफुटी इत्यादींबद्दलच्या बातम्या ऐकायला/वाचायला मिळाल्या नसतील, त्यापेक्षा जास्त प्रमाणात मागच्या वर्षी त्याबद्दल ऐकायला/वाचायला मिळाल्या आहेत. जुलै २०२३ मध्ये उष्माघाताने अनेक लोक मेले. जुलै-ऑगस्टमध्ये उत्तरभारतात व ऑक्टोबरमध्ये सिक्किम राज्यात महापूर आल्यामुळे व भूस्खलनामुळे शेकडोंनी जीवितहानी झाली, हजारो बेघर झाले. पिकांचे नुकसान झाले व रस्ते, पुलांसारख्या मूलभूत सुविधांची पडझड झाली. दिल्लीच्या काही भागात गंगा व यमुना दुथडी भरून वाहू लागल्या. गेल्या ४५ वर्षांत पोचली नाही त्यापेक्षा जास्त उंची पाण्याच्या पातळीने गाठली व मोठ्या प्रमाणात महापूर आला.
वन्यजीव आणि शेतीप्रश्न
आपल्या महाराष्ट्र राज्यात मागच्या पाच-सात वर्षांमध्ये वन्यजीव आणि शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये होणाऱ्या नुकसानाचा संघर्ष तीव्र झालेला पाहायला मिळतो आहे. गावकट्ट्यावर रोजच “आज अमुक एका शेतकऱ्याचे नुकसान झाले” असे शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळते. वन्यजीवामुळे झालेल्या नुकसानाच्या मन हेलावून टाकणाऱ्या कहाण्या गावामधील प्रत्येकच शेतकऱ्याच्या आहेत. मी ज्या गावात राहतो त्या गावची एक अल्पभूधारक शेतकरी महिला आहे. ती एकल महिला आहे. पंधरा वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात काकाचे निधन झाले. आणि फक्त दोन एकर शेतीच्या भरवशावर ती तीन मुलांचा सांभाळ करत आहे. एके दिवशी शेतीत झालेले नुकसान पाहून ती घरी आली आणि मोठा आकांत करून रडायला लागली.
पुस्तक परिचय – सह्याचला आणि मी – एक प्रेमकहाणी
लेखक: माधव गाडगीळ
प्रकाशक: राजहंस प्रकाशन

परवाच ‘सह्याचला आणि मी – एक प्रेमकहाणी’ हे माधव गाडगीळ यांचे पुस्तक हातात पडले; आणि मी ते आधाशासारखे वाचून काढले. एक निसर्गप्रेमी, पद्मभूषण, पर्यावरणवादी चळवळीतला एक आधारस्तंभ आणि भटनागर प्रशस्ती पुरस्कार मिळालेला एक विद्वान म्हणून मी त्यांना ओळखून होतोच. तशा आमच्या गाठीभेटीही झाल्या होत्या. माझ्या ‘अनर्थ’ पुस्तकासाठी त्यांनी ब्लर्बही दिला होता. पण तरीही त्यांचे हे पुस्तक वाचल्यावर मला माधव गाडगीळ ही काय असामी आहे हे खऱ्या अर्थाने कळले.
या माणसाने निसर्गावर प्रेम केले. सर्व प्राणी, वनस्पती, किडे, भुंगे – सर्व कीटक, दगड, धोंडे, पर्वत, नद्या, समुद्र, त्यातले मासे, हत्ती, वाघ, सिंह, एवढेच काय इथल्या शेवाळ्यावरही याने प्रेम केले!
अरवली गाथा (२)
प्रस्तुत लेखकाने फेब्रुवारी महिन्यात, १०-२-२००० पासून १४-२-२००० पर्यंत पाच दिवस तरुण भारत संघाच्या काही कार्यकर्त्यांच्या समवेत ६/८ गावांची भटकंती केली, २०/२५ जोहड, अनिकट इत्यादि पाहिले, जमेल तितक्या मंडळींशी संवाद, चर्चा केल्या आणि जो अनुभव मिळाला तो थोडक्यात असा :
१. फेब्रुवारी २००० मध्ये २०/२५ पैकी फक्त दोन जोहडांमध्ये थोडेसे पाणी होते. बाकी जोहड, अनिकट, बांध हे कोरडे होते.
२. गावांमधल्या आणि शेतांमधल्या विहिरींना भरपूर पाणी होते. शेतांवर डिझेलचे पंप होते आणि कितीही उपसा केला तरी चालेल अशी परिस्थिती होती.
३. शेते हिरवीगार होती.
अरवली गाथा (१)
पाण्याचे दुर्भिक्ष
सध्या गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश इत्यादि राज्यांमधून भीषण दुष्काळाच्या बातम्या येत आहेत. चांगल्या मॉन्सूनच्या सलग बारा वर्षांनंतर केव्हातरी, कुठेतरी असे काही होणारच आहे ही आपली धारणा आहे.
राजस्थानातल्या “अलवर” जिल्ह्यातील “ठाणागाझी’ तहसील आणि त्याच्या आसपासच्या काही भागाची ही कहाणी!
अरवलीच्या टेकड्यांमधील पाचसहा छोट्या छोट्या नद्यांच्या पाणलोटात वसलेला हा भाग! “अर्वरी’, “सरसा”, “तिलदेही”, “जहाजवाली” आणि “ख्या-रेल’ या सुमारे ४०/४५ कि. मी. लांबीच्या आणि पुढे मोठ्या नद्यांना मिळणाऱ्या या उपनद्या!
साधारण १९३० सालपर्यंत इथली परिस्थिती बरी होती. या टेकड्यांवर पुरेशी हिरवी झाडी, चराईसाठी गवत, नवी नवलात राखलेल्या घनदाट वृक्षराजी होत्या.