११ एप्रिल ते १९ मे दरम्यान भारतातील विविध राज्यांत ६ टप्प्यांत मतदान होणार आहे. १७व्या लोकसभेसाठी होणार्या या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भारतातील लोकशाही आज नेमकी कुठे उभी आहे ते तपासून बघायला हवे.
इंग्लंडमधील इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट या कंपनीने पाच निकषांवर केलेल्या एका सर्वेक्षणानुसार लोकशाही निर्देशांकात १६७ देशांमधून भारत ४१व्या क्रमांकावर आहे. निवडणूक प्रक्रिया, सरकारची कार्यपद्धती, राजकारणात जनतेचा सहभाग, राजकीय संस्कृती आणि व्यक्ति स्वातंत्र्य या निकषांवर भारताचे सरासरी गुण १० पैकी फक्त ७.२३ असून भारतातील लोकशाहीला ‘सदोष लोकशाही’ म्हटले गेले आहे. ८ हून अधिक गुण मिळालेल्या २० देशांत ‘संपूर्ण लोकशाही’ असल्याचे मानले गेले आहे.