टीप: नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘आजचा सुधारक’च्या अंकातील आजचा चार्वाक ह्या लेखावर बरेच अभिप्राय आले आणि त्याअनुषंगाने ‘चार्वाक विचारसरणी’ हा विषय चर्चेमध्ये आला. चर्चेतील मुद्द्यांच्या अनुषंगाने आणि अभिप्राय पाठवणाऱ्या एका सुजाण वाचकाच्या विनंतीवरून ‘आजचा सुधारक’मध्ये नियमीतपणे लेख पाठवणारे आपले स्नेही शशिकांत पडळकर ह्यांनी नवा चार्वाक, पाश्चात्य तत्त्वज्ञानातील काही संदर्भ, आणि आजच्या चार्वाकाजवळ असणारे नवे सूचकांक अशा आशयाचा एक स्वतंत्र लेख आमच्याकडे पाठवला. तो लेख येथे प्रकाशित करतो आहोत. पूर्वप्रकाशित लेखांवर अश्या साधकबाधक चर्चा होत राहाणे आम्हांला मोलाचे वाटते.
भारतीय उपखंडातील बहुतेक सर्व स्थानिक (autochthonous) श्रद्धाप्रणाली ह्या कर्मसिद्धांताच्या पायावर उभ्या आहेत.