[आ. सु. च्या ऑगस्ट ९८ च्या अंकात एका जर्मन विचारवंताने स्वतःच्या देशबांधवांना कसे खडसावले त्याचे वर्णन आहे. डेव्हिड हॅल्बरस्टॅम या अमेरिकन वार्ताहर-साहित्यिकाच्या “द नेक्स्ट सेंचुरी” (विल्यम मॉरो, १९९१) या ग्रंथातील जर्मनीसंबंधी एक उतारा या देशाबाबत आणखीही काही माहिती पुरवतो त्याचा हा अनुवाद. संदर्भ आहे, ‘सोविएत युनियनच्या फुटीनंतरचे जग’.]
या सगळ्या बदलांचा, सोविएत युनियन फुटल्याने निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा जर कोणत्या देशाला मिळायचाच असेल, तर तो जर्मनीला मिळेल. इतरांप्रमाणे मलाही वाटते की जर्मनांची शिस्त, त्यांची आर्थिक ‘ऊर्जा’, त्यांच्या अर्थव्यवहाराचे अग्रक्रम, या सा-यांमुळे ते शक्तीची आणि गतिमानतेची नवी उंची गाठतील.
विषय «इतर»
कार्यक्षम लोकशाही: ब्रिटिशांचा अमेरिकेकडे एक मत्सरग्रस्त कटाक्ष
मागच्या आठवड्यात अमेरिकन लोकांनी आमच्यापासून त्यांना स्वातंत्र्य मिळाले त्याचा उत्सव साजरा केला. त्या उत्सवाप्रीत्यर्थ ते गेल्या ४ जुलैला मिटक्या मारत बियर प्याले, त्यांनी कबाबांवर ताव मारत नयनरम्य आतिषबाजीचे खेळ पाहिले; आणि हे सारे करीत असताना ब्रिटनपासून मुक्तता मिळविल्याबद्दल स्वतःच्या धैर्याची आणि हिंमतीची आठवण करीत जल्लोष केला.
आणि आम्ही काय केले? आमच्या वसाहतींवरील आमचा ताबा सोडून दिल्याबद्दल आम्ही मेजवान्या दिल्या नाहीत. कारण दोन शतकानंतर सर्वच उलथापालथ झाली आहे. पारडे इतके उलटले आहे की जणू काय तेच मालक आणि आम्ही दास अशी स्थिती प्राप्त झाली आहे.
प्रो. बा.वि. ठोसर – एक संस्मरण
आजचा सुधारकचे एक लेखक आणि या मासिकाबद्दल विशेष आस्था बाळगणारे प्रोफेसर बा.वि. ठोसर यांचे नुकतेच निधन झाले. नागपूरच्या विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर काही वर्षे त्यांनी त्याच महाविद्यालयात अध्यापन केले. नंतर ते बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे सर सी.व्ही. रामन यांचेकडे संशोधन करण्यासाठी गेले. इंग्लंडमधून पीएच.डी. मिळविल्यानंतर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च या ख्यातकीर्त संस्थेत ३० वर्षे संशोधन केले आणि न्यूक्लीअर स्पेक्ट्रॉस्कोपी, मोसबॉअर परिणाम, आयन इंप्लांटेशन, पॉझिट्रॉन भौतिकी इत्यादि विषयांच्या संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली. जवळजवळ सात वर्षे त्यांनी भौतिकीचे अधिष्ठाता (dean) या उच्च पदावर काम केले.
स्फुट लेख – गांधीजींचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य
‘मी नथुराम गोडसे बोलतोय्…’ ह्या नाटकावर बंदी घालणा-यांवर सध्या टीकेची झोड उठली आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची बाजू बळकट करण्यासाठी चढाओढ लागली आहे. प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य असावयालाच हवे असे मानणारे आम्हीही आहोत, पण तेवढ्यामुळेच आम्हाला नथुरामची बाजू घेता येत नाही.
नथुरामने दोन गुन्हे केले आहेत असे आमचे मत आहे. त्याने गांधीजींचे प्राण घेतले म्हणजे गांधीजींचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेतले हा पहिला गुन्हा आणि त्यासाठी कायदा हातांत घेतला हा दुसरा गुन्हा. गांधींचे बोलणे बंद करणे ह्या एकमेव हेतूने त्याने त्यांना मारून टाकले. गांधींनी त्याचे एकट्याचे कोठलेही नुकसान केलेले नव्हते.
ब्राह्मणेतर समाजवर्ग व आजचा सुधारक
गोपाळ गणेश आगरकरांचा वारसा चालवणाच्या दि. य. देशपांडे यांनी सुरू केलेल्या आजचा सुधारक ला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याच्या नव्या संपादकांनी ‘सिंहावलोकन आणि थोडे आत्मपरीक्षण केले आहे. (आ.सु. जून ९८) त्यात त्यांनी आजचा सुधारकने केलेल्या कामाचे फलित फार अल्प आहे व पुष्कळशा चर्चा एका विशिष्ट परिघात फिरत असल्याची खंत व्यक्त केली आहे.
संपूर्ण ग्रंथव्यवसायाला, त्यातही प्रबोधनपर व गांभीर्यपूर्ण लिखाण असलेल्या नियतकालिकांना अवकळा आलेली असताना, गेली आठ वर्षे, न चुकता (व वार्षिक वर्गणीत वाढ न करता) सकस आशययुक्त व विचारशक्तीला चालना देणारे मासिक काढत असल्याबद्दल संपादक-मंडळासहित सर्व संबंधित अभिनंदनास पात्र आहेत.
‘एकविसाव्या शतकात संतविचाराची सोबत’
‘ललित’ मासिकाचा मे ९८ चा अंक ‘संतसाहित्य आणि एकविसावे शतक’ या विषयावर विशेषांक म्हणून प्रसिद्ध झाला आहे. त्यात एकूण सोळा व्यासंगी विद्वानांचे लेख आहेत. त्यापैकी पाच मराठीचे प्राध्यापक असून, दहा संतसाहित्याचे अभ्यासक, हरिभक्तिपरायण, प्रवचनकार इ. आहेत. उरलेले सोळावे एकमेव वैज्ञानिक श्री. वि. गो. कुळकर्णी आहेत. त्या दृष्टीने लेखकांची ही निवड प्रातिनिधिक म्हणता येणार नाही. अशी निवड करण्यात कदाचित् अशी दृष्टी असू शकेल की संतसाहित्यावर लेख मागवायचे तर त्यांचे लेखक त्या विषयाचे अभ्यासक असले पाहिजेत. ते काही का असेना, परिणाम असा झाला आहे की हा विशेषांक संतसाहित्याच्या प्रशंसेकरिताच काढला आहे असा समज होतो; कारण श्री वि.
विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्या आणि त्यांतून निर्माण होणारे व्यवस्थेचे प्रश्न
१९९७-९८ ह्या कृषि वर्षात प्रथम अवर्षण व नंतर तीन वेळा अतिवर्षण घडले. त्यातून नापिकी झाल्यामुळे जी देणी देणे अशक्य झाले त्यांचा व त्यांच्याशी संबंधित कौटुंबिक बाबींमुळे शेतक-यांनी आत्महत्या केल्या, नव्हे त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नाही ही सत्यस्थिती आहे. ही परिस्थिती विदर्भात गेल्या ३० वर्षांत प्रथमच निर्माण झाली हे जरी खरे असले तरी त्या प्रश्नावर तितक्या गांभीर्याने उपाययोजना केली गेली नाही, हेही तितकेच खरे आहे. ह्या घटनेतून सध्याची शेतीची प्रबंधन घडवून आणणारी जी व्यवस्था आहे तिच्यासंबंधी बरेच प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरे शेतक-यांसह आपण सर्वांनी शोधावयाची आहेत.
प्रा. लिओनार्ड आणि आजचा जर्मनी
“आपणाला आजच्या जर्मनीत काय काय कमतरता जाणवतात”? कृपया सोबतची प्रश्नावली भरून पाठवाल काय? ‘जर्मनीतल्या एका प्रख्यात नियतकालिकाने अशी प्रश्नावली काही सुप्रसिद्ध विचारवंतांना पाठविली’. प्रश्नावली अशी –
तुम्हाला जर्मनीविषयी बांधिलकी का वाटते? काही खास वैयक्तिक स्नेहरज्जू? जर्मनीच्या इतिहासातील कोणत्या कालखंडात तुम्हाला राहावयाला आवडले असते ? जर्मनीच्या इतिहासातील कोणते पराक्रम, यश ही तुम्हाला सर्वोत्तम वाटतात ? कोणती जर्मन इतिहासकालीन व्यक्ती तुम्हाला आवडते ? वाङ्मय, संगीत, कला, विज्ञान ह्या क्षेत्रांत कोणत्या जर्मन व्यक्ती तुम्हाला महान वाटतात ? जर्मन इतिहासातील सर्वांत पराक्रमी (अर्थात् लष्करी) पुरुष कोण ?
स्फुटलेख : महिला-आरक्षण–वरदान की शाप?
हा अंक वाचकांच्या हातात पडेपर्यंत महिला आरक्षण विधेयक बहुधा संमत झालेले असेल. त्याच्या मूळ स्वरूपात जरी नाही तरी काही तडजोडी करून ते संमत होईल अशी चिन्हे आज दिसत आहेत. ह्या आरक्षणामुळे काही मोजक्या स्त्रियांच्या हातात थोडी अधिक
सत्ता येईल हे कितीहि खरे असले तरी हे हक्क मागून स्त्रियांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. आपल्या देशाच्या प्रगतीला खीळ घातली आहे. आपला देश कमीत कमी शंभर वर्षे मागे गेला आहे.
मुळात आरक्षण हीच एक भयानक गोष्ट आहे. एकदा आरक्षण मान्य केले की पुष्कळदा अयोग्य व्यक्तींना निवडून द्यावे लागते.
अनीती दुसर्यांचे नुकसान करण्यात
लोक अश्लील कशाला म्हणतात ते पाहिले तर असे दिसतें कीं परिचयाच्या गोष्टींना लोक अश्लील मानीत नाहीत. उदाहरणार्थ हिंदुस्थानांत उच्च वर्गातील स्त्रिया स्तन उघडे टाकून रस्त्याने जात नाहीत व बहुतेक ठिकाणीं घरींही उघडे टाकीत नाहीत तथापि हिंदुस्थानांतही कांही ठिकाणी घरीं स्तन उघडे ठेवतात व बाहेर जातांना मात्र वर पातळ आच्छादन असते. जाव्हा बेटांत गेल्यास तेथे ते बाहेर जातांनाही झांकीत नाहीत. अशी उदाहरणे दिसलीं असतां अश्लीलता ही केवळ सांकेतिक कल्पना आहे, यापेक्षा जास्त तथ्य त्यांत नाही, हे समजण्यास मदत होते. त्याचप्रमाणे नीतीची गोष्ट.