कावळ्याच्या घरट्यांत कोकिळा अंडी घालते. अंडी घालताना कावळ्याची अंडी घरट्यातून बाहेर ढकलून देते. कोकिळेची अंडी लवकर फुटतात व त्यातून लवकर पिल्लू बाहेर येते. ते पिल्लू देखील सोबतएखादे कावळ्याचे पिल्लू असेल तर त्याला घरट्याबाहेर ढकलून देते. कावळा मात्र त्याला आपलेच पिल्लू समजून वाढवतो. पिल्लू मात्र वाढल्यावर सर्वार्थाने कोकिळाच होते, त्याच्यात कावळ्याचे कोणतेही गुणधर्म येत नाहीत. या सर्व गोष्टी आपल्याला सर्वांना माहीतच आहेत.
आपल्या समाजालाही हा काक-कोकिल न्याय चपखलपणे लागू पडतो हे मात्र आपण लक्षात घेत नाही. पाश्चात्त्य संस्कृतीची मुले आपल्या घरोघरी वाढत आहेत.
विषय «इतर»
विधवाविवाह चळवळ
ईश्वरचंद्र विद्यासागर यांना एकदा त्यांच्या आईने विचारले, “तू एवढे मोठमोठे ग्रंथ वाचतोस, परंतु या ९ वर्षांच्या चिमुरड्या विधवेचे दुर्भाग्य ज्यामुळे नष्ट होईल असे एखादे शास्त्र तुला माहीत नाही का?’ ईश्वरचंद्रानी त्या मुलीकडे पाहिले. त्यांना तिची कणव आली. त्यानंतर त्यांनी महत्प्रयासाने विधवाविवाहासंबंधीचे शास्त्रार्थ शोधले आणि विधवांना क्रूरपणे वागवणाच्या दुष्ट रूढीविरुद्ध लढा आरंभला.
ही हकीगत एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली. आज ती आठवायचे कारण म्हणजे नुकतेच विधवाविवाह चळवळ हे पुस्तक हातांत पडले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाचे स.गं. मालशे आणि नंदा आपटे यांनी केलेल्या संशोधनावर आधारलेले हे पुस्तक त्याच विद्यापीठाच्या स्त्रीसंशोधन केंद्रातर्फे १९७८ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
श्री माधव रिसबूड यांस आणखी एक उत्तर
आ. सु. (जुलै ९७) ला लिहिलेल्या पत्रात श्री. माधव रिसबूड लिहितात – ‘फलित बीजांडापासून आरंभ करून संपूर्ण देह तयार होईपर्यंत ज्या क्रिया घडतात त्यात जोडीजोडीचे अवयव ज्या पेशींपासून बनतात त्या पेशींची दोन अधुके एकमेकांपासून वेगळी होऊन दूर होण्याची क्रिया असते. ही दोन अधुक एका काल्पनिक मध्यरेषेच्या दोन्ही बाजूस ठराविक अंतरावर जाऊन थांबतात, त्यांना डावे-उजवेपणाचे भान असते व त्यानुसार त्यांची पुढली जडणघडण होते, आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्यांना सिमेट्रीचे भान असते. या तीन गोष्टी निश्चितपणे हे दर्शवितात की कसलीतरी जाणीव इथे कार्यरत आहे.”
सामाजिक सुधारणा आणि आजचा सुधारक
विवेकवादाला (rationalism) ला वाहिलेले “आजचा सुधारक’ हे जगातील प्रमुख मराठी मासिक आहे. या मासिकाचे लक्ष्य मराठी भाषिक, विशेषत: महाराष्ट्रातील जनता हेच आहे हे सुद्धा उघड आहे. ही जनता म्हणजे सामान्य जनता नसून, समाजातील विचार करण्याची आवड व कुवत असलेली मंडळी एवढीच “आ.सु.” ची वाचक आहेत. परंतु ही मोजकी मंडळीच नवे तर्कशुद्ध विचारही प्रसवू शकतात.
“आजचा सुधारक’ च्या पहिल्या संपादकीयामध्ये (आ.सु., १-१ : ३-५) यामासिकाची काही उद्दिष्टे विशद केलेली आहेत. त्यात अंधश्रद्धेचे व बुवाबाजीचे निर्मूलन, सामाजिक जीवनातील धर्माचा ‘धुडगूस’, व्रतेवैकल्ये, यज्ञ, कुंभमेळे यांवर आवर घालणे; दलित, स्त्रिया यांचे शोषण थांबविणे; अनाथ, अनौरस मुलांना आधार देण्याचे महत्व पटवून देणे.
सुधारणा, लैंगिकता व क्लोनिंग
हे विश्व अनादि व अनंत आहे. त्याचा पसारा, त्याचे वस्तुमान, त्याचे तेज, त्याची शक्ती, त्याचे वेग, या सर्वच गोष्टी मानवी कल्पनेबाहेरच्या आहेत. गणिताची मदत घेतल्याशिवाय आपण त्या समजू शकत नाही. या उलट अणु-रचनेचे, अणु-परमाणूंचे आकार, वेग, भ्रमणकक्षा, वस्तुमान वगैरेंची कल्पना, गणिताची मदत घेतल्याशिवाय आपण करू शकत नाही. पण ही विश्वाची अवाढव्य यंत्रणा काय किंवा अणूची सूक्ष्मतम यंत्रणा काय, त्या एखाद्या घड्याळाप्रमाणे नियमबद्ध आहेत. त्यामधील घटकांना स्वयंप्रज्ञाही नाही व आत्मभानही नाही. त्यांना संवेदनाही नाही व बुद्धिमत्ताही नाही. स्मृतीही नाही, व प्रगतीही नाही.
आस्तिकता आणि विज्ञान : दि. य. देशपांडे ह्यांच्या लेखाला उत्तर
मे १९९७ च्या ‘आजचा सुधारक’च्या कव्हरवर बर्ट्रॅंड रसेल यांचा ‘इतरांच्या मताबद्दल आदर’ हा उतारा, तर पहिल्या पानावर दि. य. देशपांडे यांच्या लेखात माझ्या नावाच्या आसपास असलेले उद्गारवाचक चिन्ह हा विरोधाभास गंमतीशीर वाटला.
वैज्ञानिक म्हणजे विज्ञान नव्हे हे देशपांडे यांचे मत. ‘देश म्हणजे देशातील माणसे’हे माझे त्याला उत्तर.
दि. य. देशपांडे ह्यांना कोणता ईश्वर अभिप्रेत आहे? आइन्स्टाइन-बोर-एकल्स ह्यांच्या परमेश्वराच्या संकल्पना कोणत्या? ईश्वराची व्याख्या कोणती? दि. य. देशपांडे ह्यांना अभिप्रेत असलेला ईश्वर हा सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वसाधु आहे. ह्या काटेकोर चौकटीत मी नास्तिक आहे.
आडारकरांच्या उत्तराविषयी
डॉ. हेमंत आडारकरांच्या लेखाला मी मे ९७ च्या अंकात दिलेल्या उत्तराला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते याच अंकात छापले आहे. त्याविषयी दोन शब्द लिहिणे अवश्य वाटते.
वैज्ञानिक म्हणजे विज्ञान नव्हे या माझ्या विधानावर ते म्हणतात की देश म्हणजे देशातील माणसे.
त्यासंबंधी एवढेच म्हणणे पुरे की विज्ञान म्हणजे प्रमाणित ज्ञानाचा संचय, तर वैज्ञानिक म्हणजे वैज्ञानिक उद्योग करणारी माणसे. माणसे असल्यामुळे माणसांचे दोष त्यांच्याठिकाणी असू शकतात. (उदा. आपल्या शोधाविषयी खात्री करणे किंवा प्रीति असणे.) परंतु विज्ञान कोणत्याही काळी सिद्ध झालेले आणि सर्वमान्य झालेले ज्ञान.
मी आस्तिक / नास्तिक का आहे?
आस्तिक आणि नास्तिक हे दोन शब्द तसे परिचयाचे. पण तरीही त्यांचा नेमका अर्थ प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून. साध्या सोप्या भाषेत मी देवावर विश्वास ठेवणारा आस्तिकआणि तसं न करणारा तो नास्तिक असं समजते. आणि याच साध्या अर्थाच्या अनुषंगानं माझे विचार मांडते. मी नास्तिक का आहे? प्रश्नाच्या उत्तराचे अनेक कप्पे आहेत. काही उदाहरणांसह ते स्पष्ट करीनच.
मुळात लोक आस्तिक का असतात? पूर्वीचा काळ ढवळून पाहिला तर कुणीतरी धर्मगुरू – धर्माची शिक्षणप्रणाली पुढं हाकणारे असे जे कुणी होते त्यांनी समाज आपल्या इशा-यांवर नाचवण्याचा प्रयत्न केला.
श्री रिसबूड यांना उत्तर
याच अंकात पत्रव्यवहार या सदरात श्री माधव रिसबूड यांचे मला आलेले पत्र छापले आहे. या पत्राचा सूर उघड उघड अनादराचा, अधिक्षेपाचाही आहे. माझी विचारसरणी साचेबंद आहे असा त्यांचा आरोप आहे. ते मला हटवादीही म्हणतात. त्यांच्या सप्टेंबर ९३ च्या पत्राला दिलेल्या उत्तरात मी जाणीव कल्पनेची थट्टा केली आहे, समर्पक उत्तर दिले नाही अशी त्यांची तक्रार आहे. असे जर आहे तर त्यांनी त्याच विषयावरील विचार पुन्हा माझ्यापुढे का मांडावेत? माझ्या साचेबंद हटवादी भूमिकेतून त्यांना हवे ते उत्तर मिळाल्याची आशा नसल्यामुळे या पत्राचे प्रयोजन काय असा प्रश्न मला पडला आहे.
परंपरा, आधुनिकता व राष्ट्रवाद (पूर्वार्ध)
आधुनिकतेचा विचार राष्ट्रवादाच्या संदर्भात केला नाही तर तो अपुरा आणि अधांतरी राहतो असे मला वाटते. म्हणून त्या दोहोंचा संबंध तपासण्याचा हेतू मनात धरून हा लेख लिहीत आहे.
मानवतेवर आधारलेला नीतिविचार आणि बुद्धिवाद ही दोन ‘‘आधुनिक’ म्हटली जाणारी मूल्य आहेत. प्र. ब. कुळकर्णीच्या शब्दांत (आ. सु. मार्च १९९७) “विवेकनिष्ठ मानवता हेआधुनिकतेचे बीज आहे.” “मानवता”म्हटले की राष्ट्रवाद बाद होतो. राष्ट्रवाद बाद होणे मला रुचणारे नाही. तेव्हा प्रथम राष्ट्रवादाची गरज मला का वाटते आणि त्याचे स्वरूप काय हे अत्यंत सक्षेपाने सांगून नंतर राष्ट्रवादाचा नीतिविचाराशी व बुद्धिवादाशी कोणत्या प्रकारचा संबंध असू शकतो याचा शोध मी घेणार आहे.