विषय «इतर»

राष्ट्रवाद की संस्कृतिसंघर्ष ?

शीतयुद्धाची अखेर झाल्यानंतर जगातील राजकीय सत्तासमतोल बदलला त्याचबरोबर अर्थकारणातही स्थित्यंतरास सुरुवात झाली. जागतिक व्यापार खुला करण्याच्या प्रक्रियेने जोर धरला. या पार्श्वभूमीवर आर्थिक सिद्धांतांची पुनर्तपासणी करण्यात येऊ लागली आहे. त्याचप्रमाणे राजकीय तत्त्वज्ञानांचीही फेरमांडणी करण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. सोव्हिएत संघराज्याचा अस्त, त्यानंतर येल्त्सिन यांनी पाश्चिमात्यांकडे केलेली आर्थिक मदतीची मागणी, शस्त्रास्त्रकपातीचे करार, ‘गॅट’ करारावर झालेल्या स्वाक्षऱ्या -या घडामोडींनंतर अमेरिकेतील राजकीय पंडित राष्ट्रवादाचा अस्त होत असल्याचा निर्वाळा देऊ लागले आहेत. वाढत्या आर्थिक परस्परावलंबित्वामुळे शुद्ध राष्ट्रीय सार्वभौमत्वही लोप पावत असून, देशांच्या भौगोलिक सीमा पुसट होत आहेत, असे या अभ्यासकांचे मत आहे.

पुढे वाचा

स्त्री-पुरुष विषम प्रमाण

दिवाकर मोहनी (आ. सु. ऑगस्ट १९९३) व श्रीनिवास दीक्षित (आ. सु. जानेवारी १९९४) यांमधील चर्चेच्या संदर्भात पुढील माहिती उपयुक्त ठरेल.
१) कुपोषण
कुटुंबातल्या कुटुंबात अन्नाचे जे वाटप होते त्यात स्त्रीला पुरुषापेक्षा कमी हिस्सा मिळतो याबद्दल काही माहिती उपलब्ध आहे. मैत्रेयी कृष्ण राज यांनी दिल्लीतील सफदरजंग इस्पितळातून घेतलेली आकडेवारी पुढे दिली आहे. हीत सर्व वयांच्या स्त्रीपुरुषांचा समावेश आहे.
पोषणाची पातळी पुरुष (टक्के) स्त्रिया (टक्के)
तीव्र कुपोषण २८.५७ ७१.४३
मध्यम कुपोषण ४३.०७ ५६.९३
सौम्य कुपोषण ५६.४० ४३.६०
योग्य पोषण ६१.२० ३०.३०
तीव्र व मध्यम कुपोषणाचा असर पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे असे या सारणीवरून दिसते.

पुढे वाचा

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग १२)

बाक्र्लीचा आयडियलिझम

गेल्या लेखांकात आपण idea’ या शब्दाचे दोन अगदी भिन्न आणि स्वतंत्र अर्थ पाहिले. आधुनिक भाषाशास्त्रज्ञांच्या मताने idea’ हा शब्द एक नसून दोन आहेत. एक, प्लेटोचा ‘आकार’ या अर्थाचा ग्रीक शब्द, आणि दुसरा, अर्वाचीन तत्त्वज्ञानात रूढ असलेला ‘कल्पना या अर्थाचा इंग्लिश शब्द. त्यामुळे idealism’ या शब्दालाही दोन अगदी भिन्न आणि स्वतंत्र अर्थ आहेत. एक, प्लेटोच्या idea’पासून आलेला आदर्शवाद किंवा ध्येयवाद, आणि दुसरा इंग्लिश idea’ पासून आलेला कल्पनावाद. बार्लीला हा दुसरा idealism अभिप्रेत होता. या मतानुसार विश्वात फक्त दोनच प्रकारचे पदार्थ आहेत, आत्मे किंवा मने आणि त्यांच्या कल्पना.

पुढे वाचा

नोव्हेंबर १९९३ च्या अंकातील ‘फलज्योतिषावर शोधज्योत’ या डॉ. पु. वि. खांडेकर यांनी लिहिलेल्या लेखाला पुरवणी.

वरील लेखाच्या शेवटी जी भाकिते दिली आहेत त्यातील ‘इलस्ट्रेटेड वीकली’ च्या २० मे ८४ च्या अंकात ज्यांची भाकिते दिली आहेत त्यांची नावे अशी- फलज्योतिषी बेजन दारूवाला व तांत्रिक प्रवीण तलाठी ह्यांची भाकिते समोरासमोर दिली आहेत. त्यांतील काही परस्पर-विरोधी आहेत. आणखी लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे हा मुलाखत-वजा लेख थिल्लर व पोरकट विधानांनी— दोघांच्याही – भरगच्च भरलेला आहे. प्रवीण तलाठीची काही भरमसाठ वक्तव्ये. त्यातले एक असे- “मी आणखी एक हवन केले आणि चरणसिंगाला पंतप्रधान केले.” आणखी एक नमुना पहा. “आपल्या देशातील परदेशांच्या राष्ट्रविघातक कारवायांचा नायनाट करण्यासाठी तंत्रविद्येचा उपयोग केला पाहिजे.”

पुढे वाचा

बालमजुरांची ससेहालपट

एका ‘आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना’, या म्हणीप्रमाणे देशातील सुमारे एक कोटी ८० लाख बालमजुरांची स्थिती सरकारने कशी करून टाकली आहे, याचे उदाहरण म्हणून रमेश कुमारच्या कर्मकहाणीकडे बोट दाखविता येईल. रमेश कुमारचे अपहरण करण्यात आले तेव्हा त्याचे वय होते सात वर्षांचे. आज रमेश कुमार १४ वर्षांचा आहे. गेली सात वर्षे त्याने उत्तर प्रदेशातील एका गालिचे बनविण्याच्या कारखान्यात वेठबिगार बालमजूर म्हणून काढली आहेत. दिवसाचे १३ ते १५ तास काम, अपुरे जेवण, कारखान्यातच राहण्याची सक्ती यामुळे रमेश कुमार १४ वर्षांचा असूनही तेवढ्या वयाचा वाटत नाहीं.

पुढे वाचा

संपादकीय विशेषांकांची योजना

आजचा सुधारक ह्या आमच्या मासिकाच्या गेल्या अंदाजे चार वर्षांच्या वाटचालीत आम्ही तीन परिसंवाद विशेषांकांच्या स्वरूपात प्रकाशित केले. वा. म. जोशी ह्यांचे विवेकवादी लिखाण ह्यावर पहिला विशेषांक, धर्मनिरपेक्षता ह्यावर दुसरा आणि निसर्ग आणि मानव ह्या विषयावर तिसरा. ह्या तीनही विशेषांकांना चांगला प्रतिसाद मिळाला. आता थोड्या वेगळ्या प्रकारच्या विशेषांकांची योजना केली आहे.
या विशेषांकांचे एक वैशिष्ट्य असे राहील की त्यांच्या संपादनाचे काम आम्ही महाराष्ट्रातील प्रथितयश मंडळीकडे सोपविले असून त्यांला अनुकूल प्रतिसादही आहे.
तूर्त आमच्या नजरेसमोर असलेले काही विषय पुढीलप्रमाणे आहेत.
* समान नागरी कायदा
* शिक्षण पद्धतीतील आवश्यक बदल .

पुढे वाचा

कामसूत्रे आणि स्त्री

कामसूत्रं वाचली की पुरुषाला संभोगाचे किती वेड असतं ते कळतं. माझ्या नेहमी मनात येतं, बायकांवर कोणी संभोगशास्त्र लिहिलेलं नाही. निदान इतक्या मोठ्या प्रमाणावर तरी नाही. कारण एकच दिसते, पुरुषाला संभोगाची जबाबदारी स्वीकारावी लागत नाही. क्रिया झाली की तो मोकळा होतो. त्यामुळेच मला वाटतं, त्याची लैंगिक भूक जबरदस्त असते. आणि ती भागविली गेल्यावर त्याला वारंवार मोकळेपणाचं समाधानही प्रचंड असावं असं मला वाटतं. साधारणपणे शंभरातल्या नव्याण्णव ठिकाणी वाचशील, ऐकशील की संभोग झाला आणि ‘तो’ झोपून गेला. ‘ती’ तळमळत जागी राहिली. तो जर तिच्यासाठी जागा राहिला तर ती एक केस मी भाग्यवान समजेन की त्या ठिकाणी पुरुषाला लैंगिकता म्हणजे काय, तिचा स्त्रीशी असलेला संबंध समजला आणि त्याची कदर करावीशी वाटली.

पुढे वाचा

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग १०)

उद्गमन (३): औपन्यासिक-निगामी रीत

गेल्या लेखांकात उद्गमनाच्या दोन प्रमुख रीती आहेत असे मी म्हणालो, या रीती म्हणजे (१) सरल गणना (Simple Enumeration) आणि (२) औपन्यासिक-निगामी रीत (Hypothetico-Deductive Method). निसर्गातील काही साधेसोपे नियम आपल्याला सरल गणनेने सापडतात; परंतु कारणिक नियम शोधून काढण्याकरिता उपन्यासरीतीचा उपयोग अपरिहार्य होतो. ही गोष्ट कारणनियमाहून भिन्न गणितीय स्वरूपाच्या नियमांच्या शोधात अधिकच स्पष्ट होते. गणिताच्या एका सूत्रात (formula) ग्रथित करता येणारे नियम केवळ निरीक्षणाने सापडण्यासारखे नसतात. त्यामुळे निसर्गाचे बरेचसे निरीक्षण झाल्यावर त्यातील नियम काय असू शकेल याचा अंदाज करून त्या अंदाजाचे परीक्षण करावे लागते.

पुढे वाचा

चर्चा

त्या अनाठायी औदार्याने काय साधले?
श्री संपादक, आजचा सुधारक यांसी स. न. वि.
त्या घटनेला आता ४५ वर्षे होऊन गेली आहेत. तिचा विचार आज अलिप्तपणे करता येतो का, हे पहावे अशा उद्देशाने हे लिहीत आहे. सुरुवातीलाच हे अगदी स्पष्टपणे सांगितले पाहिजे की गांधी-हत्येशी या चर्चेचा संबंध जोडायचा नाही ही या चर्चेची पूर्व अट आहे.
सर्वानाच माहीत असलेली पाश्वभूमी मी माझ्या पद्धतीने थोडक्यात सांगतो. काश्मीर नरेशांनी पाकिस्तानी आक्रमणामुळे हतबल होऊन भारताशी सामीलनामा केला, आणि काश्मीर हा भारताचा भूभाग बनला. भारतीय फौजा श्रीनगर वाचवण्यासाठी धावल्या, आणि एका अघोषित युद्धास तोंड लागले.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक
स.न.वि.वि.
मुस्लिम प्रश्नासंबंधात श्री वसंत पळशीकरांना ‘वाळूत डोके खुपसून बसणाऱ्या शहामृगाची उपमा देणारे मा. श्री. रिसबूड यांचे पत्र वाचले. (नोव्हें. ९३) “(हिंदूंच्या) सनातन धर्माच्या कोणत्या तत्त्वानुसार मुस्लिम समाजाचे मन वळविण्याचे कोणते प्रयत्न (हिंदूंकडून) झाले.?” असा पळशीकरांचा प्रश्न आहे. या प्रश्नाची मूलगामी चिकित्सा नरहर कुरुंदकर आणि हमीद दलवाई यांनी केलेली आहे. मुस्लिमांचे मन वळविण्यापूर्वी त्यांचे ‘मन’ आहे तरी काय? त्यांना पाहिजे आहे तरी काय ? हे समजून घ्यावे लागते. कुरुंदकरांनी या प्रश्नाची . मूलगामी चिकित्सा त्यांच्या ‘अन्वय’ ग्रंथातील ‘धर्म आणि मन’ या प्रकरणात पुढीलप्रमाणे केलेली आहे:
भारतीय मुसलमानांची कायमची एक तक्रार असते की, त्यांना भारतीय घटनेने धर्मस्वातंत्र्य दिलेले नाही.

पुढे वाचा