मी आता आपल्यासमोर जे काही मांडणार आहे ते एका टीकाकाराच्या किंवा व्यावसायिक समीक्षकाच्या दृष्टिकोणातून नव्हे वा एखाद्या अॅकॅडेमिक प्रोफेसरच्या दृष्टिकोणातूनही नव्हे. तो आहे एका लेखनकर्मीचा दृष्टिकोण, ज्याच्यासाठी साहित्य हे गेली चाळीस-पन्नास वर्षे एक आसऱ्याचे ठिकाण, निवारा-आणि दुःख आणि वेदनांच्या क्षणी परमशांती आणि सांत्वना देणारा असा एक चिरतन स्रोत राहिलेले आहे.
फॉकनरने कुठेतरी असे म्हटलेले आहे की ज्या माणसांना आयुष्य जगता येते ती ते जगतात, आणि ज्यांना ते जमत नाही अशी माणसे आयुष्याविषयी लिहितात. मी या दुसऱ्या वर्गात मोडणारा आहे. खरे तर प्रत्येक कलावंत हा कमी अधिक प्रमाणात त्या प्रागैतिहासिक आदिम कलावंतासारखाच असतो, जो लाखो वर्षांपूर्वीच्या त्या काळात, इतरांबरोबर शिकारीला न जाता मागे गुहेत थांबायचा; इतरांच्या जगण्याचे तो निरीक्षण करायचा.
विषय «इतर»
पुरुषांच्या नावे एक खुले पत्र
प्रिय सद्गृहस्थहो, आमच्याविषयी व आमच्या उद्दिष्टांविषयी आपण आपल्या मनात काही गैरसमज बाळगून आहात, असे आमच्या निदर्शनास आले आहे. आपण सर्व एकत्र येऊन एक अधिक संतुलित समाज बनविण्याच्या कामात या गैरसमजुती व काही तद्दन खोट्या गोष्टींमुळे अडथळा निर्माण होतो. आपल्या मनातील हे अपसमज-गैरसमज दूर करावे अशी आमची मनापासून इच्छा आहे. कृपया तसे करण्याची संधी आम्हाला द्यावी.
१. तुमचे लिंगच्छेद करण्याचा आमचा अजिबात इरादा नाही.
२. (स्त्री व पुरुषांच्या) भूमिकांची अदलाबदल करणे हे आमचे ध्येय नाही. हजारो वर्षे आम्ही ज्या तुरुंगात खितपत पडलो त्यात तुम्हाला बंदिस्त करून ठेवणे हे आमचे उद्दिष्ट नाही.
शेतीः शिक्षणाचे माध्यम
“आमच्या मुलांपैकी कोणालाही बैलांकडून काम करून घेता येत नाही. शेतीच्या तंत्राची माहिती नाही. आम्ही मेल्यावर हे लोक बहुतेक मातीची ढेकळं खाऊनच जगणार आहेत.” एक शेतकरी तावातावाने बोलत होता.
माझ्या मनात प्रश्न उभा राहिला, यासाठी दोषी कोण? मुलांनी शाळेत जायला हवे, किमान दहावी पास (किंवा नापास) असायला हवे असे खेड्यातील प्रत्येकालाच वाटते. पुढे जाऊ शकला तर फारच आनंदाची गोष्ट. कुठे चपराशी म्हणून लागला तर गंगेत घोडे न्हाले. आता शाळेत त्याला शेतीविषयी काही ज्ञान मिळते का? काही धडे असतात शेतीबद्दलड्डथोडीशी माहिती जाता जाता सांगणारे, पण शेतीचे असे ज्ञान जे प्रत्यक्ष शेती करायला उपयोगी असेल ते बहुतेक शेतकी विद्यालयांतही मिळत नाही.
‘निर्माण’
मी हृषिकेश सध्या पुण्यामध्ये कायद्याचे शिक्षण घेत आहे. ग्रामीण भागातून येताना काही पुसट स्वप्नेही पाहिली होती. मात्र या सगळ्यात स्वतःला हरवून बसलो आहे, असे नेहमी वाटायचे. ज्या गोष्टी करण्यात मला आनंद यायचा नाही त्या स्वीकाराव्या लागायच्या, किंवा समाजाने तयार केलेल्या चौकटबद्ध जीवनपद्धतीत अडकल्याचा भास व्हायचा. समाज म्हणजे काय? समाजासाठी काही करावे! असे काही मनात आलेही नव्हते. परंतु पुढे वाचन केले. काही संस्थांची कामे पाहिली किंवा अप्रत्यक्षरीत्या सहभाग घेतला. यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला, पण संधी निर्माण झालीच नाही. साधारणपणे दोन वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली.
जुळलेपणा, सततचा शोध आणि सत्य
इतरांच्या संपर्कात असणे, किंवा त्याचा चरित्रकार एब्राहम पेज म्हणतो त्याप्रमाणे, इतरांशी जुळलेले (लेपक्षेळपशव) असणे, ही बोरची गरज होती, जवळपास निकड होती, म्हणा. त्याच्या चर्चा सॉक्रेटिक संवादांसाररख्या असत. त्यांमधून त्याच्या कल्पना सावकाश आकार घेत जात, घडत जात. हे इतक्या जास्त प्रमाणात होई, की काही जण त्याला भौतिकशास्त्रज्ञाऐवजी तत्त्वज्ञ मानत, त्याचे विरोधाभासांवर प्रेम असे. प्रश्नांच्या अनेक बाजू समजून घेतघेतच ते स्पष्ट होतात, सुटतात, असा त्याचा विश्वास होता. तो मते कशी व्यक्त करत असे हे सांगताना त्याचा निकटवर्ती स्नेही आइनस्टाइन म्हणतो, “तो सतत इकडेतिकडे शोधत असल्यासारखे बोलायचा; संपूर्ण, निखळ साथ हाती आलेल्या माणसासारखा कधीच बोलत नसे.’
मंगळूर आणि ‘बायकीपणा’
तुमच्या मते स्त्रियांचे सामाजिक स्थान पुरुषांच्या तशा स्थानाच्या तुलनेत कुठे असते? वर? खाली? बरोबरीत? उत्तर देताना घाई करू नये, कारण या एका प्रश्नाबाबत फारदा आपण स्वतःला फसवत असतो. उदाहरणार्थ, “मी माझ्या पत्नीला, मुलीला पूर्ण स्वातंत्र्य देतो. अगदी बरोबरीने वागवतो.”, हे म्हणणारा पुरुष स्वतःला पत्नी, मुलगी, या स्त्रियांचा वर समजून त्यांना स्वातंत्र्य देत’ असतो. “हे मला पूर्ण स्वातंत्र्य देतात.” असे म्हणणारी स्त्री आपण ‘ह्यांच्या’ खाली आहोत, हे मान्य करून वर ‘ह्यांना’ सांभाळून घेत असते! त्या मानाने, ‘आमच्या घरी सर्वांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.”,
“तत्त्वमीमांसा’ आणि वास्तव
[अर्नेस्ट एव्हरार्ड (Earnest Everhard) या (काल्पनिक!) क्रांतिकारकाच्या आयुष्यातील १९१२ ते १९३२ या काळाचे वर्णन त्याची पत्नी एव्हिस (Avis) हिने लिहिले, व एका झाडाच्या ढोलीत लपवून ठेवले. सातेकशे वर्षांनंतर हा वृत्तांत सटीप रूपात प्रसिद्ध होत आहे, अशी कल्पना करून जॅक लंडनचे द आयर्न हील (The Iron Heel, Jack London, १९०८) हे पुस्तक लिहिले गेले. गेल्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातला लंडन हा प्रसिद्ध अमेरिकन कथाकार. त्याची बरीच पुस्तके आजही पुनःप्रकाशित होत असतात. काही तर अमेरिकन प्रचारसाहित्यातही भेटतात. द आयर्न हील मात्र अनेक वर्षे उपलब्ध नव्हते, कारण ते भांडवली व्यवस्थेची एक जालीम आवृत्ती रेखाटते!
स्साऽऽल्या मुलींनी पब्मध्ये जायचे नसते
भारतीय मुली बरेच काही करू शकतात. विमाने उडवू शकतात आणि उडवतात. सैन्यात भरती होऊन देशाचे शत्रूपासून रक्षण करतात. त्यांना माऊंट एव्हरेस्ट चढता येते, आणि त्या चढल्या आहेत. त्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (उएज) होऊ शकतात, इंद्रा नूयींसारख्या. काही तर एखाद्या देशाच्याही मुख्य कार्यकारी अधिकारी होतात, इंदिरा आणि सोनिया गांधींसारख्या. या आणि इतरही बऱ्याच गोष्टी भारतीय मुली करतात. पण त्यांना पब् मध्ये जाऊन पिता येत नाही. श्रीराम सेना आणि त्यांचे भगवे जुळे भावंड राष्ट्रीय हिंदु सेना या संघ परिवारातल्या कट्टर संस्थांचा तसा ऑफिशियल आदेश आहे.
मे. पुं. रेगे : स्मृतिसभा
२८ डिसेंबरला (मे. पुं.) रेगेसरांच्या स्मृतिदिनी परममित्र प्रकाशनाने प्राज्ञ पाठशाळेच्या सहकार्याने दिवसभराचा कार्यक्रम आयोजित केला आहे, व त्या निमित्ताने अनेक मान्यवर रेगेसरांविषयी बोलणार आहेत, हे कळायचाच अवकाश, की जाणे निश्चित केले. परतले, ती अतीव समाधानाने, कार्यक्रम संपल्यावरही भैरवीचे सूर मनात रेंगाळतच राहिले.
प्रास्ताविकानंतर प्रा. मिलिंद मालशे ह्यांनी सरांच्या व्यावसायिक जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. केवळ बौद्धिक व्यापारांमध्ये रममाण न होता त्याचबरोबरीने समाजाभिमुख राहून विविध सामाजिक प्रश्नांचा मूलगामी विचार करून त्यांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्यातील त्यांची हातोटी विलक्षण होती व त्याहून विशेष म्हणजे “समाजातील जातिभेद, विषमता, दारिद्र्य पाहून त्यांना प्रचंड अपराधी असल्यासारखे वाटत असे आणि हे अपराधीपण बाळगूनच ते वावरत असत” असे त्यांच्या कन्या रूपा रेगे – नित्सुरे यांनी आवर्जून सांगितले.
एक क्रान्ती : दोन वाद (भाग ४)
[एक क्रान्तीःदोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. दुसऱ्या भागात आपण इंग्लंडच्या लोकसंख्येवर व कायद्यांवर झालेले परिणाम तपासले. सोबतच आदिम समाजवादी विचार, मार्क्सचे विचार व अमेरिकेतील व्यवस्थापित भांडवलवाद तपासले. तिसऱ्या भागात आपण क्यूबा व स्वीडन या दोन देशांमधील समाजवादाच्या आवृत्त्या तपासल्या. गंमत म्हणजे स्वीडन हे चांगला समाजवाद व चांगला भांडवलवाद या दोन्हींचे उदाहरण मानले जाते! आता त्यापुढे – ]
अमेरिका भांडवलवाद
आधीच्या अराजकी स्थितीकडून व्यवस्थापित आवृत्तीत शिरला. लोकशाही समाजवादाचा दबाव, निवडणुका जिंकण्यासाठीचा लोकानुनय, तेजीमंदीवरील केन्सवादी उपाय, अशा सायातून भांडवलवादातली मुक्ती बरीचशी मर्यादित झाली.