माझे विचार रूढ पद्धतीस अनुसरून नसून ते केवळ बुद्धीच्या दृष्टीचे आहेत. हा बुद्धिवादी ‘मी’ विश्वअहंकाराचा म्हणजे सत् चित् आनंदरूपी ‘ब्रह्मा’चाच एक लहानसा प्रतिसाद नव्हे काय?
ईश्वराची उत्पत्ती हे शब्द आस्तिक्यबुद्धीच्या माणसास विसंगत वाटतील; परंतु बुद्धिदृष्ट्या मानवी मनात ईश्वरासंबंधीच्या माणसास विसंगत वाटतील; परंतु बुद्धिदृष्ट्या मानवी मनात ईश्वरासंबंधीच्या कल्पना केव्हा व कशा उद्भवल्या असतील आणि त्यापुढे कसकशा परिणत होत गेल्या असतील, यांचे अनुमान ऐतिहासिकदृष्ट्या करता येण्यासारखे आहे.
मानवप्राणी या विश्वात नव्हता असाही पुष्कळ काळ गेला असेल आणि मानव नामशेष होऊनही हे विश्व अनंतकाल टिकू शकेल.
विषय «इतर»
परग्रहावरून येणारा देव
दिवाने सर्व जीवसृष्टी निर्माण केली, ती उत्क्रांतीतून विविधतेत परिवर्तित झाली नाही, या मताला रचनावादी, क्रिटाशनिस्ट मत म्हणतात. परंपरेने ते मत ख्रिस्ती धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांमध्ये दिसते, पण इतर धर्मांवर श्रद्धा असणाऱ्यांनाही ते मान्य असते.
आजकाल आपण पारंपरिक धर्मश्रद्धाळू रचनावादी नाही असे दाखवत काही जण इंटेलिजंट डिझाइनवादी नावाचे एक मत मांडतात. पृथ्वीवरील जीवसृष्टी कोण्या तरी बुद्धिमान जीवाने किंवा शुद्ध बुद्धीने योजनाबद्ध रीतीने घडवली, ती उत्क्रांतीतून घडलेली नाही, असे हे इंटेलिजंट डिझाइनवादी मत आहे. परग्रहांवरील काही जीवांनी पृथ्वीवर जीवसृष्टी पेरली असणे, या कल्पनेभोवती इं.डि.वाद्यांचा
श्रद्धा धार्मिकांचा प्लॅसिबो
श्रद्धेचा रिमोट वापरून एक बारीकसा खडासुद्धा आपोआप एक सेंटिमीटरसुद्धा पुढे सरकता येणार नाही. पण श्रद्धा असल्यास डोंगरसुद्धा चालत येऊ शकतो असी बढाई मारणारे भरपूर जण आहेत. श्रद्धेमुळे काही नाट्यपूर्ण घटना घडतात असे छातीठोकपणे सांगणारे अनेक लोक आपल्याला नेहमी भेटत असतात. गंगेचे पाणी पिण्यामुळे अनेक दुर्धर रोग बरे झाले आहेत, असे सांगणारे लोक आपल्याला नक्कीच भेटले असतील. पार्वतीमाने पोटावर हात फिरवल्यानंतर बाईची पाळी चुकली, व पोट दिसण्याइतपत पुढे आले, असे सांगणाऱ्या शेकडो बायका महाराष्ट्र गुजरात येथे सापडतील. शेवटी पोटात मूल नव्हतेच हा भाग वेगळा.
कटु गोडल्याचा ‘हर्ष’
मी आगळा वेगळा माई
न्यारीच जिंदगानी
माहे मरण आहे खरं अवकानी
पाणी काया
जमिनीतला कापूस, मले हरिक
कवितेचा त्याच्या मुईले
गोळवा, गोड उसाच्या पेराचा
माह्या मरणाले कोणी म्हणतील येळा
देह टांगता ठेवला, जसा फुलोऱ्यातला कानोला
श्रीकृष्ण कळंब
[(१) माझी, (२) अवकाळी, (३) काळ्या, (४) हर्ष, (५) मुळीला, (६) गोडवा, (७) वेडा, (८) काही पूजांमध्ये करंज्या वगैरे एका चौकटीला लावलेल्या ‘हुकां’ना (फुलोऱ्याला) टांगतात, ती प्रतिमा इथे वापरली आहे.]
[मार्च २००८ च्या उत्तरार्धाच्या अवकाळी पावसानंतर अकोल्याजवळील ‘बाभुळगाव (जहांगीर)’ येथील श्रीकृष्ण कळंब या शेतकऱ्याने आपल्या मूर्तिजापूर येथील बहिणीच्या घरात गळफास लावून, टांगून, आत्महत्त्या केली.
(ग) जातः एका राष्ट्रात दुसरे राष्ट्रः रक्तविहीन क्रांतीसाठी कृती
‘अखंड हिंदु समाज’ हा एक भ्रम असून त्यातील जात मात्र वास्तव आहे. हीच वास्तवता बिहार व उत्तर प्रदेश या राज्यांत प्रकर्षाने जाणवत आहे. राजकीय क्षेत्रात जातीचे प्राबल्य वाढत असून राजकीयरीत्या प्रतिनिधित्व नसलेल्या जाती समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला एकाकी पडत आहेत.
‘जात हेच राष्ट्र’ असे निःसंदिग्धपणे वक्तव्य करणारे, ‘ए नेशन विदिन नेशन’ या पुस्तकाचे लेखक, व्ही.टी.राजशेखर एका महत्त्वाच्या विषयाकडे वाचकांचे लक्ष वेधू इच्छितात. त्यांच्या मते जात हाच रक्तविहीन क्रांतीकडे घेऊन जाऊ शकणारा एकमेव मार्ग आहे. भारतीय मानववंशाच्या एका सर्वेक्षणाच्या अहवालानुसार आपल्या देशात सुमारे २८०० जाती व उपजाती आहेत.
(घ) सेमिनार मासिकाचे आरक्षण व दलित विशेषांक
कोणताही एक विषय खोलात जाणून समजावून घ्यायचा असेल तर अशा विषयावर वेगवेगळ्या अभ्यासकांची (scholars) व त्या त्या विषयातील तज्ज्ञांची मते एकत्र मांडून चर्चा केली जाते. सेमिनार हे दिल्लीहून प्रकाशित होणारे असेच एक मासिक आहे जे दर महिन्याला एक विषय ठरवून तज्ज्ञांचे लेख एकत्र प्रसिद्ध करत असते. जात-आरक्षणाच्या संदर्भात या मासिकाने एकूण चार विषयांवर चर्चासत्रे घडवली आहेत. ते विशेषांक असे
१) आरक्षण डिसेंबर १९८१
२) दलित नोव्हेंबर १९९८
३) आरक्षण आणि खाजगी क्षेत्र मे २००५
४) दलित दृष्टिप्रांत (perspective) फेब्रु. २००६
१९८१ साली प्रसिद्ध झालेला आरक्षण विशेषांक मंडल आयोगाच्या शिफारशी ओ.बी.सी.ना
ओबीसी आणि आरक्षण
मार्क गॅलेंटर यांनी आपल्या ‘Who are the Other Backward Classes?’ या लेखात भारतीय परिस्थितीत मागासवर्गीय या संकल्पनेचे दहा विविध अर्थ मांडले आहेत. यात अस्पृश्य जाती ते जातिविरहित चाचण्या पूर्ण करणाऱ्या सर्व व्यक्ती अशांचा समावेश होतो.
भारतीय संविधानातील ‘सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले – (Socially and Educationally Backwards SEBC) म्हणजेच इतर मागासवर्गीय (Other Backward Classes OBC) होत. देशपातळीवरील व राज्यपातळीवरील विविध आयोग आणि समित्या यांतून या समाजघटकाच्या निश्चितीसाठी विविध निकष लावले गेले. या सर्वांचा शेवट मंडल आयोगापर्यंत आलेला दिसतो. (त्यानंतरही राष्ट्रीय पातळीवरील मागासवर्गीय कमिशन, राज्य मागासवर्ग कमिशन यांचेही प्रयत्न चालू राहिले); तथापि मंडल आयोग हा ओबीसींच्या राष्ट्रीय पातळीवरील निश्चितीचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
सीमांतापासून सीमांतापर्यंत दलित
समकालीन वादविवादांमध्ये उपेक्षित वर्गांच्या (disadvantaged groups) सामाजिक बहिष्कृतीची आणि समाजातील मुख्य प्रवाहाच्या बाहेर असण्याची (marginalisation) चर्चा वारंवार होते. बहिष्करणाच्या ह्या चर्चेने पूर्वी वापरात असलेले शोषण, वर्चस्व आणि दडपणूक हे शब्द मागे टाकले आहेत. बहिष्कृती आणि marginalisation ला प्रतिक्रिया म्हणून वेगळ्या संज्ञा प्रचलित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. उदा. अधिकाराचा आग्रह (entitlement), सबलीकरण (empowerment) आणि सामाजिक समावेशन (Social inclusion). काही वेळा ह्या शब्दांच्या ऐवजी marginlisation हा शब्द अनेक विद्वान वापरतात. Marginalisation च्या इतक्या विविध संदर्भात केलेला वापर पाहता त्या शब्दाची व्याख्या करण्याची आवश्यकता आहे.
अराजक की आरक्षण?
केंद्रीय मनुष्यबळविकासमंत्री अर्जुन सिंग यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात इतर मागासवर्गीयांना (ओ.बी.सी.) केंद्रीय शैक्षणिक संस्थांबरोबरच आय.आय.टी., आय.आय.एम. व वैद्यकीय महाविद्यालयांत २७% आरक्षण देण्याची घोषणा केल्यापासून, राष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमे आरक्षण-विरोधाचा टाहो फोडू लागली आहेत. तथाकथित गुणवत्तेच्या सिद्धान्तावर विश्वास ठेवणारी उच्चवर्णीय बुद्धिवंत मंडळी केवळ अर्जुन सिंग यांच्यावरच नव्हे, तर इतर एकूण आरक्षणाच्या धोरणावरच शरसंधान करू लागली आहेत. उच्चवर्णीय वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आरक्षणाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. ऐतिहासिक काळापासून दबल्या गेलेल्या समाजासोबत सरकारी शैक्षणिक सुविधा वाटून घेण्यास उच्चवर्णीय युवा वर्ग का तयार नाही? आरक्षणाच्या धोरणामुळे आपल्या कुटुंबातील आणि जातीतील पुढच्या पिढ्यांच्या जागा कमी होण्याची भीती त्यांना वाटत आहे.
सामाजिक समानता व सामाजिक न्याय
संपत्तिवाटप, संधी, वंश, जात, धर्म, उच्च-नीच फरक, इत्यादी विषयांतील विषमतेचे निर्मूलन करून कुठलाही भेदभाव नसलेल्या वर्गरहित समाजाकडे वाटचाल करणे सामाजिक समतेत अभिप्रेत आहे. सामाजिक न्याय आणि सामाजिक समता ह्या एकसारख्या असलेल्या संकल्पना आहेत.
काही जणांचे ऐषारामी जीवन व इतरांचे मात्र वंचित आयुष्य हे समानतावाद्यांना (egalitarians) पूर्णपणे अमान्य आहे. आयुष्याला आकार देणाऱ्या मूलभूत सोई-सुविधा सर्वांसाठी उपलब्ध असायला हव्यात. माझा शेजारी उपाशी असताना, पुरणपोळीचे जेवण करण्याचा मला अजिबात हक्क नाही. वेगवेगळे सामाजिक स्तर असलेल्या पिरॉमिडसारख्या व एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या गटागटांत विखुरलेल्या समाजाऐवजी बंधुभाव असलेल्या एकसंध समाजाची अपेक्षा समानतावादी करत आहेत.