[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या णीळश्रळीरीळरपळीी चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]
प्रकरण ४: उपयोगितेच्या सिद्धान्ताची कोणत्या प्रकारची सिद्धी शक्य आहे?
अंतिम साध्यांविषयीच्या प्रश्नांची सामान्यपणे स्वीकृत अर्थाने सिद्धी शक्य नसते असे यापूर्वीच म्हटले गेले आहे. युक्तिवादाने सिद्धी अशक्य असणे ही गोष्ट सर्व मूल सिद्धान्तांना समान आहे, ज्ञानाच्या आदिसिद्धान्ताला तसेच आचाराच्या आदिसिद्धान्तालाही. परंतु यांपैकी पहिले वास्तवविषयक असल्यामुळे त्यांच्याविषयी वास्तवविषयक अवधारणांच्या शक्तींना इंद्रिये आणि आंतरसंज्ञा यांना साक्षात् आवाहन करणे शक्य आहे.