Category «इतर»

कितपत तेजस्वी भारत

निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करून महिना-दीड महिना केंद्र सरकारतर्फे रेडिओ, दूरदर्शन, प्रसारमाध्यमांतर्फे होणारा प्रचार थांबला आहे. हा प्रचार ‘अवास्तव, अतिरेकी, आक्रमक होता.

खरे पाहता नव्या आर्थिक सुधारणांचा पाया 1980-90 च्या दशकात आणि नंतर राजीव गांधी आणि नरसिंह राव शासनाने घातला. संगणकतज्ज्ञ सॅम पित्रोडा यांचे व इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सल्ला यानुसार साक्षरता मोहीम, दूरसंचार मोहीम आदी पाच मोहिमा सुरू करून कामास गती आणि दिशा दिली गेली. 1984-89 व नंतर 1991-96 या दहा वर्षांत आजच्या ‘भारत उदया’ची पायाभरणी झाली, सातत्याने प्रयत्न झाले आणि 1998-99 मध्ये असा ‘भारत उदय’ विकसित झालेला देश भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या शासनाखाली आला.

पुढे वाचा

मनुष्यस्वभाव : एकीतली विविधता

आपण आपल्या भूतकाळाने घडवलेले असतो-डार्विनच्या उत्क्रांतीबाबतच्या मांडणीत ही एक कळीची संकल्पना आहे. आपण देवाने आपल्याला घडवले असे न मानताही आपण घडवले गेलेलो आहोत असे मानू शकतो. आपल्या पूर्वजांच्या पुनरुत्पादनाच्या (प्रजननाच्या) निवडीतून आपण अजाणताच काही विशिष्ट जीवनशैलीसाठी घडवले जातो. एका सामाजिक, द्विपाद, मूळच्या आफ्रिकन कपीच्या आयुष्यक्रमासाठी मानवी स्वभाव घडलेला आहे. अशीच माणसाची पचनसंस्थाही एका सर्वाहारी, मांसाहाराची चटक असलेल्या आफ्रिकन कपीसाठी घडलेली आहे.

या माझ्या सुरुवातीने दोन प्रकारची माणसे चिडली असणार. ज्यांना एका दाढीवाल्या माणसाने सांत दिवसांत हे जग घडवले असे वाटते, आणि याचे उपप्रमेय म्हणून मनुष्य- स्वभाव निवडीतून नव्हे, तर त्या दाढीवाल्याच्या बुद्धीने घडला असे वाटते, त्यांना माझे अभिवादन.

पुढे वाचा

नको तिथले खाजगीकरण

चीनच्या हुनान प्रांतातले क्षिनमिन हे हजारभर वस्तीचे खेडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गोड्या पाण्यातल्या गोगलगाईंमुळे पसरणाऱ्या शिस्टोसोमिॲसिस या रोगाने गावातील सारे ग्रस्त आहेत. गोगलगाईंमधून एक परजीवी कृमी शरीरांत शिरते, यकृतात आणि मूत्राशयात अंडी देते आणि रक्ताबरोबर मेंदू आणि मज्जारज्जूत जाऊन स्थिरावते. मूत्रपिंडे निकामी होतात, अर्धांगवायू होतो आणि अखेर वेदनामय अकाली मृत्यू ओढवतो. वांग झिंकुनला तीन वर्षांपूर्वी लागण झाली. त्याने 4,830 डॉलर्सची (सुमारे सव्वा दोन लाख रुपये) आपली पुंजी औषधोपचार आणि शस्त्रक्रियेने अंडी व कलिका काढून टाकण्यात खर्च केली. आता पुन्हा शस्त्रकियेची गरज आहे, पण 45 वर्षांच्या वांगकडे पैसे नाहीत.

पुढे वाचा

मनकवडे- ‘मनांधळे’

माणसे स्वभावतःच मनकवडी असतात. इतरांचे मनोव्यापार कल्पनेने तपासण्याचे माणसांचे कौशल्य हे भाषेचा वापर किंवा बोटांपुढे आणता येणाऱ्या अंगठ्याच्या दर्जाचे मानवी वैशिष्ट्य आहे. ते इतक्या सहजपणे आपण वापरत असतो की तसले काही कौशल्य आहे हेच आपल्याला सुचत नाही. पण चार वर्षांच्या मुलाचे या क्षेत्रातले कौशल्य बहुतांश प्राण्यांमध्ये आढळत नाही. आपण जगात येतो तेच ‘इतर मनांचे आराखडे’ घडवत आणि सामाजिक प्रतिसादांप्रमाणे आराखडे बदलून घेत.

1980-90 च्या दशकाच्या मध्याजवळ सायमन बॅरन कोहेन या ब्रिटिश मानसशास्त्रज्ञाने काही सहकाऱ्यांसोबत लहान मुलांच्या मनकवडेपणाबद्दल एक महत्त्वाचा प्रयोग केला.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

डॉ. निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, माथेरान रोडजवळ, नेरळ, रायगड – 410101 (10-03-2004) पृ. 489 वरील परिच्छेद 3 मधील आध्यात्मिकांच्या दाव्यातील एक भाग “…आत्माच… भौतिक गोष्टींचे नियंत्रण करतो….” सिद्ध झालेला नाही. तर्काला किंवा मानवी संवेदनांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जाणविणारी वस्तू अशी भौतिक वस्तूची व्याख्या आहे. म्हणूनच, भौतिक उपकरणांना न जाणवणाऱ्या आत्म्याचे अस्तित्व आत्म्याच्या व्याख्येमुळे कधीही मान्य केले जाणार नाही. त्यासाठी प्रयोगाचीही गरज नाही. चांगल्या वैज्ञानिक कल्पनेचे (hypothesis) दोन अत्यावश्यक गुणधर्म असे की तिच्यामध्ये किमान घटक (factor) असतात आणि तिला तपासणारा प्रयोग त्या कल्पनेमध्येच सुचविलेला असतो.

पुढे वाचा

पाण्याचे व्यवस्थापन आणि कायदेकानू (भाग २)

“माती धरून ठेवा, पाणी अडवा आणि जमिनीत मुरवा” हा आजकालचा मंत्र झाला आहे पण त्याला म्हणावा तसा जोर येत नाही. पाणलोटक्षेत्र संवर्धन (Catch- ment area Management) आणि वनीकरण (Afforestation) यांनाही जोर येत नाही याला कारणे आहेत. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे एक प्रमुख कारण आहे. वनवासी गिरिजनांनी वृक्षसंपत्ती जपावी पण लाभ मात्र मैदानी लोकांचा अथवा जंगल खात्याचा व्हावा, हे बरोबर नाही. जपणाऱ्यांनाही समृद्धीचे आयुष्य का जगता येऊ नये? मुंबईने शहापूर तालुक्याचे पाणी ओढून आणावे पण शहापूर तालुक्यातील पाणलोटक्षेत्रांच्या संवर्धनाची जबाबदारी घेऊ नये, उलट धरणे गाळाने भरताहेत म्हणून ओरड करावी हे कितपत सयुक्तिक आहे?

पुढे वाचा

नैतिक बुद्धिमत्ता

सर्व पालकांना वाटते की आपली मुले आज्ञाधारक असावीत. त्यांना सिगरेट, दारू, अमली पदार्थ यांचे व्यसन असू नये. त्यांनी बाहेर मारामारी किंवा दंगेखोरपणा करू नये. त्यांनी नातेवाईकांशी व मोठ्यांशी आदराने वागावे. परंतु यासाठी नेमके काय करावे हे पालकांना समजत नाही. सदाचाराने कसे वागावे यासाठी कोणतेही नीतिनियम नाहीत. शाळेत मूल्यशिक्षणाचे पाठ गिरवून अनैतिक वर्तणुकीस आळा बसतोच असे नाही. मुलांना सारखे ‘हे कर’ आणि ‘ते करू नकोस’ असे सांगितल्याने मुलांमध्ये सदाचाराचा विकास होत नाही. मुले लहान असताना धाकाने एक वेळ ऐकतील. परंतु मोठे झाल्यावर लादले गेलेले नीतिनियम ती झुगारून देतात.

पुढे वाचा

राग आणि अभिव्यक्ती

श्री विजय तेंडुलकरांच्या वक्तव्यांवर नेहमीच वाद निर्माण होत असतात. असे का होत असावे, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. तेंडुलकर हे विचार करणारे व्यक्तिमत्त्व आहे. शिवाय ते मनाने अधिक संवेदनशीलही आहेत. त्यांनी मांडलेले मत किंवा व्यक्त केलेले विचार बुद्धीने व मनाने समजावून घ्यावे लागतात. त्यांच्या वक्तव्यांचा अर्थ, त्यांमागची भूमिका समजावून घेतली तरच समजते. ते केवळ कोरडे विचारवंत नाहीत. मनाने ते एक सर्वसामान्य माणूस आहेत. जेव्हा ते नरेंद्र मोदीचा खून करायला निघतात तेव्हा ते खराखुरा खून करायला निघतात, असे नाही. समजा त्यांच्या हातात खरोखरच बंदूक दिली तर ते नरेंद्र मोदींवर गोळ्या झाडतील काय?

पुढे वाचा

मन में है विश्वास..

डॉ. विश्वास कानडे ‘आजचा सुधारक’च्या उत्पादकांपैकी एक होते. गेल्या जानेवारीच्या 29 तारखेला ते अनंतात विलीन झाले. त्यांचे ‘देहावसान’ झाले म्हणावे की नुसते ‘निवर्तले’ असे म्हणावे असा क्षणभर मला प्रश्न पडला होता. तसे पाहिले तर ‘दिवंगत’ किंवा त्याहीपेक्षा ‘कैलासवासी’ हा शब्द त्यांच्या निर्वाणला समर्पक झाला असता. कानडे भाषाशिल्पाचे चिकित्सक उपासक होते. ते नुसते कुशल पाथरवट – पथुरिया नव्हते, शिल्पी – शब्दशिल्पी होते. त्यांचे मन शब्दलोभी, शिक्षण शब्दानुशासन जाणणारे आणि वळण जपणारे होते. एक शब्द जरी सम्यक जाणला, सम्यक योजला तरी इह- परलोकी कामधेनू ठरतो असे मानणारी एक भारतीय परंपरा त्यांना आपली वाटे.

पुढे वाचा

बौद्ध धर्माविरुद्ध बंड, मनुस्मृती व जातिसंस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 साली न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात एक शोधनिबंध वाचून हिंदुसमाजातील सतीची चाल, पुनर्विवाहबंदी व बालविवाह ह्या प्रथा जातिव्यवस्था बळकट करण्यास्तव उत्पन्न केल्या गेल्या असे विचार मांडले होते. याचा उल्लेख कुमुदिनी दांडेकरांनी त्यांच्या सतीची चाल बालविवाह, या (आ.सु., जुलै 2003), या लेखात केला. जातिभेदामुळे भारतीय समाज पोखरून गेला, लोकांत एकीची भावना राहिली नाही व त्यामुळे बाहेरील शत्रूंनी त्यांचा नेहमीच पराभव केला, या परिस्थितीची जाणीव महाराष्ट्रात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, इतर पुढाऱ्यांपेक्षा जास्त करून, त्यास खरी धार लावली.

सतीची चाल, पुनर्विवाहबंदी व बालविवाह ही पापे (!)

पुढे वाचा