प्रोब अहवालाची एक विस्तृत प्रस्तावना डिसेम्बर २००० च्या आ.सु.च्या अंकात प्रसिद्ध केली होती. उरलेल्या अहवालाचा संक्षेप करताना जाणवले की अहवालातील प्रत्येक मुद्दाच नव्हे तर त्या मुद्द्यांचा विस्तारसुद्धा महत्त्वाचा आहे त्यामुळे त्या सगळ्याचा गोषवारा एक लेखात उरकणे हे फार कठीण काम आहे. म्हणून लेखांची संख्या वाढवायचे ठरवले. तरीही आकडेवारी, तक्ते आणि असंख्य उदाहरणे – ज्यामुळे ह्या अहवालाला एक विश्वसनीयता प्राप्त झाली आहे – ह्या सर्व गोष्टींना सारांशामधे जागा देता येत नाही ही मर्यादा लक्षात घेऊन आ.सु.च्या वाचकांनी प्रोबचा संपूर्ण अहवाल मुळातून वाचावा असा आग्रह आहे.
विषय «शिक्षण»
प्रोब-पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया (भाग १)
पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने १९९९ मध्ये प्रसिद्ध केलेला अहवाल हातात आला तेव्हा त्याच्या दोन वैशिष्ट्यांमुळे तो वाचण्याची उत्सुकता वाढली. एक म्हणजे हा सरकारी कमिटीने सरकारसाठी ‘बनवलेला’ अहवाल नव्हता तर काही जागरुक संशोधकांनी सेंटर फॉर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स ह्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील विभागाच्या मदतीने भारतीय नागरिकांसाठी तयार केलेला भारतातील प्राथमिक शिक्षणाच्या अवस्थेचा अहवाल होता. ह्या अहवालाचे दुसरे वैशिष्ट्य हे होते की ह्यातील स्पष्टी करणे आणि विश्लेषणे ही निरीक्षणांवर आणि ‘लोक काय म्हणतात’ ह्यावर आधारलेली होती आणि हे लोक होते शिक्षक, पालक आणि मुले.
सामाजिक शास्त्रांच्या अध्यापनातील परंपरानिष्ठता
सांप्रत कला शाखेतील एकूणच परिस्थिती चिंताजनक आहे असा अनुभव येऊ लागला आहे. कलाशाखेत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे याचे मुख्य कारण कला शाखेची आवड हे नसून या विषयांत बी. ए., एम्. ए. केल्यावर बी. एड्., एम्. एड्. केले तर शाळेत शिक्षकाची नोकरी मिळण्याची जास्त शक्यता आहे हे होय. कला शाखेत संशोधन करण्याची आवड, हा उद्देश क्वचितच आढळतो आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारखी काही। नामवंत विद्यापीठातील कला शाखेची स्थिती याला अपवाद आहे. कला शाखेतही तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी. ए., एम्.
दुबळी माझी झोळी!
वेताळ विक्रमादित्याच्या खांद्यावरून बोलता झाला : “राजा, तू मोठा विचारवंत आहेस. आपल्या प्रजेचे हित, न्याय, समाजव्यवस्था, मानवांचा स्वतःची उन्नती करायचा मूलभूत हक्क, असल्या विषयांवरची तुझी विवेकी, मानवतावादी आणि उदार मते सर्वांना माहीत आहेत. परंतु मला नियतीने नेमून दिलेले काम आहे, ते तुला गोंधळात टाकण्याचे. याच उद्देशाने मी तुला एक घडलेली घटना सांगतो. या घटनेसारख्या घटना घडू नयेत असे सर्वांनाच वाटते, ही माझी सुद्धा खात्री आहे. तर माझ्या कहाणीच्या शेवटी तू सांगायचे आहेस, की असल्या घटना कशा टाळाव्या. तुला नेमके उत्तर सांगता आले, तर मी माझ्या शिराचे सहस्र तुकडे करून ते एकेक करून तुझ्या चरणी-वाहीन.
उत्तमतेच्या समर्थनार्थ
पुढील लेख एका अमेरिकन लेखकाने अमेरिकेतील शिक्षणाविषयी लिहिलेला आहे. परंतु तो भारतातील शिक्षणविषयक परिस्थितीलाही तितकाच लागू आहे हे वाचकांच्या लक्षात येईल.
संपादक
‘Tinic’ साप्ताहिकाच्या २९ ऑगस्ट १९९४ च्या अंकात एका पुस्तकाचा काही भाग प्रसिद्ध झाला आहे. पुस्तकाचे नाव आहे ‘In Defense of Elitism’ आणि लेखक आहे William A. Henry III. हेन्री ‘टाईम’मध्ये रंगभूमीबद्दल नियमित समीक्षात्मक लिखाण करीत असत. हे त्यांचे पुस्तक अमेरिकन समाजाबद्दल आहे आणि त्यांच्या अकाली निधनानंतर ते नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. पुस्तकाची आणि लेखकाच्या वैचारिक दृष्टिकोणाची प्राथमिक ओळख करून देताना म्हटले आहे, “माणसाच्या ज्या बौद्धिक गुणांना हेन्री महत्त्वाचे मानत त्यांच्या सध्या होत असलेल्या कोंडीचा ते निषेध करतात.
महाविद्यालयांतील प्रवेशांच्या निमित्ताने
८ ऑगस्ट १९९३ च्या लोकसत्ताच्या अंकामध्ये प्रदीप कर्णिक आणि विजय तापस ह्यांचा एक लेख आला आहे. विषय आहे – महाविद्यालयीन प्रवेशाचे राजकारण’. तो वाचून मला ही महाविद्यालये कशाला हवी आणि एकूणच शिक्षण खरोखरच कशासाठी हवे असा प्रश्न पडला.
१० वी च्या परीक्षा झाल्या आणि निकाल प्रसिद्ध झाले की महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी पास झालेली मुले आणि त्यांचे आईबाप ह्यांच्या चकरा सुरू होतात. हर प्रयत्नाने प्रवेश मिळविला जातो. वशिला, चिठ्ठी, फोन, ओळख ह्या सामनीतीने काम भागले नाही तर दामनीतीचा अवलंब करण्यात येतो. तेवढ्यानेही भागले नाही तर राजकीय पक्षांचे दबाव, स्थानिक नेतृत्वाचा हस्तक्षेप, मंत्रालयातून आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून फोन, एवढेच नव्हे तर दादागिरी म्हणजे दमदाटी किंवा प्रत्यक्ष मारहाणीपर्यन्तसुद्धा मजल जाते.