मासिक संग्रह: मार्च, १९९३

संपादकीयांविषयी

आजचा सुधारकच्या नोव्हेंबर-डिसेंबर १९९२ च्या अंकातील दोन्ही संपादकीयांविषयी काही प्रतिक्रिया येथे नोंदवू इच्छितो.
(१) डॉ. रूपा कुळकर्णी यांच्या संदर्भातील संपादकीय
आजचा सुधारक हे विवेकवादाला वाहिलेले मासिक आहे याचा अर्थ धर्म स्वीकारणाच्या व्यक्ती संपादक वा सल्लागार राहू शकत नाहीत असा करणे अविवेकी आहे. अंतिमतः ईश्वराच्या एक ना एक स्वरूपाच्या अस्तित्वाच्या स्वीकारावर धर्माची उभारणी होते असे मानले तरी, निरपवादपणे असा स्वीकार ऐहिक जीवनात विवेकनिष्ठा नाकारण्यात परिणत होतो असे मला दिसत नाही. आधुनिक विज्ञानाच्या चौकटीत ईश्वराचे अस्तित्व नाकारणे बंधनकारक नाही. बौद्धिक तर्काच्या आधारे ईश्वराचे आस्तित्व सिद्ध करता येत नसले तर ईश्वर नावाची शक्ती नाहीच असेही ‘सिद्ध करता येत नाही.

पुढे वाचा

चर्चा – निसर्ग आणि मानव

प्रा. दि. य. देशपांडे यांच्या निसर्ग आणि मानव (आजचा सुधारक नोव्हें.डिसें. ९३) या लेखात त्यांना म्हणावयाचे आहे ते असे :
-१.-
चेतन-अचेतन असा फरक करण्याची कसोटी कोणती?माणसाला त्याच्या ठायीच्या चेतनेचा जसा स्वानुभव येतो, तिचे ज्या स्वरूपाचे आत्मभान त्याला असते तसा स्वानुभव येणे व आत्मभान भाषेद्वारा प्रकट करता येणे ही कसोटी मानली तर, प्रा. देशपांडे यांचे म्हणणे मान्य करण्यात कोणतीच अडचण नाही. पण ही कसोटी मानवकेंद्री (anthropocentric) आहे. भौतिक निर्जीव सृष्टीत चेतना कार्य करीत असते की नाही हे केवळ या स्वयंकेद्री कसोटीच्या आधारे ठरविणे सयुक्तिक आहे का?

पुढे वाचा

भोळे यांचे परीक्षण निराशाजनक

सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास या ग्रंथावरील श्री. भा. ल. भोळे यांचे परीक्षण उत्सुकतेने वाचायला घेतले. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका काहीशा दुर्लक्षित पैलूवर प्रकाश टाकणारा, स्वतंत्र दृष्टीने लिहिलेला हा संशोधनग्रंथ, आणि तोही एका ताज्या दमाच्या व नवोदित अभ्यासकाने लिहिलेला; त्यामुळे ही उत्सुकता वाटत होती. शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे प्रा. भोळे यांनी साधार खंडन केलेले असेल, ग्रंथातील निष्कर्षांचीही साक्षेपी समीक्षा त्यांनी मांडलेली असेल, असे वाटले होते. पण परीक्षण वाचून साफ निराशा झाली, आणि आश्चर्यही वाटले.
मोर्यांलच्या या संशोधनग्रंथाचा गाभा जाणून घेऊन तो वाचकांपुढे ठेवण्याऐवजी, लेखकाच्या आक्रमक भाषाशैलीचीच चर्चा यात अधिक आहे.

पुढे वाचा

चर्चा- विवेकवादी नीतीविचाराचे शिथिल समर्थन

प्रा. दि. य. देशपांडे यांनी आजचा सुधारकच्या सप्टेंबर आणि आक्टोबर १९९२ च्या अंकांतून क्रमशः विवेकवादातील नीतिविचाराच्या त्यांच्या मांडणीवर घेतलेल्या आक्षेपांची उत्तरे देण्याची बरीच खटपट केली आहे. त्या उत्तरांवरून विवेकवादाच्या नावाने पर चात्त्य विचारांनी भारलेल्या भारतीय विद्वानांनी भारतीय नीतिविचारांना उपहसत जे तर्क कौशल्य दाखविण्याची धडपड चालविली आहे, ते मुळात किती कच्चे, अपुरे आणि भ्रामक आहे याची साक्ष पटते. एक गोष्ट प्रथम नमूद करतो की प्रा. दि. य. देशपांडे यांची त्यांनी केलेल्या नीतिविचारांच्या मांडणीचा प्रस्तुत लेखकाने आपल्या मूळ लेखात जो संक्षेप दिला आहे त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही.

पुढे वाचा

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ३)

विधानांचे समर्थन तत्त्वज्ञानाच्या दोन प्रमुख कार्यापैकी पहिले कार्य म्हणजे विधानांचे समर्थन करण्याच्या प्रक्रियेची चिकित्सा. आपल्यासमोर येणार्याक कोणत्याही विधानाविषयी ते खरे आहे कशावरून?’ हा पहिला प्रश्न आपल्या मनात उद्भवतो. या प्रश्नाचे उत्तर देणे म्हणजे त्या विधानाचे समर्थन करणे.
एखाद्या विधानाचे समर्थन द्यायचे म्हणजे ते अन्य एका किंवा अनेक विधानांवरून अपरिहार्यपणे निष्पन्न होते असे दाखविणे. ती अन्य विधाने जर आपल्याला मान्य असतील आणि त्यावरून पहिले विधान निष्कर्ष म्हणून अपरिहार्यपणे निष्पन्न होते हेही आपल्याला मान्य असेल, तर ते विधान सिद्ध झाले असे आपण म्हणतो.

पुढे वाचा

स्त्री असुरक्षित आहे

हिंदू समाजात स्त्रीरक्षण – पुरुषाच्या कामवासनेपासून स्वसंरक्षण- हा महत्त्वाचा उद्योग स्त्रीला पुरातन काळापासून असावा, कारण त्या वासनेला संयम शिकविण्याचे प्रयत्न हिंदू संस्कृतीने केलेले नाहीत. ब्रह्मचर्याचा, तपस्येचा बडिवार करीत, वेश्याव्यवसाय हाच कुळधर्म असणाच्या कळवंत, नायक इत्यादी जाती हिंदू धर्माने निर्माण केल्या, इतकेच नव्हे तर कुळवंतांच्या पोरी देवदासींच्या स्वरूपात मंदिरामधून पोचविल्या व देवद्वाराचाही कुंटणखाना बनवून टाकला. घरच्या स्त्रियांवर देवादिकही पापी दृष्टी ठेवीत, असे आपली पुराणे सांगतात. कामसूत्रात कुलीन स्त्रीला वश करण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. बहुपत्नीकत्व होतेच, पण त्या स्त्रियांचे भरणपोषणही न करता चैन करण्याचा मार्ग बंगालच्या ‘कुलीन भूदेवांनी शोधून काढला.

पुढे वाचा

चर्चा- डॉ. के. रा. जोशी यांना उत्तर

डॉ. के. रा. जोशी यांच्या मूळ आक्षेपांना दिलेले माझे उत्तर त्यांना पटलेले नाही. आणि त्यांनी अनेक आक्षेप घेणारा एक लेख पाठविला आहे. त्याला यथामति उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.
त्यांचा पहिला आक्षेप असा आहे मी कांट आणि उपयोगितावाद यांची सांगड घालण्याच्या केलेल्या प्रयत्नावर. ते म्हणतात की त्या दोन उपपत्ती तमःप्रकाशवत् परस्परविरुद्ध असून त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणारा एकही नीतिमीमांसक झाला नाही. हे त्यांचे म्हणणे मान्य केले तरी त्यावरून असा समन्वय कोणाला जमणारच नाही असे सिद्ध होत नाही. निदान त्यांनी माझ्या प्रयत्नात काय दोष आहे ते सांगायला हवे होते.

पुढे वाचा