मासिक संग्रह: जानेवारी, १९९७

दीडशे वर्षांपूर्वीच्या रामजन्मभूमीचे वर्णन

“ …रामनवमीचे दिवसी असे तेथे माहात्म्य आहे की, दोन प्रहरी शरयू गंगेत स्नान करून रामजन्म ज्या जाग्यावर जाहालेला आहे तेथे जाऊन जन्मभूमीचे दर्शन त्या समई ज्यास घडेल त्यास पुनः जन्म नाही, असे श्रुतिस्मृति पुराणप्रसिद्ध आहे. म्हणोन सर्व लोक जन्म दिवसी मध्यान्ही स्नाने करून हातात तुलसी, पैसा-सुपारी घेऊन सर्व लोक जन्मभूमीचे दर्शन घेऊन तुलसी तेथे वाहातात. तेथे जागा असी आहे की, मोठे मैदान झाडीचे आहे. बहुत प्राचीन भिताडे दूर दूर आहेत. कौसल्येची खोलीची जागा पन्नास हात लांबी व चालीस हात रुंदीची असोन पक्का चुना सिसे ओतून चौथरा कंबरभर उंचीचा बांधून व दोन हात उंच फक्त कठडा मारिला आहे.

पुढे वाचा

सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण

गांधींना वाटले, ‘पॅसिव्ह रेझिस्टन्स’ या शब्दात न्यून आहे. ऐकणाराला ते निर्बलांचे हत्यार वाटते. त्यात द्वेषाला जागा आहे असे वाटते. शिवाय त्याची परिणती हिंसेतही होऊ शकेल. दक्षिणआफ्रिकेत आपण जो लढा उभारला त्याला काय म्हणावे या विचारात त्यांना आधी ‘सदाग्रह’ (सत्+आग्रह) आणि मग ‘सत्याग्रह’ हा शब्द सुचला. सॉक्रेटीस त्यांना जगातला पहिला सत्याग्रही वाटला.’इंडियन ओपिनियन’ या आपल्या पत्राच्या गुजराती भागात त्यांनी त्याची कथा सांगितली. त्याचे चरित्र आणि चारित्र्य यावर ६ भाग लिहिले. त्याच्या विचारसरणीतून आपल्याला नवसंजीवन मिळाले असे ते म्हणतात.

सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण हे श्री.

पुढे वाचा

नोकरी करणार्‍या महिलांची सुरक्षितता

आपल्या राज्यघटनेत स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व मान्य केले आहे. समाजाच्या सर्व क्षेत्रांत स्त्रियांचा शिरकाव झालेला आहे. प्रत्येक क्षेत्रात जिद्दीने काम करून त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. पण प्रत्यक्ष व्यवहारात महिलांचे स्थान, दर्जा पुरुषांच्या दर्जापक्षा कनिष्ठच गणला जात आहे. स्त्री नोकरीसाठी किंवा इतर कामासाठी घराबाहेर पडली. स्त्रीपुरुषांच्या मिश्र समाजात अनेक स्तरावर ती वावरू लागली तर तिला कसलाही धोका नाही काय व ती सुरक्षितपणे काम करू शकते काय?

६ ऑगस्ट ९६ रोजी श्री रूपन देओल बजाज यांनी १९८८ साली पंजाबचे पोलिस महासंचालक के.

पुढे वाचा

समान नागरी कायद्याचा मसुदा : एक चिकित्सा (१)

स्त्रीमुक्तीच्या आंदोलनाची उद्दिष्टे दोन आहेत. स्त्रीपुरुषांच्या सामाजिक दर्जामध्ये समानता आणणे व त्याचबरोबर सर्व स्त्रियांच्या एकमेकींच्या दर्जामध्ये समानता आणणे. सधवा/विधवा, प्रतिव्रता/व्यभिचारिणी ह्यांमध्ये आज जो फरक केला जातो तो आपल्या समाजाच्या पुरुषप्रधान विचारसरणीमुळे आणि स्त्रियांच्या पुरुषसापेक्ष स्थानामुळे होतो. त्यामुळे एकूणच स्त्रियांचे स्वातंत्र्य अत्यंत संकुचित होते, किंबहुना नष्टच होते, हे आपण लक्षात घेत नाही. आपण सगळे विचारांमध्ये इतके गतानुगतिक आहोत, इतके पूर्वसंस्काराभिमानी आहोत, की स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा संकोच कशामुळे होतो, त्यांना blackmail करण्याचे साधन आपण (म्हणजे त्यात स्त्रियासुद्धा आल्या) कसे सांभाळून ठेवतो, त्याला धक्का लागू देत नाही, हे आपल्या कोणाच्या लक्षातसुद्धा येत नाही.

पुढे वाचा

चार्वाक ते आगरकर आणि सद्यःस्थिती

प्रथमच सांगतो की, माझे एकुणच वाचन फार मर्यादित आहे आणि प्रतिपाद्य विषयाचे तर खूपच कमी आहे. तरी पण आगरकरांच्या चरित्रातून, लेखनातून उद्भवलेले काही विचार कुठेही, विशेषतः आगरकर विशेषांकात न आढळल्यामुळे हे टिपण. त्यानंतर काही आनुषंगिक विचार.
आगरकरांच्या विवेकवादाचे सूत्र पूर्वीच्या एखाद्या तत्त्वशाखेशी जोडायचे असल्यास ते चार्वाकमताशी जोडता येते. प्रत्यक्ष प्रमाणाने वा सार्वत्रिक अनुभवाने जाणवत असेल ते सत्य, बाकी सर्व असत्य, असे उभय विचारप्रणालीतील साम्य ढोबळमानाने सांगता येईल. जगाचे आदिकारण, मृत्यूनंतर काय, असले प्रश्न पुरेशा साधनांच्या अभावी गैरलागू ठरतात, असा अज्ञेयवाद दोघांनाही अभिप्रेत होता.

पुढे वाचा

आहे असा कवण तो झगडा कराया?

पु. ल. देशपांडे यांच्या कलेचे वैशिष्ट्य असे आहे ,की तिने जसा आणि जितका आनंद जीवनसंग्रामातल्या विजयी वीरांना दिला आहे तसा आणि तितकाच तो पराजितांना आणि पळपुट्यांनाही दिला आहे. जीवनात येणाऱ्या विसंगतीकडे त्यांनी विनोदबुद्धीने पाहायला आम्हाला शिकविले आहे. त्यामुळे ते सर्वांनाच आपले वाटत आले आहेत. टिळकांना जसे जनतेने आपल्या मर्जीने ‘लोकमान्य’ केले तसेच पुलनांही जनतेनेच ‘महाराष्ट्रभूषण’ मानले आहे. सरकारने केवळ या लोकमान्यतेवर राजमान्यतेची मुद्रा उठविली आहे इतकेच. तसे नसते तर ठाकरे यांनी क्षणिक शीघ्रकोपाच्या उद्रेकात जे असभ्य आणि अश्लाघ्य उद्गार काढले त्यावर अख्खा महाराष्ट्र प्रक्षुब्ध सागरासारखा खवळून उठला नसता आणि ठाकरे यांनी कितीही नाही म्हटले तरी जनक्षोभासमोर ते जे तूर्त मूग गिळून बसले आहेत तसे, चूप ते बसले नसते.

पुढे वाचा

औद्योगिक क्रान्तीचे पडसाद

१९ व्या शतकातील व्हिक्टोरियन वाङ्मयाचा अभ्यास करताना नेहमी जाणवायचा तो त्याची पार्श्वभूमी पूर्णपणे व्यापून टाकणारा औद्योगिक क्रांतीचा प्रचंड बॅकड्रॉप. राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक, साहित्यिक इ. कुठलेही क्षेत्र त्याच्या सर्वव्यापी प्रभावापासून मुक्त नव्हते. १९ वे शतक हा सर्वार्थाने स्थित्यंतराचा काळ. व्हिक्टोरिया राणीच्या स्थिर आणि खंबीर राजवटीच्या खांबाभोवती हे बदलाचे गोफ विणले गेले. प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे ह्या सगळ्या बदलांमागचे महत्त्वाचे कारण होते औद्योगिक क्रांती.

तांत्रिक-औद्योगिक क्षेत्रातील तसेच आर्थिक, सामाजिक, राजकीय वगैरे क्षेत्रांतील हे बदल आमूलाग्र स्वरूपाचे होते. त्यांचे क्रांतिकारक स्वरूप लक्षात येण्याच्या आधीच माणसे ओळखीच्या जगातून अनोळखी जगात लोटली गेली होती.

पुढे वाचा

अज्ञेयवाद – एक पळवाट

ईश्वराच्या अस्तित्वाचे कसलेही प्रमाण सापडत नाही. त्याच्या अस्तित्वाच्या सिद्धयर्थ केले गेलेले सर्व युक्तिवाद सदोष असून अनिर्णायक आहेत, असे दाखवून दिल्यावर ईश्वरवाद्यांचा पवित्रा असा असतो की, ईश्वर आहे हे जसे सिद्ध करता येत नाही, तसेच तो नाही हेही सिद्ध करता येत नाही आणि म्हणून आम्ही या प्रश्नाच्या बाबतीत अज्ञेयवादी आहोत. अज्ञेयवादी असणे ही प्रतिष्ठेची भूमिका आहे आणि ती स्वीकारणे तत्त्वज्ञाला शोभणारे असून विवेकाला धरून आहे, असे मानले जाते. म्हणून याबाबतीत खरी गोष्ट काय आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी आपल्याला असे दिसते की अज्ञेयवादाला श्रद्धा स्वीकरणीय असते, एवढेच नव्हे तर ती आवश्यक आहे असेही म्हणता येईल.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस
आपल्या जुलै-ऑगस्टच्या अंकाचे अभ्यागत संपादक श्री. सत्यरंजन साठे यांचे अभिनंदन. समृद्ध, वाचनीय लेखांबद्दल आणि त्यांच्या स्वतःच्या विस्तृत लेखातील सुबोध मांडणीबद्दल. या विषयांशी अपरिचित असल्यामुळे असेल, मला दोन शंका पडल्या. पृ. १४८ वर ‘बोम्मई वि. भारत’ खटल्यात (भा.ज.प. सरकारे यांच्या) बडतर्फीचा हुकूम अवैध ठरवावा लागला नाही, पण वैध म्हणून त्यावर शिक्कामोर्तब करायचेही टाळता आले.’ हे कसे काय?जे अवैध नाही ते वैधठरते. मग या लिहिण्याचा अर्थ?दुसरे शंकास्थळ पृ. १४६ वर, न्यायालयाने बोम्मई वि. भारतआणि फारुकी वि. भारत या दोन्ही खटल्यांत कोणता आक्षेप तपासला?पहिल्यात

पुढे वाचा