मासिक संग्रह: मे, १९९७

पत्रव्यवहार

आस्तिकता आणि विज्ञान
– हेमंत आडारकर
जानेवारी ९७ च्या अंकातील प्रा. ठोसर यांचा ‘कार्ल पॉपर आणि जॉन एकल्स…’ हा लेख आणि मार्च ९७ च्या अंकातील दि. य. देशपांडे यांनी लिहिलेला, ‘प्रा. ठोसर, प्रा. एकल्स …’ हा लेख वाचून मनात आलेले विचार आजचा सुधारकच्या वाचकांपुढे मांडावेत ह्यासाठी हा लेखनप्रपंच.
आस्तिकता आणि विज्ञान ह्या परस्परविरोधी गोष्टी आहेत असे गृहीत धरणे बरोबर नाही. माझा स्वतःचा विज्ञानक्षेत्रातला दहा वर्षांचा अनुभव आणि अवांतर वाचन जर गाठीशी धरले तर एक वेगळीच स्थिती समोर येते. वैज्ञानिक पेशा आणि आस्तिकता ह्यांचा घनिष्ठ संबंध दिसतो.

पुढे वाचा

आमच्या मुलीच्या लग्नाची गोष्ट

काही दिवसापूर्वी आमच्या मुलीचेलग्नझाले. विवाहसमारंभअगदी सुटसुटीत घरगुती पद्धतीने केला. परंतु आप्तेष्टांना मुलामुलीची माहिती, लग्नाची खबर देऊन त्यांच्या शुभेच्छांची, आशीर्वादाची आवर्जून मागणी केली. हे विवाहसूचनेचे पत्र आमच्या एका स्नेहातल्या बाईंना इतके आवडले की त्यांनी त्याचा गोषवारा एका सांजदैनिकात प्रसिद्ध केला. परिणामी पाच-सहा फोन व चार-पाच पत्रे आली, काहींनी छापील पत्राची प्रतही मागितली. माझ्या एका मित्राने ही पत्रिकाच पुढे करून आपल्या मुलाचा विवाहही साधासुटसुटीत व्हावा यासाठी प्रयत्न केला! या सर्वांवरून लक्षात आले की आपल्या समाजात साधा सुटसुटीत विवाह हीसुद्धा समाजसुधारणा गणली जाते! विवाह ठरवितानाही आम्ही काही एक निश्चित विचारधारा डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला.

पुढे वाचा

धर्मनिरपेक्षतेला आव्हान!

धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? यासंबंधी स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणाच्या व्यक्ती आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये मतभेद आहेतच. पण स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणारे ज्यांना सांप्रदायिक समजतात त्या सांप्रदायिक जातिवादी शक्तीही स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात. यापुढे जाऊन त्यांचा तर असा दावा आहे की भारतातील स्वतःला पुरोगामी व धर्मनिरपेक्ष समजणारेच ‘स्युडो सेक्युलरिस्ट’ असून आपणच तेवढे खरेखुरे राष्ट्रवादी व धर्मनिरपेक्ष आहोत. यापुढे धर्मनिरपेक्षतेवरील चर्चा आपणाला पुन्हा पुन्हा त्याच आवर्तात अडकलेली दिसते. म्हणून या लेखात पुन्हा एकदा धर्मनिरपेक्षतेची तात्त्विक व व्यावहारिक अशा दोन्ही दृष्टिकोणातून चर्चा करण्याचे ठरविले आहे.
भारतीय राज्यघटनेला धर्मनिरपेक्षतेचा जो अर्थ अभिप्रेत आहे तशा अर्थी आज भारतीय लोकजीवनात धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे काय?धर्मनिरपेक्ष

पुढे वाचा

पुदुकोट्टाई – एक अनुभव

पुदुकोट्टाई हा एक तामिळनाडू राज्यातील जिल्हा. हा भारताच्या अगदी आग्नेयेला, बंगालच्या उपसागराला लागून आहे. अत्यंत मागासलेला जिल्हा. गरिबी, निरक्षरता अगदी भारतीय परिमाणानेही भरपूर. सामाजिक व आर्थिक विकासाला पूर्ण पारखा! अशा या जिल्ह्यात १९९० नंतर प्रौढ साक्षरतेसाठी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली.
प्रौढ साक्षरतेचा कार्यक्रम भारताच्या अंदाजे ४७० जिल्ह्यांत १९९० च्या सुमारास सुरू केला गेला. त्या अन्वये वेगवेगळ्या जिल्ह्यांनी प्रौढ म्हणून वेगवेगळे वयोगट कार्यक्रमाखाली घेतले. कोणी ९ ते ३५ वयोगट, कोणी १५ ते ३५ वयोगट, तर पुदुकोट्टाईमध्ये ९ ते ४५ वयोगट साक्षर करण्यासाठी निवडला.

पुढे वाचा

कलमी मानव (Human Clones)

पृथ्वीवरील जीवसृष्टीत तरी प्रजोत्पादनाचे अजून दोनच प्रमुख प्रकार ज्ञात आहेत. काही निम्नस्तरीय जीव वगळता, बहुसंख्य प्राण्यांचे लैंगिक प्रजनन, तसेच वनस्पतींतील लैंगिक आणि अलैंगिक (कलमी) प्रजनन हे ते प्रकार होत. सस्तन प्राण्यांसारख्या सर्वच उत्क्रांत जीवांमध्ये केवळ लैंगिक पद्धतीनेच प्रजोत्पादन शक्य आहे. परंतु अशा लैंगिक प्रजोत्पादनात पुढील पिढी आधीच्यापिढीच्या दोन जीवांच्या मिश्र गुणधर्माचीच असते. त्यामुळे अल्फान्सो (हापूस) आंब्याचे अथवा एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण गुलाबाचे शतप्रतिशत गुण असणारे नवे झाड उत्पन्न करणे जसे सुलभ होते तसे सस्तन प्राण्यांच्या बाबतीत आतापर्यंत अशक्यच होते. परंतु एखाद्या प्राण्याची शतप्रतिशत प्रत (copy) तयार करण्याचे स्वप्न मात्र आधुनिक जीवशास्त्रज्ञ फार पूर्वीपासूनच पाहत होते.

पुढे वाचा

आस्तिकता आणि विज्ञान

याच अंकात पत्रव्यवहारात वरील विषयावर तीन पत्रे आली आहेत. पत्रलेखकांपैकी एक तर चक्क वैज्ञानिक आहेत असे ते स्वतःचसांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या मताला विशेष महत्त्व असणार!
डॉ. हेमंत आडारकर हे ते पत्रलेखक. विज्ञानक्षेत्रातील संशोधनाचा दहा वर्षांचा अनुभव . त्यांच्या गाठीशी आहे. टाटा मूलभूत संशोधनसंस्थेत त्यांनी दहा वर्षे भौतिकीत संशोधन केले आहे. तेव्हा बघू या ते काय म्हणतात ते.
ते म्हणतात ‘आस्तिकता आणि विज्ञान परस्परविरोधी गोष्टी आहेत असे गृहीत धरणे बरोबर नाही. उलट ‘वैज्ञानिक आणि आस्तिकता यांचा घनिष्ठ संबंध आहे. या मताच्या पुष्ट्यर्थ ते काय पुरावा देतात?ते

पुढे वाचा

इतरांच्या मताबद्दल आदर

मला जे तत्त्व शिकवायचे आहे, ते स्वैर स्वेच्छाचाराचे नाही. पारंपरिक मतात अभिप्रेत असतो, जवळपास तितकाच आत्मसंयम त्यात अवश्य आहे. परंतु त्यात संयम इतरांच्या स्वातंत्र्यात ढवळाढवळ न करण्याकरिता वापरावा लागेल, आपले स्वातंत्र्य कमी करण्याकरिता नव्हे. आरंभापासून योग्य शिक्षण मिळाल्यास इतरांचे व्यक्तिमत्त्व आणि स्वातंत्र्य याबद्दल आदर बाळगणे बरेच सोपे होईल अशी आशा करायला हरकत नाही असे मला वाटते. परंतु आपल्याला इतरांच्या कृतीवर नीतीच्या नावाने नकाराधिकार वापरण्याचा अधिकार आहे असा विश्वास निर्माण करणाच्या आजच्या परिस्थितीत वाढलेले जे लोक आहेत त्यांना त्या आवडत्या छळापासून अलिप्त राहणे जड जाईल.

पुढे वाचा