मासिक संग्रह: नोव्हेंबर, १९९७

पत्रव्यवहार

श्री बाबूराव यांस सप्रेम नमस्कार
सुधारकचा जूनचा अंक तीन आठवड्यांपूर्वी माझ्या हातात आला त्यात तुमचा लेख वाचला. सध्या बरेच दिवसांपासून माझे वास्तव्य हैदराबादला असल्यामुळे पूर्वीच्या अंकांतून तुमचे व श्री कुळकर्णी यांचे काय लिखाण आले आहे ते कळले नाही. त्याचा संदर्भ न घेता काही विचार सुचले ते लिहीत आहे.
चर्चा करण्या अगोदर define your terms” अशी मागणी करणे रास्तच आहे. पण प्रत्येकाने स्वत:पुरत्या वेगळ्या व्याख्या केल्या तर अनवस्था माजेल. अशी काहीशी अवस्था हिंदुत्व या शब्दाबद्दल झालेली आहे. हिंदू असण्याचा भाव म्हणजे हिंदुत्व असा सोपा अर्थ आता राहिलेला नाही.

पुढे वाचा

अनोखा उंबरठा

लेखक : वि. गो. कुळकर्णी
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, मूल्य : ६० रुपये

आमच्या मित्राला ‘अनोखा उंबरठा’ हे पुस्तक अतिशय आवडले, म्हणून त्याने आमच्यासह आणखी काही इष्टमित्रांना ते चक्क सप्रेम भेट दिले. पुस्तक अगदी ताजे म्हणजे १ मे १९९७ रोजी प्रथमावृत्ती निघालेले! झपाटल्यासारखे वाचून काढले अन् मित्राच्या निवडीला व भेट देण्यातील कल्पकतेला मनोमन दाद दिली.

‘अनोखा उंबरठा’ हे पुस्तक वि.गो. कुळकर्णी ह्यांनी लिहिलेल्या विज्ञानविषयक चिंतनपर ललित निबंधांचा संग्रह आहे. १९९५ मध्ये दैनिक ‘लोकसत्ते’त दर रविवारी हे सदर प्रसिद्ध होत असे. जवळजवळ ५२ लेखांचा हा संग्रह पुस्तकरूपाने आज वाचकांसमोर सादर होत आहे.

पुढे वाचा

मुक्यांचा आक्रोश

शिक्षणाचे लोण पसरत आहे. त्याबद्दल विस्तार झाला, पण उथळपणा आला अशी तक्रारही आहे. तिच्यात तथ्यांश असेल, पण विस्ताराचे अनेक फायदेही आहे. उदा. दलित साहित्य, ते नसते तर समाजाचे केवढाले गट केवढी मोठी दु:खे मुक्याने गिळीत होते हे कळलेच नसते. मूकनायक निघायला शतकानुशतके लोटावी लागली.
भीमराव गस्ती यांचे बेरड हे आत्मकथन १९८७ साली प्रकाशित झाले तेव्हा दलित आत्मकथांची पहिली लाट ओसरत चालली होती; म्हणून आपल्या कहाणीकडे लोकांचे लक्ष जाईल की नाही याची शंका लेखकाला होती. पण वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
‘सुखाची जात सर्वत्र एकच पण दुःखाच्या जाती अनंत हेच खरे’!

पुढे वाचा

सार्वजनिक स्वच्छता

आगरकरांनी स्नान, पोषाख इत्यादींवर लिहिल्याचे त्यांच्या साहित्यांतून आढळते. परंतु, सार्वजनिक स्वच्छतेवर लिहिल्याचे आढळले नाही. कदाचित् त्यांच्या काळी या विषयावर लिहिण्याची त्यांना आवश्यकता वाटली नसावी.
सांप्रत सार्वजनिक स्वच्छतेची स्थिती इतकी चिंताजनक झाली आहे की, त्यावर न बोललेलेच बरे. सार्वजनिक स्वच्छतेबाबत आपल्याला इतकी अनास्था आहे की आपण गेंड्याच्या कातडीचे झालो आहोत. सुरत शहरात प्लेगसारख्या महामारीचा उद्भव झाल्यावर सुद्धा आपल्यावर कसलाही परिणाम झाला नाही. साठलेला कचरा, घाण, दुर्गंधी यामुळे प्लेगचा उद्भव होतो हे कारण समजल्यानंतर, सुरतमध्ये आणि देशातील अन्य शहरांमधे नगरपालिका, महापालिका, यांनी चार दिवस सफाई मोहीम राबविली, शासकीय फतवे निघाले, लोकांनी नाकातोंडाला फडकी बांधून रस्त्याने जाणे सुरू केले आणि कुठे एखादा मेलेला उंदीर सापडला तर तो परीक्षणासाठी कुठल्यातरी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला.

पुढे वाचा

स. ह., चौसाळकर आणि राष्ट्रवाद

स. ह. देशपांडे यांचे ‘परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद’ या विषयावरील दोन लेख आणि त्यावरील प्रा. अशोक चौसाळकर यांची ‘डॉ.स. ह. देशपांड्यांचा राष्ट्रवाद’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली प्रतिक्रिया वाचली. राष्ट्रवाद म्हटले की काही आक्षेपांचा पाढा वाचायचा असा एक प्रघातच पडला आहे. ही प्रतिक्रिया नेमकी त्याच स्वरूपाची आहे, म्हणून मला या विषयासंदर्भात जाणविणार्याा काही बाबी येथे नोंदवीत आहे.
राष्ट्रवाद ही प्रामुख्याने गेल्या तीन शतकांमध्ये उदयास आलेली अतिशय प्रभावी वगतिमान विचारसरणी आहे. आनुवंशिक तत्त्वाने चालत आलेल्या राजघराण्यांना किंवा दैवी आधार असल्याचा दावा करणा-यांना या तत्त्वज्ञानाने झुगारून दिले.

पुढे वाचा

माणसाचा मेंदू मोठा का?

मेंदूच्या वजनाचे शरीराच्या वजनाशी प्रमाण तपासले तर माणसाइतका मेंदू इतर फारच थोड्या प्राण्यांमध्ये आढळतो. एकदोन फुटकळ अपवाद सोडता प्रमाणाच्या निकषावर माणसाइतका ‘डोकेबाज’ कोणताच प्राणी नाही. माणसांचे मेंदू दीड-पावणेदोन किलोंचे असतात, आणि शरीरे साठ-सत्तर किलोंची. म्हणजे माणसांच्या शरीरांचा सव्वादोन-अडीच टक्के भाग मेंदूने व्यापलेला असतो.
माणसाचे सगळ्यात जवळचे नातलग म्हणजे चिंपांझी, गोरिला, ओरांग-उटान हे मानवेतर कपी. हे प्राणी आणि माणसे मिळून कपी (apes) हा वर्ग बनतो. या मानवेतर कपींमध्ये मेंदूचे प्रमाणमाणसांच्या थेट अर्धे, म्हणजे शरीराच्या एक-सव्वा टक्का येवढेच असते. चाळीसेक लक्ष वर्षांपूर्वी
जेव्हा माणसांचे पूर्वज या इतर कपीपेक्षा सुटे झाले, तेव्हा माणसांच्या पूर्वजांचे मेंदूही शरीराच्या एक-दीड टक्काच असायचे.

पुढे वाचा

श्री. गोखल्यांचे ईश्वरास्तित्वाचे समर्थन

प्रा. विवेक गोखले आपल्या ‘आस्तिक्य आणि विवेकवाद’ (आ.सु. ८.७, पृ. २१२) या लेखात म्हणतात की नास्तिकांचा एक युक्तिवाद बिनतोड समजला जातो. पण तसा तो नाही. आणि त्यानुसार त्यांनी त्या युक्तिवादाचे एक खंडन सादर केले आहे.
नास्तिकांचा युक्तिवाद असा आहे : ईश्वरवाद्यांच्या ईश्वरस्वरूपाविषयी अनेक कल्पना आहेत. त्यापैकी ईश्वर सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथासाधु आहे ही एक आहे. पण असा ईश्वर असू शकत नाही, कारण जगात निर्विवादपणे अस्तित्वात असलेले प्रचंड दुःख आणि वरील वर्णनाचा ईश्वर यांत विरोध आहे. ईश्वर जर ईश्वरवादी म्हणतात तसा असता, तर जगात दुःख असू शकले नसते, कारण ते त्याच्या साधुत्वाला बाधक झाले असते.

पुढे वाचा

आम्ही कां लिहितों?

ज्या प्रौढ लोकांच्या मनांत विशिष्ट धर्मकल्पना कायम होऊन गेल्या आहेत व ज्यांचे वर्तन तदनुरोधाने होत आहे त्यांच्या मनावर असल्या चर्चेचा विशेष परिणाम होण्याचा संभव नाहीं हे खरे आहे. पण आमचे असले निबंध तसल्या लोकांकरितां लिहिलेलेच नसतात. ज्या तरुण वाचकांच्या धर्मकल्पना दृढ झाल्या नसतील; ज्यांच्या बुद्धींत साधकबाधक प्रमाणांचा प्रवेश होऊन त्यांचा विचार होणे शक्य असेल; व विचारा अंतीं जें बरें दिसेल त्याप्रमाणे आम्ही थोडा-बहुत तरी विचार करू अशी ज्यांना उमेद असेल, त्यांच्याकरितांच हे लेख आहेत. असले लेख एकदा लिहून टाकले म्हणजे आपले कर्तव्य आटपलें असें कदाचित् मोठमोठ्या तत्त्वशोधकांस म्हणता येईल….पण

पुढे वाचा