मासिक संग्रह: जून, २००२

पत्रसंवाद

निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, चेकनाक्याजवळ, नेरळ (रायगड) — ४१० १०१ (अ) एप्रिल २००२ च्या अंकात मेहेंदळे यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यातील पुढील विधाने मला खटकली.
१. ‘देव ही एक मनोवैज्ञानिक गरज आहे’. २. ‘शाप, कुंडलिनी, रेकी . . . तत्सम शक्तींचा अभ्यास होत आहे.’ ३. ‘डत्दृदत्द्म . . . ध्वनिमुद्रिका . . . विश्वास वाटतो.’ ४. . . . ऐतिहासिक उत्तुंग व्यक्तिमत्त्वे म्हणजे राम, . . . अनुकरण
अपेक्षित आहे.’ त्या विधानांमध्ये मला पुढील चुका सापडल्या.
१. “placebo’ ह्या ‘औषधा’चा एक दुर्लक्षित गुणधर्म म्हणजे ‘वापरकर्त्याला औषध मनोवैज्ञानिक मार्गाने गुण देणारे आहे ह्या सत्याची जाणीव कस्न दिल्यावर औषधाचा परिणाम बंद होतो.’

पुढे वाचा

विशेष जोड अंक

आजचा सुधारकचा यापुढील अंक हा ‘शिक्षणामागील हेतू’ या विषयावरील विशेष जोड अंक असेल. सुमारे ऐंशी पानांचा हा अंक जुलै-ऑगस्टचा अंक म्हणून प्रकाशित होईल.
या अंकासाठी अभ्यागत संपादक म्हणून संजीवनी कुलकर्णी आम्हाला लाभल्या आहेत. होमिओपॅथीचे शिक्षण घेतलेल्या संजीवनींचा त्रोटक परिचय असा —-
१९८७ मध्ये त्यांनी सतर्क व सजग पालकत्वासाठी ‘पालकनीती’ हे मासिक सुरू केले आणि आजवर त्याचे संपादन त्या करत आहेत.
एन. जी. नारळकर फाऊंडेशनने सुरू केलेल्या ‘अक्षरनंदन’ या शाळेच्या व्यवस्थापनात त्या सक्रिय असून गणित, नागरिकत्वाचे शिक्षण आणि एकूण शिक्षणपद्धतीत त्यांना विशेष रस आहे.

पुढे वाचा

खादी: श्री. वेले ह्यांच्या पत्राच्या निमित्ताने

श्री. दामोदर वेले ह्यांचे मे अंकातले पत्र वाचले. त्यांनी Mass Production च्या जमान्यांत खादी काळ बाह्य झाली आहे असे माझे मत म्हणून मांडले आहे. त्याबाबतीत मला त्यांचे लक्ष त्याच अंकातल्या ५०-५१ या पानवरील मजकुराकडे वेधावयाचे आहे. त्यांत मी असे म्हणतो की, आपले प्र न औद्योगिक क्रान्ती व तज्जन्य Mass Production मुळे निर्माण झाले नाहीत. ते आपल्याला यंत्रयुगाला सामोरे जाता आलेले नाही म्हणून निर्माण झाले आहेत.
यंत्रयुग मानवेतिहासांत फार पूर्वीच आलेले आहे. आणि लोकसंख्या मुळीच वाढली नाही तरी, मानवी बुद्धीच्या आटोक्यात नवीन उत्पादनपद्धती येऊ लागल्या तेव्हापासून हा फरक पडला आहे.

पुढे वाचा

युनिकॉर्न

(उंबेर्तो इको ह्या इटालियन लेखकाच्या द नेम ऑफ द रोज ह्या पुस्तकातील हा उतारा. पुस्तक वरकरणी गुन्हा तपासाच्या कादंबरीसारखे आहे. चौदाव्या शतकात एक ‘धर्मगुरू व त्याचा एक शिष्य एका मठात पोचतात आणि तिथे घडणाऱ्या एका खुनांच्या मालिकेचे रहस्य उलगडतात. धर्मगुरू विल्यम हा रॉजर बेकनचा शिष्य, आणि बेकन हा काही लोकांच्या मते ‘पहिला’ वैज्ञानिक, आणि स्फोटक दारूचा संशोधक. युरोपच्या ‘अंधाऱ्या युगातली’ ही कथा.
युनिकॉर्न हा काल्पनिक प्राणी आहे. श्रद्धा (फेथ), आशा (होप) आणि औदार्य (चॅरिटी) ही ख्रिस्ती धर्मशास्त्रातली गुणांची त्रयी आहे.)
आड्सो : पण मग युनिकॉर्न खोटा आहे का?

पुढे वाचा

खिळे मोळे

काही जणांना महाराष्ट्रातल्या आणीबाणीचा काळ ‘मिश्र वरदाना’ सारखा वाटतो. अनेक जुने मुद्दे गांभीर्याने घेऊन, धाडसी धोरणे लागू करून सोडवले गेले. सामान्य काळात यांपैकी काही मुद्दे लोकांना आवडले नसते. मात्र यातल्या अनेक गोष्टी आणीबाणीनंतर गळून पडल्या.
एक सततची मागणी होती, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची. मुख्यमंत्र्यांनी तिला दाद दिली नाही. पुढे ८८-८९ मध्ये शरद पवारांनी काही रकमेपर्यंतची कर्जे माफ केली आणि व्याजाचे दर कमी केले. ह्या लोकानुनयी निर्णयाने शेतकऱ्यांना मिळणारा संस्थात्मक अर्थसहाय्याचा झरा आटला.
__ आपल्याकडे सार्वजनिक सुट्ट्यांची संख्या अगदी लज्जास्पद आहे. सुट्ट्या आणि रजांची वार्षिक बेरीज १७२ दिवस आहे.

पुढे वाचा

उत्क्रांती: परोपजीवींनी दुस्साहसी बनवलेल्या घुशी

[EVOLUTION : Parasites make Scaredy-rats foolhardy या Science या प्रतिष्ठित नियतकालिकाच्या २८ जुलाय २००० च्या अंकातील कार्ल झिमरच्या लेखाचे हे भाषांतर. झिमरचे ‘Parasite Rex’ (राजा परोपजीवी) हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.ट
‘एक्स–फाईल्स’ हा अधिसामान्य (paranormal) घटनांवर आधारित कार्यक्रम लोकप्रिय व्हायच्या बऱ्याच आधी रॉबर्ट हाईनलाईनने परग्रहांवरून आलेले परोपजीवी माणसांची मने बदलू शकण्याबाबत विज्ञान कथा लिहिली होती. त्याच्या १९५५ सालच्या ‘द पपेट मास्टर्ज’ या कादंबरीत अळ्यांसारखे परोपजीवी माणसांच्या कण्यांना चिकटून आपला वंश वाढवणाऱ्या क्रिया करायला माणसांना भाग पाडतात. हाईनलाईन कट्टर कम्युनिस्ट विरोधक होता, आणि त्याच्या कादंबरीच्या हेतूत हे लाल-विरोधाचे अंग जीवशास्त्रापेक्षा जास्त होते.

पुढे वाचा

स्वभाव–विभाव (पुस्तक-परीक्षण, ले. आनंद नाडकर्णी)

माणूस जसा वागतो तसा तो का वागतो, ह्या प्र नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नातूनच मानवी वर्तन (आणि प्राणि-वर्तनसुद्धा) समजून घेण्याच्या शास्त्राचा, म्हणजेच मानसशास्त्राचा जन्म झाला आहे.
मानवी मन हे आजही माणसाला पडलेले कोडे आहे व ते सोडविण्याचे अनेक मार्ग व पद्धती मानसशास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या आहेत.
आजही मानसशास्त्र का निवडले असा प्र न जर विद्यार्थ्याला विचारला तर त्याचे स्वाभाविक उत्तर ‘समोरच्या व्यक्तीचे वर्तन/मन समजून घेता यावे’ म्हणून असे असते. आणखी विचार करून उत्तर द्या असे म्हटले तर चांगले जगता यावे म्हणून असे उत्तर मिळते.

पुढे वाचा

भ. पां. पाटणकर यांच्या पत्रास हे उत्तर

“पुरुष अजूनी भूतकाळात राहात आहेत म्हणून पा चात्त्य कुटुंबव्यवस्था खिळखिळी होत आहे’ असे विधान माझ्या लेखात आहे (जाने. २००२). त्याला आशा ब्रह्म यांच्या लेखातल्या विधानांना जोडून भ. पां. पाटणकर यांनी एक (? विनोदी) निष्कर्ष काढला आहे “स्त्रिया (? उपय) नैतिक मूल्यांच्या मागे लागल्या आहेत.’ पा चात्त्य स्त्रिया ज्या मूल्यांचा पुरस्कार करत आहेत त्यांची थोडक्यात यादी लिहिते.
पती व पत्नी दोघेही नोकऱ्या करत असताना (अ) दोघांनी घरकामाची व मुलांची समान प्रमाणात जबाबदारी घ्यावी. (ब) पतीच्या करिअरएवढेच पत्नीच्या करिअरला महत्त्व असावे (क) दोघांच्या नातेवाईकांना सम प्रमाणात घरात स्थान मिळावे.

पुढे वाचा

धिस फिशर्ड लँड : लेख ३

शेती आणि उद्योग

जमिनीच्या एखाद्या तुकड्यावर थोड्याच जातींच्या वनस्पतींपासून बरेच उत्पादन घेत राहिल्यास त्या जमिनीतील अनेक द्रव्ये शोषून घेतली जाऊन जमिनीचा कस उतरतो. यावर एक उपाय म्हणजे जमिनीला काही काळ न वापरणे, ज्यामुळे तिच्यावर नैसर्गिक झाडोरा येऊन द्रव्यांची साठवण होते. हे झाले फिरत्या शेतीचे तंत्र. जर कस उतरलेल्या जमिनीला गाळ, खते वगैरेंमधून पोषक द्रव्यांचा पुरवठा केला, तर मात्र एकाच भूभागावर वर्षानुवर्षे पिके घेता येतात. फिरती शेती करताना बऱ्याच जमिनीवर थोडीशीच माणसे जगू शकतात, तर स्थिरावलेल्या शेतीवर जास्त माणसे जगू शकतात.
स्थिर शेतीसाठी जमिनीची सक्रिय मशागत करावी लागते.

पुढे वाचा

संघाचा फतवा : राज्यघटनेलाच आव्हान

गुजरातमध्ये ज्यांनी अमानुष कृत्ये केली ते हिंदू नव्हते; तर माणसाच्या रूपातील राक्षस होते. मला जे हिंदुत्व भावते ते “दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मसूर्ये पाहो, जो जे वांच्छील तो तें लाहो, प्राणिजात” असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांचे. कारण ते हिंदुत्व वैश्विक आहे, मानवतावादी आहे. जे हिंदुत्वाचा उपयोग माणसामाणसांतील द्वेष आणि भीती वाढवण्याकरता करतात, ते हिंदुत्ववादी नाहीतच. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांच्यापासून गांधींपर्यंत ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला त्यांचे ते हिंदुत्व अहिंसा आणि प्रेम या दोन तत्त्वांवरच आधारलेले होते. संघाचे हिंदुत्व नकारात्मक आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लोकशाही आणि राज्यघटना यांवर विश्वास नाही, हे काही नवीनच प्राप्त होणारे ज्ञान नाही.

पुढे वाचा