मासिक संग्रह: सप्टेंबर, २०१२

पत्रसंवाद

संजीव चांदोरकर, 206, मेहता पार्क, भागोजी कीर मार्ग, लेडी जमशेटजी रोड, माहीम (पश्चिम), मुंबई 400016. —
गेल्या काही अंकांपासून मासिकाच्या वर्गणीवरून जो काही पत्रव्यवहार अंकात छापला जात आहे त्यातून भावना बाजूला काढल्या तर समाज सुधारणेला वाहून घेतलेले आसूसारखे व्यासपीठ (जे 22 वर्षे सातत्याने चालवणे हीच मोठी गोष्ट आहे) आजच्या जमान्यात कसे सुरू ठेवायचे या बद्दल अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. दुसऱ्या शब्दांत यामध्ये गुंतलेले मुद्दे या वादात गुंतलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या पलीकडचे आहेत.
सर्वसाधारणतः पुरोगामी, परिवर्तनवादी लोकांमध्ये अशा उपक्रमांच्या ज्या मॅनेजमेंटच्या बाजू आहेत (दैनंदिन व्यवस्थपान, कॉस्टिंग, दीर्घ पल्ल्याची वित्तीय स्वयंपूर्णता इत्यादी) याकडे बघण्याचा आपोआपवादी दृष्टिकोण प्रचलित आहे.

पुढे वाचा

एका फसलेल्या अपहरणाची गोष्ट

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक विमान कंपनी होती. तिचे नाव कुठल्याशा पक्ष्यावरून दिले होते; म्हणजे अशी जुन्या लोकांची आठवण होती. आता मात्र तिला सर्वजण केएफए म्हणजे खाली फुकट एअरलाइन्स म्हणून संबोधायचे. ही कंपनी डबघाईला आली होती. वैमानिक संपावर गेले होते आणि कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांचा पगार मिळाला नव्हता. तिला ज्यांनी मोठमोठी कर्जे दिली अश्या बँका बुडू लागल्या होत्या. पण त्या कंपनीचे एक वैशिष्ट्य होते, ज्यामुळे तिला कधी प्रवाशांची ददात पडत नसे. ती हायजॅकप्रूफ होती. ही प्रसिद्धी कंपनीला कशी मिळाली, त्याचा हा किस्सा —
काही महिन्यांपूर्वी घडलेली गोष्ट.

पुढे वाचा

गावगाडा – खाद्यसंस्कृती

पूर्वी खेडेगावातल्या प्रथेप्रमाणे लहान, थोर, श्रीमंत, सर्वांकडे, आपल्या इथे जे पिकते तेच खायचे अशी पद्धत होती. त्यामुळे बहुतेकांच्या घरी सारखाच मेनू असे. दररोजच्या जेवणात ज्वारीची भाकरी, साधारण परिस्थिती असलेल्या लोकांकडे कोरडे कालवण, ‘कोरड्यास’ म्हणजे भाजी अथवा दाळ, जी भाकरीवर घालून भाकरी दुमडून ‘पॅक’ करता येईल असे पदार्थ असत. जरा बरी परिस्थिती असलेल्यांकडे पातळ कालवण भाजी अथवा दाळ, कधी कधी भुईमूग अथवा सूर्यफूल अथवा इतर तेलबियांची कोरडी चटणी, सोबत सीझनप्रमाणे कांदा अथवा काकडी, हा मेनू न्याहारीत व दुपारच्या जेवणात असे. घरी जेवायचे असल्यासच पातळ कालवण कांदा वगैरे असे.

पुढे वाचा

जागतिक धार्मिकता सूचकांक (Global Religiosity Index)

लॅप इंटर नॅशनल या संस्थेने केलेल्या एका पाहणीचा आजच्या सुधारकच्या वाचकांसाठी घेतलेला एक आढावा. 57 देशात घेतलेल्या या पाहणीत सुमारे 52000 पुरुष आणि स्त्रियांचा यात समावेश होता. प्रत्यक्ष मुलाखत, टेलिफोन व इंटरनेट या तिन्ही माध्यमांचा वापर करण्यात आला.
ह्या पाहणीत सर्व स्त्री पुरुषांना एकाच प्रश्न विचारण्यात आला: तम्ही धार्मिक स्थळांना भेट देता किंवा देत नाही याला महत्त्व न देता, तुम्ही स्वतःला धार्मिक, अधार्मिक वा नास्तिक संबोधता?
या पाहणीनुसार 59% लोक स्वतःला धार्मिक, 23% लोक स्वतःला अधार्मिक व 13% लोक स्वतःला पूर्णपणे नास्तिक समजतात.

पुढे वाचा

सर्वांसाठी सहजीवन

काही महिन्यांपूर्वी नागपूरला ज्येष्ठ नागरिकांचा लिव्ह इन रिलेशनशिप ह्या विषयावर एक कार्यक्रम झाला. नागपूरच्या मानाने हा विषय तसा स्फोटकच होता. तरुणांची लिव्ह इन रिलेशनशिपदेखील ह्या शहराने अजून मान्य केलेली नाही, तर मग ज्येष्ठ नागरिकांची कथा ती काय? ताळतंत्र सोडून वागण्याचे स्वातंत्र्य एकवेळ तरुणांना असते असे मानता येईल, पण ज्येष्ठ नागरिक? तेच जर असे काही वागू लागले तर तरुणांना कोण अडवणार? सगळ्यांनाच जर ह्याची मुभा मिळाली तर विवाहसंस्थेची प्रस्तुतताच राहणार नाही. समाज स्वास्थ्य धोक्यात येईल. एकूण काय, तर हा सारा अमेरिकेच्या अंधानुकरणाचा भाग आहे.

पुढे वाचा

आदिवासी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य

[जनजीवन आणि संस्कृती हे आ.सु. चे जिव्हाळ्याचे विषय आहेत. आपल्या अनेक समस्या आणि त्यांची उकल ह्यांची पाळेमुळे त्यातच रुजलेली असतात. आज जगभरातल्या विविध भौगोलिक प्रदेशांतल्या संस्कृतीचे झपाट्याने एकजिनसीकरण व सपाटीकरण होत आहे. निसर्गापासून दूर दूर जाणे हेही त्याचे एक व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. त्यामधून आणखी वेगळ्या समस्या उद्भवत आहेत. अशा परिस्थितीत बिगर-शहरी संस्कृतीची वाटचाल कशी चालली आहे हे पाहणे उद्बोधक ठरेल. ह्याच उद्देशाने अनिल पाटील सुर्डीकर ह्यांची ग्रामीण जीवनावरची लेखमाला आ.सु. ने दिली होती. आदिवासींच्या जीवनावरील सुनंदा पाटील ह्यांचा हा लेखही असाच.

पुढे वाचा

हिंदू : भारताचा ऐतिहासिक भौतिकवाद रेखाटणारी कादंबरी

हरितक्रांतीनंतर भांडवलाचा शिरकाव शेतीमध्ये झाला आणि शेती हळूहळू बाजारपेठेशी जोडली गेली. या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांची मुले शिकायला लागली. ती खेड्यांकडून शहराकडे आली आणि शहरांमध्ये आल्यानंतर शहरात ती ‘अनफिट’ ठरली. ही ‘अनफिट’ ठरलेली सगळी मंडळी नेमाडे यांच्या आधीच्या ‘कोसला’ व ‘चांगदेव चतुष्टय’ कादंबऱ्यांचे नायक आहेत.
ही ‘अनफिट’ मंडळी समाजवाद्यांकडे, कम्युनिस्टांकडे गेली मात्र कुठेही ती फिट झाली नाहीत. मग ती अगतिकपणे (त्यांची इच्छा नसताना) खेड्यांमध्ये परत गेली. पण शेतकरी म्हणून नव्हे तर एक अॅलियन क्लास म्हणून – एक नवीन वर्ग म्हणून.
शरद पवारांपासून सदानंद मोऱ्यांपर्यंत आणि अगदी माझ्यापर्यंत म्हणता येईल.

पुढे वाचा

चिं.मो.पंडित

एंजिनीयरिंग कॉलेजात आम्हाला एक अभ्यासक्रम असायचा तंत्रज्ञानाचा इतिहास’ नावाचा. केमिकल एंजिनीयरिंगच्या क्षेत्रात ऋषितुल्य मानले जाणारे प्रा. एन.आर.कामत आम्हाला 1962-63 साली हा विषय शिकवायचे. एंजिनीयरिंग-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या पातळ्या पिंजत वेगवेगळ्या पातळ्यांवर अपेक्षित कौशल्ये सांगणे प्रा.कामतांना आवडायचे.
आज पन्नासेक वर्षांनंतर जसा आठवतो तसा कामतसरांचा क्रम नोंदतो —
(1) एखादे काम कसे करायचे ते जाणणारे, ते कारागीर; गवंडी. मशिनिस्ट, सुतार, लोहार, इत्यादी. असे म्हणूया, की आज ज्यांना (ITI) संस्थांमध्ये प्रशिक्षण मिळते, ते लोक म्हणजे कारागीर. (2) एखादी योजना समजणारे, त्या योजनेनुसार घेगवेगळ्या कारागिरांचे एकत्रित काम करवून घेऊ शकणारे, ते तांत्रिक पर्यवेक्षक किंवा फोरमेन.

पुढे वाचा

माणूस, ईश्वर, अक्षर

मानवी मनाला स्मृतिशक्तीची देणगी लाभलेली असल्यामुळे, आपल्या जन्माच्या आधी हे जग चालत आलेले असणार असा विश्वास ठेवणे आपल्याला भाग पडते; आणि जर जगाला सुरुवात असेलच तर ती सुरुवात करणारी शक्ती आहे असे गृहीत धरण्याच्या भूमिकेची सुरुवात होते…ह्यामुळे, जम्म जो वास्तविक केवळ अत्यंत शारीरिक असा अनुभव आहे त्याला पारलौकिक स्वरूप प्राप्त होत जाते. मुलगा आणि वडील, मुलगी आणि आई ह्यांच्यात असलेल्या द्वंद्वात्मक संबंधांमुळे प्रत्येक व्यक्तीला तिचा जन्मदाता अथवा जन्मदात्री ह्यांच्यात विलीन होऊन नाहीसे होण्याची एक अनिवार्य, सुप्त इच्छा असते. ह्या प्रेरणेचे स्वरूप कित्येकदा त्यांची नक्कल करणे असेही दिसू शकते पण ही प्रेरणा बऱ्याच वेळा रचनात्मक स्वरूपातही पुढे येते आणि प्रत्यक्ष जन्मदात्याऐवजी, जो कधीच मृत्यू पावणार नाही अशा एका जन्मदात्याची कल्पना केली जाते.

पुढे वाचा