वैयक्तिक श्रीमंती आणि सार्वजनिक श्रीमंती यांतील फरक आतापर्यंत समजला असेलच. सार्वजनिक श्रीमंती कशी निर्माण करायची व वाढवत न्यायची, हे आम्हा भारतीयांना अजूनपर्यंत कळलेले नाही. त्यामुळे आमच्या देशात इतक्या समस्या (सामाजिक, आर्थिक) निर्माण झाल्या आहेत. सध्या भ्रष्टाचाराच्या अनेक घटना एकामागे एक उघडकीस येत आहेत आणि त्यांच्या खमंग चर्चा करण्यातच देशवासीयांच्या बहुमोल वेळाचा अपव्यय होत आहे.
आपल्या देशातल्या भ्रष्टाचाराला आळा कसा घालायचा ह्याचा भावी उपाय अजून सापडलेला नाही. मी एक सुचवून पाहतो. त्यासाठी आपण पुन्हा वैयक्तिक व सार्वजनिक संपत्तीकडे वळू.
एखादा माणूस भ्रष्टाचार करतो, तेव्हा त्या भ्रष्टाचाराचे स्वरूप काय असते?