“तुला अगदी शंभरावर पाच वर्ष आयुष्य!” मैत्रिणींच्या संमेलनात पोचायला मला थोडा उशीर झाला काय अन् सगळ्यांनी हे असे उस्फूर्त स्वागत केले माझे. ऐकले अन् अंगावर सरसरून काटा आला. मनात म्हटले, माणसाची ‘अधिकाची भूक कधी संपणारच नाही आहे का? पूर्वी नाव काढताच हजर होणाऱ्याला ‘शंभर वर्षे’ आयुष्य बहाल केले जायचे, आता ‘शंभरावर पाच’ ! साहजिकच चर्चा या ‘शंभरावर पाच’ आणि त्यावरून अंगावर उठणारा काटा अशीच सुरू राहिली.
नुकतीच कोणीतरी वयाची ११७ वर्षे पूर्ण केलेल्या रांगड्या शेतकयाची बातमी वाचली होती. त्यावरून आपल्या पुराणकथांमधल्या सात चिरंजीवांची आठवण झाली.
सामाजिक न्याय व त्याबाबतच्या मिथ्यकथा
आरक्षणापासून नेमका फायदा कोणाला, तोटा कोणाला, यावर फार काही विश्वसनीय, अभ्यासातून सापडलेली माहिती नसते. या ‘माहितीच्या निर्वातात’च राजकीय हेतूंनी प्रेरित युक्तिवादाची भर पडते, आणि सर्वच वादविवाद ‘श्रद्धासदृश तत्त्वां’वर बेतले जातात.
यावर उतारा म्हणून तीन अमेरिकास्थित अर्थशास्त्रज्ञांनी एका भारतीय प्रांतातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवांचा १९९६ पासून मागोवा घेतला आहे प्रांताचे नाव मात्र जाहीर केलेले नाही. मुख्य लक्ष्य आहे दोन भागांत, एक म्हणजे ज्यांना आरक्षण धोरणामुळे कॉलेजात प्रवेश मिळाला असे डउ व जइउ विद्यार्थी, आणि दुसरे म्हणजे ज्यांना आरक्षण धोरणामुळे कॉलेजात प्रवेश नाकारला गेला असे ‘खुल्या’ वर्गातले विद्यार्थी.
आरक्षणाला एक पर्यायःएलीट शिक्षणसंस्थांसाठी
आरक्षणाच्या धोरणावरील महत्त्वाचा आक्षेप म्हणजे त्यामुळे शिक्षण व रोजगारात शंकास्पद गुणवत्तेच्या व्यक्तींना संधी मिळतात, तर खात्रीलायक गुणवत्तेच्या व्यक्तींना त्या नाकारल्या जातात. याने समाजव्यवहारातील गुणवत्ता ढासळते. उच्चतम दर्ध्याच्या शिक्षणसंस्थांमध्ये, एलीट (elite) संस्थांमध्ये हा प्रश्न सर्वांत तीव्र मानला जातो, कारण या संस्था गुणवत्तेतला क्रीमी लेअर निवडून त्यातील व्यक्तींना समाजव्यवहारात महत्त्वाचे स्थान देत असतात. २००७ साली जेव्हा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खखढ, खखच या संस्थांमध्ये प्रवेशात आरक्षण देण्याची घोषणा झाली तेव्हा हा प्रश्न नव्याने चर्चेत आला.
सतीश देशपांडे (दिल्ली विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक) व योगेंद्र यादव (दिल्लीच्या सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज मध्ये ज्येष्ठ संशोधक) यांनी या प्रश्नावर एक लेख लिहिला, तो २२ व २३ मे २००७ च्या द हिंदू मध्ये प्रकाशित झाला.
परंपराच नव्हती
कम्युनिस्टांचे दुय्यम-तिय्यम नेते गिरणीच्या गेटावर पिंजारलेल्या केसांनी ‘मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटचे भडवे’ यांना शिव्या देत; पण भांडवलशाहीबद्दल बोलत नसत. धर्म ही अफूची गोळी आहे असे सांगणाऱ्या कम्युनिझमचे हे सेनापती गिरणीत सत्यनारायणाला परवानगी दिली नाही म्हणून एक दिवसाचा संप करीत. कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली कामगारांना बोनस मिळाला; पण बोनस म्हणजे काय आणि त्याच्यासाठी का भांडायचे हे कधी कळले नाही. पगाराच्या वर पैसे मिळाले म्हणून बिचारे खुष झाले. इंदिरा गांधीच्या कारकीर्दीत ८.३३ टक्के बोनस झाला तेव्हा हात स्वर्गाला लागल्यासारखे वाटले.
नेतृत्वाच्या सर्वांत वरच्या थराच्याखाली अंतिम उद्दिष्टांबाबत जे अज्ञान होते ते पुढे कामगारांना नडले.
पत्रचर्चाः
जात व आरक्षण (सुधीर बेडेकर यांनी पुरविलेले साहित्य)
क) जात व आरक्षण विशेषांकावरील चर्चेत एक मुद्दा मांडला गेला, की आरक्षणाला विरोध असणाऱ्यांची बाजू समर्थपणे मांडून तिला उत्तर दिले गेले नाही. यासंबंधात तात्पर्य मासिकाच्या मे १९७८ च्या अंकातील संपादकीय (संपादकः सुधीर बेडेकर) टिपणात असा प्रयत्न सापडला. त्याचा काही भाग (साभार) असा
गुणवत्तेनुसार संधी व मोबदलाः सवर्णांचा आक्षेप : सवर्णांचा प्रमुख आक्षेप असतो तो गुणवत्तेबाबतचा. समाजात व्यक्तीला तिच्या गुणवत्तेनुसार योग्य संधी व मोबदला मिळाला पाहिजे असे जर मानले, तर ३५% गुण मिळालेल्या दलिताला मेडिकलला प्रवेश मिळतो व ६५% गुण मिळालेल्या ब्राह्मणाला मिळत नाही हा अन्याय नाही का ?
पत्रचर्चा
देवयानी बुचे
आसु च्या ऑगस्ट २००८ अंकांतील “परमसखा मृत्यू किती आळवावा’ हा लेख वाचला. मी एक फिजिशियन असून गंभीरपणे आजारी असलेल्या रुग्णांची चिकित्सा (treatment) करते. अशा प्रकारचा वृद्ध रुग्णांची चिकित्सा करताना तीसुद्धा अत्यंत महागडी, क्लिष्ट आणि सरकारी खर्चाने देताना “Critical care for who?’ हा प्रश्न मला वारंवार भेडसावतो.
लेखिकेने म्हटल्याप्रमाणे पस्तीस वर्षे नोकरी आणि पंचेचाळीस वर्षे पेन्शन बरोबरीस पंचेचाळीस वर्षे सतत औषधोपचार आणि शेवटी आठवडेच्या आठवडे आय.सी.सी.यु.मध्ये Intensive treatment हा कुठला हिशेब ? शिवाय ट्रीटमेंटनंतर परावलंबी आयुष्य आणि तेसुद्धा रिटायर झालेल्या वयस्क मुलांकडून!
वेगळ्या वृत्तीचे न्यायमूर्ती
३ जुलाय २००८ पासून न्यायमूर्ती वि.म.तारकुंडे यांचे जन्मशताब्दीवर्ष सुरू झाले. त्यांची ओळख ‘रॅडिकल ह्यूमनिस्ट’ (मूलभूत मानवतावादी) अशी आहे. अर्थातच ते ‘नागरी स्वातंत्र्य लोकसंघटना’ (झणउङ, पीपल्स यूनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज) व ‘लोकशाहीवादी नागरिक’ (CFD, सिटिझन्स फॉर डेमॉक्रसी) या संघटनांचे सक्रिय नेते होते.
PUCL च्या मुखपत्राने न्यायमूर्ती तारकुंड्यांवर अनेकांचे लेख मागवून आपल्या ऑगस्ट २००८ च्या अंकात संकलित केले. त्यातील काही उताऱ्यांमधून तारकुंड्यांचे विचार आ.सु.च्या वाचकांपुढे मांडत आहोत.
… समाजात मूलभूत बदल व्हावे यासाठी लढणारा निर्भीड योद्धा. देवशास्त्रीय पोथ्या व राजकीय गूढविचारांच्या पलिकडे जाऊन मानवी हक्कांचा विचार करणारे ते विचारवंत होते.
श्रीकांत कारंजेकरः निर्वैर, निराग्रही, निःसंग
श्रीकांत कारंजेकरची माझी मैत्री चांगली एकोणतीस वर्षांपासून आहे. १९८२ च्या सप्टेंबरमध्ये मी वर्ध्याच्या ग्रामोपयोगी विज्ञान केंद्रात दाखल झालो, तेव्हा पहिली मैत्री श्रीकांतशीच झाली. नंतर माझ्या आग्रहावरून तारक काटेही तिथेच आला. श्रीकांत मी तारक असे अभेद्य त्रिकूट इतकी वर्षे होते, त्यामुळे आम्ही परस्परांना गृहीत धरायला सुरुवात केली होती. मी वर्धा सोडून मुंबईला गेलो; सव्वीस वर्षे तिथे राहिलो. वाशी असणारा माझा संपर्क काहीसा क्षीण झाला. पण आमच्या मैत्रीत कधीच अंतर पडले नाही. आत्ता-आत्ता मी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला, ‘धरामित्र’शी काही प्रमाणात बांधला गेलो, त्यापासून ते ‘आजचा सुधारक’च्या डार्विन विशेषांकाच्या आखणीपर्यंत प्रत्येक योजनेत श्रीकांतचा समावेश होता.
जागतिकीकरणाच्या युगात ‘स्वयंसेवी’: संस्था आणि चळवळ
‘स्वयंसेवी क्षेत्र अथवा संस्था ही “एकजिनसी” बाब नाही’, म्हणजे, सर्व स्वयंसेवी संस्थांना ‘सब घोडे बारा टक्के’ असे एका मापाने मोजू नये, अथवा त्यांची विभागणी ‘चांगल्या’ व ‘वाईट’ अशी केली पाहिजे अशा बाळबोध अर्थाने अथवा सद्भावनेने आलेले हे वाक्य नाही. किंवा, यात असेही गृहीत नाही की मुळात सद्भावनेने प्रेरित असलेल्या या क्षेत्रात आता काही ‘विकृती’ शिरल्याने नवे भेद तयार झाले आहेत!
तर मुद्दा असा, की ‘स्वयंसेवी’ या पाटीखाली संस्थात्मक/संघटनात्मक अर्थी अनेक प्रकार येतात, ते वेगवेगळ्या भूमिका अदा करतात, त्यांचे कार्य व स्वरूप यांतही फरक आहेत.
स्वयंसेवी संस्थाः काही विचार
गेली तीस वर्षे मी स्वयंसेवी क्षेत्रात काढली, त्यातल्या शेवटच्या पाच वर्षांत फार उद्विग्नता वाट्याला आली आणि ‘अर्थ काय स्वयंसेवी संस्थांचा ह्या विश्वचक्रीं?’ असे वाटू लागले.
संपूर्णपणे पुन्हा पहिल्यापासून स्वच्छ, साधा आणि मोकळा विचार करावा असे जाणवू लागले. तसा विचार सुरू केला पण अजूनही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे ‘स्वयंसेवी संस्था : सद्यःस्थिती आणि आह्वाने’ ह्यावर काही लिहिण्याइतपत आपला विचार पूर्ण झालेला आहे, असे अगदी खरोखरच वाटत नाही. दिवसेंदिवस मी जसा जसा विचार करतो आहे आणि अनुभव करतो आहे, तेव्हा वाटते, काय ह्या स्वयंसेवी क्षेत्रांनी स्वतःची वाट लावून घेतली.